जेव्हा पोळी खाऊ घालायला गाय नसेल तेव्हा काय करावे..करा हा साधा उपाय ! ३३ कोटी देवांचा मिळेल आशीर्वाद..

अध्यात्म

आपल्या हिंदू ध-र्मात गाईचे खूप महत्व आहे गाईला आपण देवी मानतो आपल्या धर्म ग्रंथात ही म्हटले आहे की गाई मध्ये ३३ कोटी देवतांचे वास्तव्य असते म्हणून सर्व देवांची कृपा आपल्याला मिळवायची असेल तर गाईचे पूजन करावे गाईची सेवा करावी गाईच्या सेवेचे व पूजनाचे जेवढे फळ मिळते ते इतर कोणत्याही पूजेने मिळत नाही.

घरात बरकत येण्यासाठी अन्न धान्यात भरभराट होण्यासाठी व सुख,समृद्धी,ऐश्वर्य मिळवण्यासाठी आपला स्वयंपाक झाला की सर्वात आधी गाईला पोळी खायला द्यावी व त्यानंतर आपण जेवण करावे म्हणजे ३३ कोटी देवी देवतांना नैवेद्य दिल्या प्रमाणे होते. बहुतेक स्त्रियांना स्वयंपाक झाला की गाईसाठी पोळी काढून ठेवण्याची सवय असते पण काय होत आपण पोळी काढून ठेवतो पण ती पोळी खाऊ घालण्यासाठी गाय मिळत नाही.

हे वाचा:   फक्त एक नारळ गपचूप इथे ठेवा; कोणत्याही कामात नक्की मिळेल यश.!

मग ती पोळी तशीच पडून राहते ते आपल्याला ही खाता येत नाही व इतर कोणालाही देताही येत नाही त्यामुळे कधी कधी वाटते की गाय साठी पोळी काढावी की नाही आणि पोळी काढली नाही की नेमकी गाय दिसते अश्या वेळी काय करावे सुचत नाही जर तुमच्या बाबतीत असेच घडत असेल तर हा एक साधा उपाय तुम्ही करू शकता.

आपण रोज गाई साठी पोळी काढतो त्यासाठी जेवढे पीठ लागते तेवढे पीठ बाजूला काढावे व 6 ते 7 दिवसानंतर जेवढे पीठ जमा होईल तेवढ्या पोळ्या बनवाव्यात आणि एखादी भाजी बनवावी व तो स्वयंपाक एखाद्या गरीब व गरजू कुटुंबाला देऊन टाकावा किंवा दारावर आलेले याचक असतील कोणी मनोरुग्ण फिरत असतील अश्या कोणालाही आपण स्वयंपाक देऊ शकतो ते व्यक्ती जेवण करून तृप्त होतील.

हे वाचा:   गुपचूप घराच्या छतावर फेका हि १ वस्तू; घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन मिळतील खूप सारे आशीर्वाद.!

म्हणजे ते व्यक्ती जेवण करून आनंदी राहतील. व आपल्याला गायीला पोळी देऊन जे पुण्य मिळणार होते तितकेच पुण्य अशा व्यक्तींना जेवण दिल्याने तितकेच पुण्य आपल्याला मिळेल. त्याशिवाय गायीला पोळी खाऊ न घातल्याचे दु:खही मनामध्ये राहणार नाही. असे केल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला कधीही आणी कश्याचीही कमतरता भासणार नाही.

तर आता आपल्या लक्षात आले असेल की गाईला पोळी टाकण्यासाठी जे आपण पोळी काढतो त्यासाठी जर गाय मिळाली नाही तर काय करावे.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.