तिजोरीत ठेवा नेहमी या गोष्टी; तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहील.!

अध्यात्म

सध्याच्या काळामध्ये पैसा कोणाला नको असतो पैसा सर्वांना हवाहवासा असतो. हल्ली पैशाचे महत्त्व एवढे वाढले आहे की पैसा असेल तर सर्वकाही आहे अन्यथा काहीच नाही अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. आपल्याकडे कितीही पैसा असला, कितीही धन असले तरीही आपल्याकडे पैसा व धन वाढावा यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. आपण पैसे आणून तिजोरीत ठेवतो. तिजोरी आपले पैसे ठेवण्याची सर्वात सुरक्षित जागा आहे.

तिजोरीतील पैशांमध्ये वाढ व्हावी व जे काही आपण ठेवलेले आहे त्यामध्ये नित्यनेमाने वाढ व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर तिजोरीमध्ये या वस्तू ठेवा यामुळे धनाची देवी लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल व आपल्या ध्यानात वाढ होत राहील. तिजोरीत पैसे ठेवताना तिजोरी कोणत्या दिशेला आहे ,हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. चला तर मग आता जाणून घ्या या विषयी काही महत्त्वाच्या गोष्टी..

धने हे धनाला पाहून वाढते त्यासाठी तिजोरी मध्ये पैसे दिसतील अशा पद्धतीने आरसा लावावा. आरसा हा दक्षिण दिशेला तोंड असेल असा दिसू नये. वास्तुशास्त्रानुसार धनाची देवता कुबेर यांचा वास उत्तर दिशेला असतो त्यामुळे तिजोरी कोणत्या नैऋत्य दिशेला पाहिजे. तिजोरी उत्तर दिशेला उघडणे अपेक्षित असते. तिजोरी कोणत्या दिशेला असल्यास काय फरक पडतो हे आपण जाणून घेऊया. तिजोरी जर ईशान्य कोपर्‍याला असेल तर आपल्या धनाचा नाश होतो.

हे वाचा:   जो मनुष्य सकाळी उठून हि ४ कामे करतो तो आयुष्यभर गरीब राहतो.!

तिजोरी अग्नेया कोपऱ्यात असेल तर अनावश्यक धन खर्च होत असतात. दक्षिणेकडे तोंड करून जर तिजोरी असेल तर आजार पणात धन खर्च होते. नैऋत्य कोपर्‍यात जर तिजोरी असेल तर हळूहळू धन वाढत राहते. पश्चिमेकडे तोंड करून जर आपली तिजोरी असेल तर धन टिकत नाही. वायव्य दिशेला जर तिजोरी असेल तर भरमसाठ प्रमाणात खर्च होते. उत्तर दिशेला तोंड करून जर तिजोरी असेल तर सर्वात उत्तम असे असल्यास लाभच लाभ होतो त्यामुळे तिजोरी नैऋत्य दिशेला व उत्तर दिशेला उघडणारी असावी.

उत्तर दिशेला तिजोरी ठेवणे शक्य नसल्यास तर नैऋत्य किंवा पूर्व दिशेला तिजोरी तुम्ही ठेवू शकता. गल्यात व तिजोरीमध्ये धन वाढावा यासाठी कोणत्या शुभ वस्तू ठेवाव्यात याबद्दल आता आपण जाणून घेऊया.महालक्ष्मी यांचे यंत्र व श्रीहरी विष्णू यांची प्रतिमा. श्री हरी यांचा वास असेल अशा ठिकाणी माता महालक्ष्मी नक्की येणार तसेच श्री यंत्र तिजोरीत ठेवावे. श्री कुबेर यंत्र व श्री कुबेर यांचा फोटो तिजोरी मध्ये उत्तर दिशेला तोंड करून ठेवावा आणि दोन हत्ती सुद्धा ठेवावे.

मांजरीची ज्वार. मांजरीची ज्वार म्हणजे जेव्हा मांजरीचे पिल्ले होतात तेव्हा तिच्या पोटातून एक पदार्थ बाहेर पडतो त्याला ज्वार असे म्हणतात. हीच ज्वार पैसा, धन संपत्ती देणारी असते. ज्वारी ही अत्यंत दुर्मिळ धनलाभ दायक अशी वस्तू आहे म्हणून हि मिळाल्यास तिजोरीत नक्की ठेवावी. तिजोरीत आरसा चंदनाचे लहानसे खोड, कस्तुरी हिना नावाचे अत्तर हे सर्व वस्तू माता महालक्ष्मी यांना प्रिय आहे म्हणून या वस्तू तिजोरी मध्ये जरूर ठेवावे. यामुळे जर तुमचे पैसे कोणाकडून येत नसतील तर ते पैसे नक्कीच येतील. यामुळे व्यवसाय नोकरी व्यापारामध्ये प्रगती होईल. तिजोरीमध्ये एक मोती व दक्षिणमुखी शंख ठेवावा. हे श्री लक्ष्मीचे दोघेही भाऊ आहेत.

हे वाचा:   प्रत्येक कामात अडथळे येतात.? साडेसातीमागे लागलीये.? घरात पैसा टिकत नाही.? एकदा हे अवश्य करा.!

एखाद्या केस संबंधित कागदपत्र व पैसे कधीही एकत्र ठेवू नये यामुळे आणि होऊ शकते त्याचबरोबर तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये यामध्ये काही ना काही पैसे थोडे जरूर ठेवावे यामुळे माता महालक्ष्मी तुमच्याकडे येईल. देवघराच्या खाली कधीही गल्ला व तिजोरी ठेवू नये अन्यथा तुमचे लक्ष नेहमी ध्यानावर नाही व देवपूजा कडे त्याचे लक्ष लागणार नाही हे सत्य आहे दररोज सकाळी घरामध्ये श्री विष्णू सहस्त्र नाम व श्री लक्ष्मी सूक्त म्हणावे यामुळे माता महालक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.