पिंपळाचे झाड तोडल्यावर काय होते.? परिणाम जाणून तुम्हीही हैराण व्हाल.!

अध्यात्म

अनेकदा आपल्या घराच्या भिंती मध्ये किंवा आजूबाजूच्या कोपऱ्यामध्ये पिंपळाचे झाड उगवते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये या पिंपळाच्या वृक्षाला अत्यंत पवित्र व शुभ मानले जाते परंतु या वृक्षास घरासमोर व आजूबाजूला लावण्यास हिंदू शास्त्रात मनाई केली गेली आहे.वास्तुशास्त्रानुसार सुद्धा पिंपळाचे झाड आपल्या घराच्या आजूबाजूला तसेच पिंपळाच्या झाडाची सावली आपल्या घरावर पडणे अशुभ मानले गेले आहे.

त्यामुळे आपल्या घरावर अनेक मोठी मोठी संकटे येऊ शकतात त्यामुळे जर तुमच्या घराच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड उगवले असेल तर ते काय करायचे आणि ते झाड पुन्हा दुसरीकडे कसे लावायचे किंवा त्याचे विसर्जन कोणत्या दिवशी करायचे असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात.

या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. हिंदू धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादे पिंपळाचे झाड उगवले असल्यास ते लवकरात लवकर उपटून दुसऱ्या जागी लावावे. हे रोपटे तुम्ही मंदिराच्या अवतीभोवती किंवा रस्त्याच्या किनाऱ्याला हे रोपटे लावू शकता.जर हे रोपटे तोडणे शक्य नसल्यास अशावेळी त्याची पाने तोडून जवळच्या तलावांमध्ये विसर्जित करू शकतात.

हे वाचा:   अमावसेच्या रात्री गुपचूप करा हा उपाय; पैशांच्या राशी उभ्या राहतील.!

हे करण्यासाठी रविवारचा दिवस अतिउत्तम मानला गेलेला आहे.रविवारच्या दिवशी हे कार्य केल्यामुळे त्याचा कोणताही दोष आपल्यावर व आपल्या कुटुंबातील सदस्यांना लागत नाही.मात्र अनेकदा असे पाहायला मिळते की एकदा पिंपळाचे झाड उपटल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याच ठिकाणी ते झाड रोपटे पुन्हा उगवत असते,अशावेळी निराश न होता एक उपाय आपण करू शकतो.

रविवारच्या दिवशी पिंपळाचे रोप आहे अशा ठिकाणी एक साबुत लिंबू व मिरची आपण त्या रोपटे जवळ ठेवायचे आहे. तीन तास लिंबू-मिरची पिंपळाच्या रोपटा जवळ ठेवायचे आहे त्यानंतर पिंपळाचे रोपटे तुम्ही उपटू शकता आणि ज्या ठिकाणी तुम्ही हेच रूप पुन्हा लावाल त्या ठिकाणी लिंबू-मिरची पुन्हा आपल्याला ठेवायचे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

हे वाचा:   जेव्हा पोळी खाऊ घालायला गाय नसेल तेव्हा काय करावे..करा हा साधा उपाय ! ३३ कोटी देवांचा मिळेल आशीर्वाद..

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.