सध्याच्या दिवसांमध्ये भूक न लागणे ही समस्या अनेकांना उद्भवत आहे.लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण या समस्येला त्रस्त आहे.अनेकदा भूक न लागल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमकुवत होऊन जाते आणि अनेकदा संक्रमणाच्या या काळामध्ये आपली तब्येत पूर्णपणे खराब होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
बहुतेक वेळा बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे लहान मुलांना भूक लागत नाही आणि यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते पण त्याच बरोबर त्यांच्या मध्ये उत्साह जाणवत नाही. अनेकदा ते चिडचिड करत असतात. काही खायला दिले तरी खात नाही त्यांना कोणत्याही प्रकारची चव आवडत नाही अशा वेळी पालकसुद्धा चिंतेमध्ये येऊन जातात म्हणून अशी चिंता दूर करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आम्ही लहान मुलांची भूक वाढीसाठी एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत.
हा उपाय केल्याने लहान मुलांना भूक तर लागणारच आहे पण त्याच बरोबर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा मजबूत बनणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.
लहान मुलांना भूक लागत नसल्यामुळे त्यांना पोषक तत्वांची कमतरता भासू लागते आणि मुले वारंवार आजारी पडू लागतात.
हा उपाय केल्याने मुलांना भूक तर लागणार आहे पण त्याचबरोबर त्यांना शरीराला पोषक तत्व सुद्धा प्राप्त होणार आहे आणि पोषक तत्व शरीराला प्राप्त झाल्यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्तीसुद्धा चांगली होणार आहे.हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते अत्यंत घरगुती आहे. हे पदार्थ घरामध्ये सहज उपलब्ध होणारे आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्या तीन पदार्थ वापरायचे आहे त्यातील पहिला पदार्थ आहे ओवा.
आपण अनेकजण जेवण झाल्यानंतर ओवा खात असतो. ओवा खाल्ल्याने आपल्या शरीराची पचनसंस्था सुद्धा उत्तम रीतीने कार्य करत असते म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी ओवा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहे. पांढरे तीळ मध्ये असे काही पोषकतत्व उपलब्ध असतात ,जे आपल्या शरीराला शक्ती प्रदान करण्याचे कार्य करते आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा सैंधव मीठ घ्यायचे आहे.
हे तिन्ही पदार्थ आपल्याला एकत्र मिक्स करायचे आहे .बहुतेक वेळा लहान मुलांना भूक न लागण्याची कारण सुद्धा वेगवेगळी असू शकतात. अनेकदा लहान मुलांनी हेपिटायटीस बी ची लस घेतली असेल तरीही त्यांना भूक कमी लागू शकते किंवा लहान मुलांच्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तरी यामुळे लहान मुलं कमी प्रमाणामध्ये जेवतात.
जर तुमची लहान मुलं दिवसभर बाहेर चे पदार्थ म्हणजे चॉकलेट, वेफर अन्य पदार्थ खात असतील तरी त्यांना भूक कमी लागू शकते किंवा त्याच बरोबर जर गोड पदार्थ जास्त खात असतील त्यामुळे सुद्धा अनेक मुलांना भूक कमी लागते.
हा उपाय आपल्याला लहान मुलांना जेवण झाल्यानंतर करायचं आहे यामुळे मुलांना दुसऱ्या दिवशी भूक मोठ्या प्रमाणावर लागेल कारण की या पदार्थामुळे मुलांची पचनसंस्था सुधारण्यास मदत होणार आहे आणि पोट व्यवस्थित स्वच्छ झाले तर मुलांना भूक सुद्धा लागणार आहे अशा प्रकारे आपल्याला हा उपाय महिनाभर तरी करायचा आहे यामुळे तुमच्या मुलांची भूक वाढणार आहे.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.