गाडी मध्ये कोणते पेट्रोल भरावे साधे किंवा प्रीमियम.? कोणते पेट्रोल असते गाडीसाठी जास्त फायदेशीर.!

सामान्य ज्ञान

आपल्या सगळ्यांकडे गाडी असते आणि या गाडीमध्ये आपण नेमके कोणते पेट्रोल भरावे.साधे पेट्रोल भरावे की प्रीमियम पेट्रोल भरावे?दोघांचे किमती मध्ये काय फरक असतो? दोघांमधील गुणवत्तेमध्ये काय फरक असतो याबद्दलची माहिती आपल्या अनेकांना फारशी माहिती नसते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला या बद्दल महत्वाची माहिती सांगणार आहोत.

तसे तर पाहायला गेले तर दोन्ही पेट्रोल सारखे असते परंतु या दोघांमधील ऑक्टेनची मात्रता वेगवेगळे असते साधारण पेट्रोलमध्ये ऑक्टेनची मात्रता 87 असते तर प्रेमियम पेट्रोलमध्ये ऑक्टेन मात्रता 91 एवढी असते. सध्या काही दिवसांमध्ये इंडियन ऑइल-पेट्रोल ने एक्सपी हंड्रेड आणलेले आहे आणि त्याचे टॉप टेन हंड्रेड हणून हे पेट्रोल बाजारांमध्ये विकत असताना प्रीमियम पेट्रोल म्हणून बाजारात विकतात.

जेव्हा आपण पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला जातो तेव्हा प्रीमियम पेट्रोलचे भाव साधारण पेट्रोल पेक्षा 15 ते 20 रुपये प्रमाणे जास्त असतात. ज्या काही हाई मायलेज गाडी असतात त्यांना अशा वेळी चांगल्या गुणवत्तेचे पेट्रोल असून सुद्धा तेवढा मायलेज महत्त्वाचा असतो यामुळे गाडीला गती सुद्धा तेवढीच प्राप्त होत असते. अनेक पेट्रोल कंपनी असा दावा करीत असतात की प्रीमियम पेट्रोल वापरल्याने गाडी चांगल्या पद्धतीची मायलेज देत असते आणि त्याचबरोबर कमी पोल्युशन सुद्धा करत असतात.

हे वाचा:   पन्हाळगडाला वेढा देणाऱ्या सिद्धी जौहरचा मृत्यू कसा झाला ? एक रहस्य..माहित नसलेला इतिहास जाणून घ्या..महाराजांनी कशाप्रकारे युक्ती केली पहा..

आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की कार मध्ये प्रीमियम पेट्रोल भरायला हवे की नाही तर प्रेम पेट्रोल भरण्याआधी गाडीचे मॅन्युअल वाचायला हवे. जर मॅन्युअल मध्ये तुमच्या कार साठी साधारण पेट्रोल भरण्याचा सल्ला दिला असेल तर अशावेळी प्रीमियम पेट्रोल आजिबात भरू नये. असे केल्यामुळे तुमच्या कारचे इंजिन ला नुकसान सहन करावे लागू शकते.

जर तुमची कार हाय ऑक्टेन परफॉर्मन्स देणारी नसेल तर चुकून सुद्धा यामध्ये प्रेमियम पेट्रोल भरू नये अन्यथा इंजिन ला नुकसान भोगावे लागू शकते त्याच बरोबर जर तुमच्या कारचे इंजिन टरबो नसेल तर अशा वेळीसुद्धा प्रीमियम पेट्रोल भरू नये. प्रिमिअम पेट्रोल अशा व्यक्तींसाठी चांगले आहे ज्यांच्याजवळ हाई टर्बो वाली कार आहे त्यांनीच प्रेम पेट्रोल भरावी अन्यथा साधारण पेट्रोल तुमच्या गाडी साठी उपयुक्त आहे.

हे वाचा:   एक चमचा ही १ वस्तू अशी वापरा..फक्त 2 मिनिटात धान्यातील किडे पळून जातील, पुन्हा धान्यात किडे कधीच होणार नाही..

म्हणून अशावेळी तुमच्या कार च्या मॅन्युअल मध्ये तुमच्या गाडीसाठी जे गुणवत्तेचे पेट्रोल सांगितलेले आहे तेच पेट्रोल गाडी साठी भरणे आवश्यक आहे यामुळे तुमची गाडी जास्त कालावधी पर्यंत चांगली मायलेज सुद्धा देत असते जर आपण मेनूमध्ये सांगितल्या पेक्षा वेगळे पेट्रोल दर भरण्याचा प्रयत्न केला तर त्याचा गाडीचे इंजिन वर परिणाम होऊ शकतो आणि परिणामी गाडीचे इंजिन लवकर खराब होऊ शकते म्हणूनच तुमच्या गाडीच्या आवश्यकतेनुसार व गरजेनुसार पेट्रोल भरणे नेहमी चांगले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.