दत्तगुरूंच्या सहवासातील असलेल्या उंबराचे औषधी गुण ऐकून तुम्ही नक्कीच चकित व्हाल.!

आरोग्य

श्री गुरुदेव दत्त या झाडाखाली उपलब्ध असतात, ज्या झाडाखाली त्यांचे स्थान असते अशी मान्यता असणारे एकमेव झाड म्हणजे उंबराचे झाड. उंबराचे झाड हे अध्यात्मिक दृष्ट्या व आयुर्वेदिक दृष्ट्या अत्यंत संपन्न मानले गेलेले आहे.या उंबराचे पान, फळ ,फूल, साल, खोड ही सर्व घटक अतिशय औषधी मानले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या झाडाला खूपच महत्व प्राप्त झालेले आहे. उंबराचे फळ हे चवीला तुरट असते.

बहुसंख्य त्वचाविकार दूर करणारा, अपचन ॲसिडिटी दूर करणारा तसेच पचनातील अग्नी मंद करणारा अनेक आजारांवर रामबाण म्हणून या झाडाकडे पाहिले जाते. जर तुम्हाला चटका लागलेला आहे, भाजल्यामुळे वेदना भरपूर होत असतील तर अशा वेळी आपण या झाडाची साल भाजलेल्या ठिकाणी लावल्यास वेदना कमी होते.

उंबराचे फळ अत्यंत आरोग्यदायी आहे.आपल्या शरीरामधून जो स्त्राव निघत असतो तो स्त्राव शुद्ध करण्यासाठी उंबराचे फळ आयुर्वेदीक ठरते म्हणजेच की रक्त लघवी मध्ये दूषित पण असतो तो स्वच्छ करण्याचे कार्य हे फळ करत असते त्याचबरोबर पुरुषांच्या शरीरामधील वीर्य पातळ असेल तर ते वीर्य घट्ट करण्याचे कार्य सुद्धा उंबराचे फळ करते. या झाडाचे मूळ तुम्हाला पिंपल्स मुरूम आले असतील तर यासाठीसुद्धा लाभदायक ठरतात.

हे वाचा:   सर्दी,ताप,खोकला या घरगुती आयुर्वेदिक उपायाने कमी करा..घरच्या घरी पाच मिनिटांत आजार बरे करा..

जर महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान खूप प्रमाणामध्ये रक्तस्त्राव होत असेल तर अशावेळी उंबराचे फळ आणि गूळ एकत्र मिक्स करून दिवसभरातून एकदा खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्तस्त्राव कमी करण्यासाठी मदत करतील. डायबिटीस पेशंट साठी उंबराचे झाड अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे.

जर आपण या झाडाचे कोवळे पान व त्यामध्ये साखर टाकून खाल्ल्याने आपल्या शरीरातील डायबिटीस नियंत्रण येते त्याच बरोबर अनेक व्यक्तींना जर लघवी करणे मध्ये जळजळ होत असेल तर अशा वेळी उंबराच्या झाडाच्या पानांचा रस व त्यामुळे थोडीशी साखर मिक्स करुन दिवसभरातून दोन तीन वेळा द्यायला हवे असे केल्याने लघवी व्यवस्थित होते.

जर जिभेला फोड आले असतील त्यामुळे दुखत असेल ते असू देत असतील, हिरड्यांमधून रक्त येत असेल तर अशा वेळी या पानांचा रस व या झाडाची साल यांचा आपण काढा प्यायल्याने आपल्या तोंडाच्या ज्या काही समस्या सध्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होते. अनेकदा वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे आपली त्वचा फाटते अशावेळी उंबराच्या फळांमध्ये पांढरा द्रव व आलेला असतो,तो प्रभावी जागेवर लावल्यास त्वचा पूर्वीप्रमाणे व्यवस्थित होण्यास मदत होते.

हे वाचा:   दुधात १ चमचा मिक्स करून प्या अन चमत्कार बघा; सर्दी, खोकला आणि ११ आजार होतील मुळापासून गायब.!

उंबराचे फळ खाल्ल्याने ग’र्भा’शयातील मांसपेशींना बळ सुद्धा प्राप्त होते. लहान मुलांना पातळ संडास होत असेल तर अशावेळी उंबराच्या पानांचा रसामध्ये किंवा फळांचा रस सांगली साखर टाकून त्यांना खायला द्यावे. जर आपल्या शरीरामध्ये पित्त व रक्त दूषित झाले असेल तर अशावेळी उंबराच्या झाडाची साल आपल्या शरीरावर पसरावा व त्याची पेस्ट म्हणुन वेगवेगळ्या प्रभावित ठिकाणी लावा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.