तुमच्या घरातील लाईटबील जास्त का येते.? जाणून घ्या नाहीतर असेच लुटले जाल.!

सामान्य ज्ञान

आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक आगळावेगळा विषय आणि तुमच्या साठी अत्यंत महत्त्वाचा असा विषय म्हणजे लाईट, टीव्ही घर कामामुळे तुमचे इलेक्ट्रिसिटी बिल जास्तीचे येते आणि इलेक्ट्रिसिटी बिल जास्त आले तर आपण चिंता करू लागतो.अनेकदा आपण स्वतः जास्त बिल वापरले आहे या नावाने बोंबा मारत असतो परंतु असे कधी कधी घडत नाही त्यामागे कारणे सुद्धा वेगवेगळे असतात.

या सर्वांविषयी सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. या लेखामध्ये आपण एम एस सी बी बद्दल एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या लाईट बिलची ग्राहकांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्याला येणारे लाईट बिल हे विद्युत मंडळाच्या काही नियमामुळे सुद्धा वाढण्याची शक्यता असते.

शंभर पर्यंत रीडींग गेल्यावर तीन रुपये पंच्या हत्तर पैसे हे रीडिंग असते परंतु तीस दिवसानंतर घेतल्यामुळे शंभरच्यावर रीडींग गेल्यास हे दर दुप्पट म्हणजे सात रुपये पंचवीस पैसे होतात ते कसे? जर समजा आपल्या प्रत्येक दिवसाला कर्मचारी जर रीडिंग घेत असतील तर शंभरच्या आत रीडिंग येते. आपली त्या ठिकाणी जर एखाद्या महिन्यांमध्ये दहा दिवस वाढले तर रीडिंग पुढे गेली तर आपल्याला पूर्ण रीडिंग ला सात रुपये वीस पैसे प्रतियुनिट हे चार्जेस लागतात.

जर तीनशेच्या वर रीडिंग गेले असतील तर म्हणजे नऊ रुपये पंच्यांनव पैसे तर पाचशेच्या वर गेल्यास अकरा रुपये तीस पैसे तेवढे चार्जेस लागतात हेच एकमेव कारण आहेत ज्यामुळे आपले बिल आहे ते भरपूर जास्त येते.

आता हे बिल कमी येण्यासाठी ग्राहकांनीच काळजी घेणे गरजेचे आहे कारण की सध्याच्या परिस्थितीमुळे खर्च भरपूर प्रमाणात वाढलेले आहे आणि त्यामुळे आपले लाईट बिल कशा पद्धतीने कमी येईल याची काळजीसुद्धा आपल्यालाच करायचे आहे आणि आपण विशिष्ट प्रकारची काळजी घेतल्यास आपले लाईट बिल नक्की कमी येईल. जेव्हा आपल्या घरी विद्युत कर्मचारी व्यक्ती येतो तेव्हा मिटर रिडींग घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, घेतल्या तारखेची त्याची सही,ओळखपत्र घ्यायचे आहे.

हे वाचा:   चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राचा काय असतो अर्थ.? जाणाल तर व्हाल आश्चर्यचकित.!

पुढल्या वेळी हेच रीडिंग तीस दिवसानंतर घेतले जाते का याची नोंद आपल्याला घ्यायची आहे. जर कर्मचारी तीस दिवसानंतर रीडिंग घ्यायला आला तर त्याला आपल्या मीटरचे रीडिंग घेऊ द्यायचे नाही आणि त्याची तक्रार त्वरित विद्युत मंडळाकडे करावी व ही तक्रार आपण लेखी स्वरूपामध्ये करायची आहे.

बिल्डींग ,सोसायटी असल्यास बिल्डिंगच्या सेक्रेटरीने या सगळ्या गोष्टी आपल्या वॉच मेन यांच्या माध्यमातून करायला हव्यात जेणेकरून विद्युत कर्मचारी किंवा मिटर रिडींग घ्यायला व्यक्ती येतात याबद्दल आपल्याला कल्पना येऊ शकते. वाढीव बिल संदर्भात काही कायदे सुद्धा निर्माण करण्यात आलेले आहे आणि या कायद्याची अंमलबजावणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते.

