हा पक्षी तुमच्या घरात येत असेल, तर 100% तुमचे दिवस आता बदलणार आहेत…बघा हे असतात यामागे संकेत

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

आपल्याला देवाला भेटायची ओढ असते म्हणून आपण रोज देवपूजा करतो चांगले सत्कर्म करतो या आशेने की देव आपल्यावर प्रसन्न होईल. आपण जे दुःख भोगत आहोत ज्या यातना आपल्याला होत आहेत ज्या गरीबीमधून आपण जात आहोत यातून तोच परमेश्वर आपली सुटका करेल. आपण फक्त सत्कर्म करत राहा आणि संयम ठेवा.

आज आपण जाणून घेणार आहोत आपण केलेल्या सत्कर्माचे फळ देव देवू इच्छितो तेंव्हा देवा कडून कोणते संकेत आपणास नक्की प्राप्त होतात.
देवपूजा करताना जर देवावरचे फुल तुमच्या अंगावर किंवा खाली पडलं. तर तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात आणि लवकरच त्या परमेश्वराची असीम कृपा आपल्यावर व आपल्या कुटुंबावर बरसणार आहे. फुल अंगावर किंवा खाली पडणे हे अत्यंत शुभ संकेत आहेत.

आशा प्रकारे पडलेलं फुल आपण आपल्या घरात जपून ठेवा. पुढील संकेत श्वान म्हणजेच आपल्याला कुत्र्याकडून प्राप्त होतो. तस तर जेंव्हा आपल्या कुंडलीमध्ये शनी, राहू, केतू यांची दशा खराब असते तेंव्हा कुत्रा आपल्या हातून भाकरी, चपाती खात नाही. मात्र जर हा कुत्रा तुमच्या दारात येऊन उभा राहत असेल तुम्ही दिलेली भाकरी, चपाती खात असेल.

तर लक्षात ठेवा हा एक शुभ संकेत आहे आणि आपली चांगली वेळ आलेली आहे. कुत्र्यांपासून अनेक संकेत मिळतात काही संकेत शुभ असतात काही अशुभ असतात.  पुढील संकेत जे पाहुणे न सांगता आपल्या घरी येतात तेच अतिथी असतात. आणि म्हणून आशा प्रकारे अतिथी आल्यानंतर तुमची दिनचर्या बिघडली म्हणून चिडू नका किंवा नाक मुरुडू नका.

हे वाचा:   A अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्ती असतात अशा स्वभावाच्या; जाणून घ्या त्यांच्याबद्दल बरंच काही.!

ज्या घरामध्ये अतिथींचे इच्छे विरुद्ध स्वागत केलं जातं त्या घरात लक्ष्मी सुद्धा राहणं पसंद करत नाही. आणि विशेष करून तुमची बहीण, मुलगी घरी येईल तर ती प्रत्येक्षात लक्ष्मी आलेली आहे असं समजून तीच आपण स्वागत करायला हवं. मोठ्या प्रेमाने घरी आलेल्या अतिथींचे स्वागत आपण करायला पाहिजे.

कारण ज्या घरात अतिथी येतात प्रसन्न चित्ताने राहतात त्या घराचा भाग्योदय आणि नशिबाचे द्वार नक्की उघडतात. अजून एक संकेत जो आपल्याला गाई कडून प्राप्त होतो. गाय जर तुमच्या दारामध्ये किंवा अंगणामध्ये वारंवार येत असेल तर तिला काठीने मारून किंवा हाकलून देण्याची चूक करू नका.

याउलट गाईला हिरवा चारा खाऊ घाला हिरवा चारा नसेल तर भाकरी, चपाती नक्की खाऊ घाला. गाय वारंवार आपल्या अंगणात येणं हे सौभाग्याचं प्रतिक आहे आणि आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न आहे याचा हा संकेत आहेत. जर आपल्या घराच्या आत अंगणामध्ये चिमणी येत असेल तर तिला दाणे नक्की टाका.

हे वाचा:   २४ जून मोठी वटपोर्णिमा: गुपचूप दान करा ही 1 वस्तू वर्षभर पैसा कमी पडणार नाही..पतीला दीर्घायुष्य लाभेल

आपल्या जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या या छोट्याशा उपायाने दूर होतात. मात्र लक्षात ठेवा जेंव्हा छतावर तुम्ही दाणे टाकता तेंव्हा त्या पक्ष्यांची विष्ठा त्याठिकाणी पडू शकते त्यामुळे छत वेळच्या वेळी साफ करणं फार महत्वाचं आहे. अन्यथा विष्ठा साठून राहीली तर अनेक प्रकारचे वास्तुदोष आपल्या घरात उत्पन्न होतात.

आणि आशा घरामध्ये आजारपण, वादविवाद, क्लेश व गरिबी वास करू लागते. जर चिमणीने तुमच्या घरात घरटं बांधलं आणि त्याचे अंडी घातली तर घाबरून जाऊ नका. हा अत्यंत शुभ संकेत आहे आणि लवकरच तुमचे चांगले दिवस येणार आहेत व वाईट वेळ निघून जाणार आहे.

म्हणून आपण चिमणीला दाणे टाका आणि पिण्यासाठी पाणी ठेवा. ज्या घरावर एखाद मोठं संकट येऊ लागते किंवा एखाद विपत्ती येणार असते त्यावेळी त्या घरातून किंवा घराच्या आसपास बाग असेल त्या बागेतून पक्षी निघून जातात. घरामध्ये तुळस असेल तर ती तुळस सुखु लागते.

आशा प्रकारचे संकेत जेंव्हा देवाकडून प्राप्त होऊ लागतील तेंव्हा उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका. पुण्य कर्म करत राहा व गोर गरिबांची सेवा करत राहा.