वांग घालवण्यासाठी सोपे घरगुती जबरदस्त उपाय..एका रात्रीत काळे डाग, वांग गायब होण्यास सुरुवात..

आरोग्य

आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स घालवण्यासाठी आपण विविध गोष्टींचा वापर करतो. कधी कधी तर त्यासाठी बाजारात मिळणारे औ’षधे देखील वापरतो.डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे असतील तर आपल्या सौंदर्यामध्ये निश्चितच बाधा निर्माण होते त्यामुळे प्रत्येकालाच वाटते की आपला चेहरा सुंदर आणि तजेलदार दिसावा.

अनेकदा चेहऱ्यावर काळे डाग येतात ज्याला ग्रामीण भाषेत वांग असे म्हणतात. हे काळे डाग सूर्याची प्रखर अतिनील किरणे, विविध प्रकारची औ’षधे, ऍलर्जी अशा अनेक कारणांमुळे येऊ शकतात. चेहऱ्यावर आलेल्या वांगामुळे चेहरा निस्तेज होतो आणि यामुळे अनेक जण निराश होतात, सेल्फ कॉन्फिडन्स गमवून बसतात. परंतु या वांग पासून सुटका मिळवण्यासाठी आज आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग दूर होण्यास मदत होईल आणि तुमचा चेहरा पुन्हा उजाळेल. हा घरगुती उपाय आपल्यासाठी खूपच स्वस्त पण परिणामकारक, आयुर्वेदिक असाच आहे. हा उपाय अतिशय स्वस्तात करता येण्यासारखा आहे, अगदी एक रुपयांपेक्षाही कमी खर्च यासाठी लागणार आहे आणि सर्वांना करता येण्याजोगा हा अतिशय सोपा आणि सुटसुटीत आहे.

हे वाचा:   फक्त ३ चमचे तांदूळ असे वापरा; पांढरे केस काळे करणारा असा आयुर्वेदिक घरगुती उपाय.!

हा उपाय करण्याची पद्धत अत्यंत साधी आणि सोपी आहे, यासाठी पहिला घटक आपल्याला लागणार आहे, तो चांगल्या कंपनीचे खोबरेल तेल. यासाठी तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचे शुद्ध असे खोबरेल तेल जे तुम्ही दोन चमचे एका वाटीत घ्यायच आहे. त्यानंतर हे तेल गरम करायचे आहे आणि त्यानंतर हे तेल थोडे कोमट होवू द्यायचे आहे .

असे गरम करून घेतल्यानंतर या तेलाची गुणवत्ता खूप अधिक पटींनी वाढते. खोबरेल तेल हे कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी अतिशय चांगल असते. खोबरेल तेलामध्ये भरपूर प्रमाणात फॅटी ऍसिड असतात तसेच या तेलांमध्ये अँटिव्हायरस ,अँटी फंगल गुणधर्म असतात , अशा गुणकारी तेलामुळे चेहऱ्यावरील काळे डाग पिंपल्स मुळापासून नष्ट होतात. यामध्ये दुसरा अतिशय महत्त्वाचा घटक आपण टाकणार आहोत तो म्हणजे पूजेतील कापूर, कापूर आयुर्वेदामध्ये सौंदर्यवर्धक मानला जातो.

हे वाचा:   पुरुषांसाठी मोठ्या कामाची वस्तू आहे, “जाणून घ्या” याचे अजब फायदे..आपला स्टामिना आणि वेळ वाढवयाचा असेल तर करा याचा उपयोग..

आज पर्यंत तुम्ही कापूर फक्त पूजेसाठी किंवा आरती करताना वापरला असेल पण कापूर आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असतो, त्याचा उपयोग अनेक प्रकारचे त्वचा विकार नष्ट करण्यासाठी होत असतो. डोळ्याखालील काळी वर्तुळे त्यांना दूर करण्यासाठी केला जातो. कापरामध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात ,असा हा बहुगुणी कापूर चे 3 वड्या घ्यायचे आहेत.

कापूर अखंडपणे वड्या न घेता बारीक कुस्करून त्यात खोबरेल तेलामध्ये टाकायचा आहे . आता हे कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे, असे हे व्यवस्थित एकजीव झालेले मिश्रण गोलाकृती वर्तुळाकार पद्धतीने चेहऱ्याला जिथे काळे डाग आहेत तिथे लावायचे आहे.

अशा या शंभर टक्के न्याचरल आणि शंभर टक्के सुरक्षित घरगुती उपायामुळे तीन दिवसातच तुम्हाला फरक अनुभवायला मिळेल. जर प्रमाण जास्त असेल तर आठवड्यातून 2 वेळा करावा, योग्य ती त्वचेची काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे.