या पृथ्वीतलवार अनेक प्रकारची माणसे राहतात आणि त्यांना विविध प्रकारच्या सवयी असतात. काही लोकांना नखे खाण्याची सवय असते तर काहींना बसल्या-बसल्या पाय हलवायची. काही सवयी चांगल्या असतात तर काही वाईट. चांगल्या सवयी लागल्या तर चांगली गोष्ट आहे पण वाईट सवयी लागल्या तर आयुष्य बरबाद होण्यास वेळ लागत नाही.
काहींना काम करुन कंटाळा आल्यावर बोटे मोडण्याची सवय असते. बोटे मोडल्यानंतर बोटांना खूप आराम मिळतो. पण ही सवय तुम्हाला खूप मोठ्या आजारात जकडू शकते. हातांची बोटे मोडणे हे आपल्या आरोग्यासाठी खूपच नुकसानदायक आहे. बोटे मोडल्याणे आपल्या बोटांच्या हाडांंना काही काळासाठी आराम मिळतो परंतू यामुळेच आपल्या हाडांना खोल वर इजा होते.
बोटांच्या पेरामध्ये सिनोवियल नावाचं फ्लूइड असते आणि हा पदार्थ बोटांच्या पेरामध्ये ग्रीसच काम करतो व हाडांची झिज होण्यापासून रोखतो. बोटे सारखी मोडल्याणे हे फ्लूइड कमी होते आणि बोटांची पेरे ठिसूळ बनतात.
त्याचबरोबर या सवयीमुळे बोटांचे स्नायू कमकुवत होतात म्हणूनच बोटे मोडण्याची सवय लवकरात लवकर सोडून द्या. पुढील काही उपाय करुन तुम्ही बोटे मोडण्याची सवय सोडू शकता. हाथामध्ये कायम पेन अथवा नाणे ठेवा. हाथामध्ये रबर ठेवा यामुळे तुमचे हाथ कायम व्यस्त राहतील. याशिवाय डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.