जेव्हा एखाद्या व्यक्तीचे बिल भरपूर प्रमाणामध्ये येत असते तेव्हा अशा व्यक्तीला कायद्याची चौकट सुद्धा प्राप्त करता येते आणि या कायद्याच्या माध्यमातून असतो आपले संरक्षण हक्क प्राप्त करू शकतो म्हणूनच 2003 यावर्षी विद्युत कायदा पास करण्यात आला. जर आपण नवीन मीटर साठी मागणी केली असेल तर तीस दिवसाच्या आत जर आपल्याला विद्युत जोडणी झाली नाही तर पर दिवस शंभर रुपये याप्रमाणे ग्राहकांना भरपाई मिळते.

जर ट्रांसफार्मर बिघडला असल्यास वीज कंपनी 48 तासांच्या आत दुरुस्त करणे गरजेचे ठरते. तसे न केल्यास प्रति तास पन्नास रुपये नुकसानभरपाई ग्राहकांना द्यावी लागते. त्याचबरोबर ग्राहकांना स्वतःचे मीटर लावण्याचा अधिकार आहे परंतु या मीटर लॅब मध्ये टेस्टिंग होते आणि टेस्टिंग केल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट प्राप्त होते तेव्हाच तुम्ही स्वतःच मीटर लावू शकता.

हे वाचा:   मुंबईच्या ताज हॉटेलची कमाई आणि तेथे काम करणाऱ्या वेटर चा पगार ऐकून तुम्हीही चकित व्हाल.!

वीज कायदा 2003 कलम 55 अंतर्गत तुम्ही स्वतः चे मिटर लावू शकतात. जर विद्युत कर्मचाऱ्यांनी बिल आकारलेल्या आहे परंतु त्या मीटर चे फोटो काढले नसेल जर तुमचे मीटर शेतामध्ये असेल तरी त्या मीटरचे फोटो काढणे अनिवार्य आहे. जर असे केले नाही तर ते मीटर रीडिंग बेकायदेशीर ठरते. जर असे घडल्यास ग्राहकांना प्रति आठवडा शंभर रुपये नुकसानभरपाई मिळते.

जर तुमचे बिल थकलेले असेल काही कारणास्तव तुम्ही ते भरले नसेल तर अशावेळी विद्युत कर्मचारी लगेच वीज पुरवठा खंडित करू शकत नाही. विद्युत कर्मचारी यांना साधारणपणे तीन वेळा लेखी सूचना दिल्यानंतरच ते तुमच्या घरातील वीज पुरवठा खंडित करू शकतात. खेड्यामध्ये रात्री वीज असणे अनिवार्य आहे. बैल, मनुष्य,गाय व इतर प्राणी विजेचा शॉक लागून जर त्याच जागेवर मृत्यू झाला तर त्याची नुकसान भरपाई करून देणे विद्युत मंडळाच्या अंतर्गत असते.

जर एखाद्या व्यक्तीचा वीज शॉकने मृत्यू झाला तर त्याला मनुष्यहानी पाच लाख रुपये देणे असे विद्युत कायदा 2003 अंतर्गत सांगण्यात आलेले आहे. तर मंडळी हे होते काही वीज संदर्भातील कायदे जे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे बहुतेक वेळा आपल्याला वीज कायद्या बद्दल माहिती नसल्यामुळे अनेकदा आपली फसवणूक सुद्धा होत असते आणि जर हे कायदे आपल्याला माहिती असल्यास आपण वीज कर्मचाऱ्यांच्या सोबत व्यवस्थित संवाद साधू शकतो आणि आपल्या ज्या काही तक्रारी आहेत त्या आपण विद्युत मंडळाकडे नोंदवू शकतो जर तुम्हाला लेख आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.