न मारता उंदीर घरातून बाहेर जातील; परत यायची पुन्हा हिम्मतच करणार नाहीत.!

आरोग्य

घरामध्ये उंदीर झाले असल्यास त्याचा खूप त्रास होत असतो. उंदीर पळवण्यासाठी आपण घरगुती उपाय करणार आहोत. हा उपाय केल्याने सहजच घरातील उंदीर बाहेर निघून जाण्यास मदत होते तसेच घरामध्ये लहान मुलं असल्यास सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात कारण जेणेकरून याच्यामध्ये कोणतेही पॉइजन, विष यासारखे घटक पदार्थ काही नाही त्याचप्रमाणे बरेच जण उंदीर पकडण्यासाठी पिंजराचा वापर करतात.

एकदा पिंजरा लावल्यानंतर त्याच्यामध्ये एक उंदीर अडकला की दुसऱ्यांदा तसाच तो पिंजरा लावतात. तसे केल्याने आधीचा हा जो उंदीर असतो त्याच्या वासाने दुसरा उंदीर येत नाही म्हणूनच दुसऱ्यांदा पिंजरा लावताना तो पिंजरा स्वच्छ पाण्याने धुऊन मगच तो लावावा मगच उंदीर त्याच्यामध्ये अडकेल. त्याच प्रमाणे आपण दुसरा घरगुती नॅचरल उपाय आपण जाणून घेणार आहोत.

जेणेकरून उंदीर सहज घराबाहेर निघतील त्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे एक चमचा गव्हाचे पीठ आणि त्यामध्ये थोडेसे साजूक तूप टाकायचे आहे.साजूक तुपाचा देखील उंदरांना त्रास होत असतो, त्या वासाने देखील उंदीर घराच्या बाहेर पळून जाण्यास मदत होते तसेच त्यानंतर एक चमचा भरून तंबाखू त्यामध्ये टाकायची आहे आणि तसेच ते थोडं पाणी टाकून ते पिठासारखे मळून घ्यायचा आहे.

हे वाचा:   रात्री भिजवून ठेवा, सकाळी प्या, वजन कमी होतांना स्वतः पहा ! नैसर्गिक रित्या वजन कमी करण्याचा जबरदस्त उपाय..

त्यानंतर मळून झालेल्या गोळ्याला वरतून सुद्धा तूप लावायचे आहे त्यानंतर त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला असे वाटत असेल की ज्या ठिकाणाहून उंदीर येत असतील त्या ठिकाणी एका प्लास्टिकवर किवा पेपरावर ते बॉल्स ठेवून द्यायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला असे वाटत असेल त्या त्या ठिकाणी उंदीर येऊ शकतात त्या त्या ठिकाणी हे बॉल्स ठेवायचे आहे.

त्याचप्रमाणे असे केल्याने घरातील उंदीर बाहेर निघून जाण्यास मदत होते.तो बॉल्स खाल्ल्याने उंदराचा जीव कासावीस होतो.हे खाल्ल्यामुळे उंदराचा जीव कासावीस होतो ,त्यांना पाणी प्यावेसे वाटते त्यामुळे कोणत्याही ठिकाणी पाणी ठेवू नये आणि एखादी कोणती तरी खिडकी उघडी ठेवा जेणेकरून ते बाहेर पडतील.

हे वाचा:   हि ३ पाने वापरून झटक्यात होतील हे १० आजार बरे; मुतखडा, मधुमेहयासारखे आजार होतील कायमचे नाहीसे.!

जर तुम्ही खिडकी उघडी नाही ठेवली तर ते खाऊन त्यांचा जीव कासावीस होऊन तिथेच मरून जातील म्हणून हा उपाय करताना पाणी उघडे ठेवू नका आणि खिडकी थोडीशी उघडे ठेवा. या उपायाने नक्कीच उंदीर घराच्या बाहेर निघून जातील.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.