घरात १२ चुका आणतात गरिबी. घरात आपल्या सकारात्मक उर्जेच कारण म्हणजे देवघर. या देवघरात अनेक देवीदेवतांची फोटो ठेवलेली असतात. आपल्या घरात सुख समृद्धी यावी,नांदावी यासाठी आपण पुजा करतो.मात्र पुजा करता करता आपल्या हातून काही चुका होता की सकारात्मते च उर्जेच असणारा हे देवघर बाधाचे घर बनते. आपल्या मर्गा मध्ये कार्यामध्ये अडथळे येतात.वास्तुदोष उत्पन्न होतो.आता जाणून घेऊया की देवपूजा करताना कोणती काळजी घावी.
त्या चुका कटाक्षाने कश्या टाळाव्यात. देव पूजा करताना एक चूक जी आहे ती सर्वांकडून होत आहे. ती म्हणजे चामड्याच्या वस्तूंचा वापर. हिंदू धर्मानुसार चामड्याची वस्तू किंवा चामडं हे अधार्मिक आहे. पुरुषांच्या बाबतीत चामड्याचा बेल्ट लावून पुरुष देवपूजा करताना अनेक जण आढळतात. महिलांच्या बाबतीत जेव्हा महिला घराच्या बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या खांद्याला चामड्याची पर्स लटकवलेली दिसते.
चामड्याच्या वस्तू व आधार्मिक आहे आणि त्यांचाच स्पर्श आपल्या शरीराला जेव्हा जेव्हा होईल तेव्हा आपण देव दर्शन घेणे ,देव पूजा करणे कटाक्षाने टाळावे. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक जणांचा देवघर हे बेडरूममध्ये असतं. अनेक जण म्हणतात जागेचा प्रॉब्लेम आहे, जास्त स्पेस नाहीये तसेच काही प्रॉब्लेम नाही आहे. वास्तुशास्त्रानुसार बेडरूम मध्ये देवघर नसावं. बेडरूम मध्ये देवघर असेल तर एक लाल रंगाचा पडदा अवश्य लावा जेणेकरून बेडरूमचे जे दोष आहे ते देवघराला बाधित करणार नाही.
तसेच आपलं देवघर आपल्या शौचालय चा किंवा बाथरूमच्या भिंतीस अजिबातच लावू नये. कारण ही दोन जागा निगेटीव म्हणेजच नकारात्मक ऊर्जा निर्माण करणार केंद्र आहे आणि म्हणनच त्यांच्या जास्तीच जास्ती अंतरावर स्थापना करायला हवी आणि तुमच्या घरामध्ये तीन गणेश मुर्त्या असतील तर तीन गणेश मुर्त्या ठेवू नये. तीन हा अंक मधून एक किंवा दोन गणेश मुर्त्या ठेवू शकतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये तीन गणेश मुर्त्या आपल्या देवघरामध्ये स्थापित करू नये.
त्यामुळे श्रीगणेश पासून मिळणारे फळांपासून अनेक बाधा निर्माण होतात . दुसरी गोष्ट जर तुमचा देवघरामध्ये शिवलिंग असेल जर तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असाल तर लिंगाचा आकार अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या अंगठ्याच्या मोठ्या आकाराचं शिवलिंग आपल्या देवघरात नसावं. जर तुमच्या देवघरामध्ये शंख असेल तर देवघरामध्ये दोन शंख ठेवणे अशुभ मानले जाते. अनेकांच्या देवघरामध्ये खूप जुन्या मूर्ती, तुटलेली मूर्ती ,खंडित झालेली मूर्ती या अशा मूर्ती आपण ताबडतोब विसर्जित कराव्यात.
कोणत्याही पिंपळाच्या वृक्षाखाली किंवा मोठ्या दगडाखाली या मुर्त्या आपण ठेवू शकता तसेच दिवा हा देवता समान मानला जातो. दिवा हा एक देवतांचा रूप आहे. तसेच हा दिवा सुद्धा खराब तुटलेला असू नये. अनेक घरांमध्ये देवी-देवतांना जो नेवेद्य भोजन लावलेला असतात तो तसाच ठेवलेला असतो. अनेक दिवस तसाच असतो त्याच प्रमाणे जेव्हा आपण देवी-देवतांना भोग लावतो, नैवद्य दाखवतो त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच तिकडची साफ-सफाई करावी.
