कपाटात ठेवा घरातील हि एक वस्तू, कपड्यांवरील येणारा घाणेरडा वास होईल चुटकीत गायब.!

ट्रेंडिंग

भारतात तीन ऋतू असतात उन्हाळा पावसाला व हिवाळा यांमधील पावसाळ्याचा ऋतू हा अत्यंत मनमोही असतो. धरती हिरवी गार होवून जाते मोर नाचू लागतो ढगांचा गडगडाट आपल्याला ऐकू येतो. असे वाटते की निसर्गाने हिरवा शालूच परिधान केला आहे. मात्र या पावसाळ्यात अनेक समस्यांचा देखील आपल्याला समाना करावा लागतो. पावसाळ्यात सुर्य देवाचे दर्शन आपल्याला होत नाही आणि या मुळे वातावरणात ओलावा राहतो या ओलाव्यामुळे आपले कपडे मात्र सुकत नाहीत व जरी सुकले तरी यांना कुबट वास येत राहतो.

या समस्येसाठी आम्ही तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलो आहे होय घरामधील ही एक वस्तू कपड्यांमध्ये ठेवा, पावसाळ्यामध्ये कपड्यांना येणारा कोमट, कुबट आणि घाणेरडा वास अज्जिबात येणार नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला यासाठी एकही रुपया खर्च करण्याची अजिबात गरज नाही. अत्यंत साधा आणि जबरदस्त उपाय आहे. पावसाळ्यामध्ये आपण कितीही सुकवले तरीही त्याला कुबट, कोमट असा वास येतो. कधी कधी तर इतका वास येतो की आपल्यला ते कपडे घातले कि उलटी सारखं होतं. आणि आपण हे कपडे इस्त्री केले तरीही त्याचा वास जात नाही.

त्यासाठी मी तुम्हाला एक अशी भन्नाट आयडिया सांगणार आहे की ज्याने कपड्यांना अजिबात वास येणार नाही, भलेही तुम्ही कितीही चांगले इत्तर वापरा पण पावसात कपड्यांचा वास हा येतोच. पावसाच्या ठिकाणी रहात असले तरीही. सोबतच तुम्हाला हा कुबट वास घालवण्यासाठी कोणत्या ही प्रकारचा जास्त खर्च करण्याची देखील गरज नाही आहे. व या गोष्टीची चिंता देखील करण्याची अजिबात गरज नाही, उपाय अत्यंत साधा आहे.

हे वाचा:   द्रोपदीने केलेल्या “या” चुकीमुळे तिचा मृ’त्यु झाला होता, भीम सोबत केलेली ती गोष्ट ठरली सर्वात..

हा उपाय करण्यासाठी लागत आपल्याला मोठं मीठ. बारीक आणि छोटं मीठ आपल्याला याच्यासाठी वापरायचं नाही. मीठ हे अत्यंत कामाची गोष्ट आहे जेवणातील चवी साठी देखील आपण मीठाच उपयोग करतो सोबतच घसा खराब असला तरी या मीठा द्वारे आपण आपला घसा निट करु शकता. या उपयासाठी आपल्याला दुसरी गोष्ट लागते ती म्हणजे बाजारात मिळणाऱ्या कागद आणि कापड मिक्स असणाऱ्या पिशव्या. आणि जर अशी पिशवी तुमच्याकडे नसेल तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही.

तुम्ही सुती कपड्याचा देखील वापर करू शकता. तर कापाटाला दोन दरवाजे असतात तर एका दरवाजाची आपल्यला १०० ग्रॅम मीठ घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे. आणि कपड्यामध्ये बांधलेलं हे मीठ वर कपाटामध्ये टांगून ठेवायचं आहे किंवा सर्वात खालच्या कप्प्यामध्ये कपड्यांपासून लांब आपल्याला हे ठेवायचं आहे. हे तुम्ही अशाप्रकारे ठेवा कि तुमचा कपड्यांचा वास पूर्णपणे निघून जाईल. तुम्हाला पूर्णपणे वास निघून गेलेलं दिसेल.

हे वाचा:   लग्नाच्या पहिल्या रात्री प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीबरोबर केले पाहिजे हे काम..आयुष्यभर पती तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही..

त्यांनतर तुम्ही कितीही जरी कपडे त्यामध्ये ठेवले तरीही तुम्हाला या कपड्यांचा अजिबात कुबट, कोमट वास येणार नाही. साधारणतः वीस दिवसानंतर पुन्हा हे मीठ बदलायचं आहे. या मिठाला काहीही होत नाही. त्याला पाणी सुटत नाही किंवा वासही येत नाही. काही साइड इफेक्ट होत नाही. पण तरीही आपल्याला हे मीठ वीस दिवसानंतर बदलायचं आहे.

आणि पुन्हा तशाच कपड्यामध्ये त्याचप्रकारे मीठ बांधून ठेवायचे आहे. हा अत्यंत साधा उपाय आहे मित्रांनो तुम्ही करून बघा. तुमच्या कपड्याना अजिबात कुजट, कुबट, कोमट वास येणार नाही. भलेही तुम्ही कितीही पावसाळ्याच्या ठिकाणी राहत असला तरीही. कपड्याना वास येऊ नये म्हणून आता महागड्या परफ्युम्स विकत घेण्याची गरज नाही. हा उपाय नक्की करून बघा मित्रांनो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.