प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये मैत्री ही खूप महत्वाची असते. मैत्री म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल असणारा आदर, प्रेम आणि आपुलकी. मित्रांशिवाय आपले जीवन हे अधुरे आहे. तसेच एक चांगला मित्र हा आपल्या सुख दुःखात आपल्याला साथ देतो. जेव्हा आपण एखाद्या अडचणीत असतो तेव्हा तो आपल्या पाठीशी खंभीरपणे उभा राहतो. तसेच तो आपल्या समस्या दूर करतो आणि सांत्वन देतो.
तसा माझा मित्र तब्बल 12 वर्षांनी भेटला होता. बर्याच वर्षापूर्वी आमच्यात वाद निर्माण झाला होता. पण त्याचं नेमकं कारण आठवत नव्हतं ,काही कारणांमुळे आमचे नाते तुटले होते. तो अचानक समोर आल्याने मला माझा अहंकार काही पुढच्या बाजूला सारता आला नाही आणि मी त्याला अचानक उपरती होण्यामागचं कारण ? चेहऱ्यावर शक्य तेवढा माज ठेवून ! त्यावर तो म्हणाला की दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक समजली.
आपण कॉलेजमध्ये थर्ड इयरला असताना तू एक रफू केलेली पॅंट घालून आला होतास ,तेव्हा नेमकं ते माझ्या लक्षात आलं आणि मग मी त्याविषयी खुप जणांना सांगून त्याचा बाजार मांडला. तसेच वर्गात सर्वांना सांगून सर्वजण तुझ्याकडे कधी बघून बघून हसतील याची सोय केली.
त्यानंतर तू माझ्यावर रागावून आपलं नात कायमचंच तो-डलं. मी तुझी किमान 20 वेळा मागितलेली माफीही मला अजून आठवते. त्यावेळी तू मला म्हणाला होतास की “देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येऊ नये”. ती वेळ दोन महिन्यांपूर्वी माझ्या वर आली , तेव्हा मी ते होल नाही शिऊ शकलो आणि माझा पोटचा मुलगा गमावून बसलो.
माझ्याकडचा सर्व पैसा ओतून ही तो वाचला नाही त्याच्या हृदयात छेद झाले होते. ते छिद्र माझ्या मुलाच्या हृदयात झालं. त्यामुळे मी तुझ्याकडे आलोय तुझी माफी मागायला आणि आपले नाते टिकवायला. माझी सर्व दुःख सांगायला , मनापासून रडायला. मी हे संवेदनशील पणे ऐकत उभा होतो तुझा देव करो आणि तुझ्या ही वेळ न येवो असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता.
आम्ही एकमेकांना मिठी मा-रून एकमेकांचे खांदे रडवून भिजवू लागलो. त्याने नकळत केलेल्या पापातून आणि मी नकळत दिलेल्या शापातून मुक्त होण्याचे बघत होतो. दोघे मिळून आमचं नातं नव्याने रफू करू पाहत होतो. तसेच मनुष्य ज न्म एकदाच मिळतो त्यामुळे मिळालेले हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावण्याचा सदैव प्रयत्न आपला असला पाहिजे.
कारण आपल्या सर्व नातेसं-बंधांना आपण वेळेवर जपले पाहिजे तसेच सर्वांच मन दुखावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपले मित्र , नातेवाईक, शेजारी, सहकारी आर्थिक व सामाजिक परिस्थितीने कमी असले तरी त्यांच्यात कधीच अपमान करू नका. सर्वाशी प्रेमाने वागा.
साहेब विश्वास नांगरे पाटील यांनी ही कथा आपल्या एका भाषणात सांगितली होती. याद्वारे त्यांनी आपल्या मित्राची थट्टा नाहीतर साथ कशी निभवावी याबद्दल आपले विचार मांडले होते..