त्याचप्रमाणे पूर्वजांचे फोटो सुद्धा देवघरात स्थापित करतात. पूर्वजांचे आणि देवी-देवतांचे तुलना होऊ शकत नाही म्हणून पूर्वजांचे फोटो कुठे लावावे आणि कोणत्या भिंतीवर लावावे त्याची माहिती करून घ्यावी.त्याचप्रमाणे देवी-देवतांना फुलं अर्पण करताना ती आधी स्वच्छ पाण्याने धुऊन मगच अर्पण करावी. जेव्हा तुम्ही देवी दैवतांना दिवा प्रज्वलित करतात तेव्हा तर तो दिवा एकदा तुपाचा किंवा तेलाचा असावा. तेल तुपाचा दोन्ही दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकतात.
तसेच एक लक्षात असू द्या की, तुपाचा दिवा आपल्या उजव्या हातास असू द्या आणि जो तेलाचा दिवा आहे तो डाव्या हातास असावा. जर तुम्ही काही विशिष्ट उपाय करत आहात तेव्हा मात्र हा नियम उलटा होऊ शकतो. दिवा लावताना आपली पूजा जोपर्यंत समाप्त होत नाही तोपर्यंत आपला दिवा प्रचलित असला पाहिजे. त्याची आपण काळजी घ्या. जर आपल्या रूम मध्ये फॅन असेल किंवा वारा वेगाने येत असेल तर खिडकी बंद करा,आपली देवपूजा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हा दिवा विझता कामा नये.
देव पूजा चालू असताना दिवा भिजणे हा एक मोठा अपशकून मानला जातो. तसेच आपल्या कामांमध्ये अडथळे येणार आहे असे मानले जाते. आपल्याला आपल्या पूजेचे पूर्णपणे फळ मिळणार नाही असा याचा अर्थ होतो.जर पूजा करत असताना जर तुम्हाला कोणी आवाज दिला किंवा कोणाचा फोन आला काही काम असलं तरीही पूजा अर्धवट सोडून तुम्ही जाऊ नका. पूजा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत इतर कामे करायची नाही.
देवी-देवतांना हळदी कुंकू लावताना आपण अनामिका या बोटाचा वापर करा तसेच देवी दैवतांना करंगळीचे बाजूचे बोट असते त्याला अनामिका असे म्हणतो याच अनामिके चा वापर करावा. पुरुषांना हळदी कुंकू लावताना तर्जेनी बाजूचा म्हणजेच अंगठ्याचा वापर करावा. देवपूजा करत असताना शिंका किंवा जांभळी या गोष्टींपासून लांब राहावं. जर तुम्हाला जांभळी येत असेल तर देवपुजे सुरू करत असताना च्या आधीच हात पाय तोंड स्वच्छ धुवावे जेणे करून आपला आळस निघून जाईल.
देवपूजा करत असताना आळस किंवा जांभळे देणे हे अधार्मिक मानल जातं. आणि त्यामुळे देवपूजेचे फळ आपल्यास पूर्णपणे प्राप्त होत नाही.जर तुम्हाला देवपूजा करताना शिंका आले तर तुम्ही जरूर शिंका काही थांबवू शकत नाही जर थांबवली तर आपल्या शरीरामध्ये अनेक आजार निर्माण दोष निर्माण होऊ शकतात त्यामुळे अवश्य शिंका व शिंकून झाल्यानंतर आपले हात स्वच्छ धुवायचे आहे.
त्यानंतर कोणताही अपराधी भाव मनात न बाळगता पुन्हा एकदा आपल्या देवघरात बसून देव पुजा करायची आहे. तसेच देवपूजा करताना श्रद्धा महत्वाची आहे. जर आपण पूजा मनोभावे श्रद्धाने करत असलो तर आपल्या हातून छोटी मोठी चूक घडलेली असेल तर आपला ईश्वर नक्कीच माफ करेल जर आपण जाणून बुजून असं करत असाल तर आपल्याला आपल्या पूजेचा फळ मिळणार नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.