तोंड येणे या आजारासाठी रामबाण औषध आहे हे एक पान; १ दिवसातच मिळेल आराम.!

आरोग्य

वारंवार तोंड येत असेल तर करा हा घरगुती उपाय. अति जागरण ,मानसिक ताण तणाव तसेच विटामिन ब१२ची कमतरता यामुळे अनेकदा तोंडात छाले पडत असतात, तोंड येत असते तसेच तोंडाला व आतील भागाला फोड सुद्धा येत असतात. अशा प्रकारची समस्या बहुतेक वेळा शरीरातील उष्णता वाढल्यामुळे निर्माण होत राहते असेच नाही तर अनेकदा एखादी औषधांचे साईड इफेक्ट, जागरण, चहा-कॉफीचे अतिप्रमाणात सेवन करणे, जास्त गरम पदार्थ खाणे ,अति तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये अनेक विषारी घटक तयार होत असतात.

या कारणामुळे सुद्धा तोंड येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. अनेकदा कुपोषणामुळे किंवा जेवताना जीभ चावली गेल्यामुळे सुद्धा फोड निर्माण होऊन तोंड येण्याची समस्या निर्माण होते. जरी तोंड येण्याची समस्या साधी वाटत असली तरी जेवण करताना या समस्येचा होणारा त्रास हा भयंकर असतो. पण आजच्या लेखामध्ये आम्ही सांगणारा जो घरगुती उपाय आहे,या उपायामुळे तुमची तोंड येण्याची समस्या मुळापासून नष्ट होणार आहे . चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

तोंड येण्याच्या समस्येवर गुणकारी उपाय म्हणून हा अतिशय आजचा उपाय महत्त्वाचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन महत्त्वाचे घटक लागणार आहे त्यातील पहिला घटक म्हणजे पेरूची ताजी पाने. पेरूची पाने आपल्या घराशेजारी सहज उपलब्ध होत असतात त्याचबरोबर जेव्हा आपण बाजारामध्ये पेरू विकत घेण्या साठी जातो तेव्हा त्या फेरीवाल्या कडे सुद्धा पेरूची पाने आपल्याला अनेकदा उपलब्ध होतात.

हे वाचा:   उभे राहून पाणी पिण्याचे हे आहेत घातक परिणाम; तुम्हीसुद्धा हि चूक करत असाल तर आत्ताच व्हा सावधान.!

पेरूच्या पानामध्ये अँटी सेप्टिक आणि अँटी इन फ्ला मेंटरी गुणधर्म आढळतात. यामुळे तोंडातील इन्फेक्शन कमी करण्याकरता निश्चित मदत होते त्याचबरोबर पेरूचे कोवळी पाने खाल्ल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता सुध्दा कमालीची वाढते.त्या शिवाय सर्दी,पडसे,खोकला यासारखे वायरल इन्फेक्शन सुद्धा एका दिवसात दूर होते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला पेरूचे कोवळे मध्यम आकाराचे पान घ्यायचे आहे यानंतर चा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे कात. विड्याच्या पाण्यामध्ये वापरला जाणारा कात हा आपल्या उपायासाठी आपल्याला घ्यायचा आहे. कात खाल्ल्याने जिभेवरील डाळीमध्ये अस्कॉर्बिक ऍ सिड नियंत्रणात राहते ,जेणेकरून तोंडामध्ये आलेल्या जखमा , फोड भरून निघण्यास मदत होते. आपण आपल्या उपायासाठी काताचा छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि या पानाचा विडा बनवायचा आहे.

हे वाचा:   पुरूषांमधील थकवा, कम’जोरी संपवते, स्टॅ’मिना वाढवते.. फक्त हे 1 फळ अशापद्धतीने सेवन करा.. जो’डप्यांनी नक्की पहा

हा तयार झाला आपला सरळ आणि साधा सोपा उपाय. सकाळी व संध्याकाळी जेवणाच्या अर्धा तास आधी हा उपाय आपल्याला करायचा आहे. या दरम्यान तयार होणारी जी लाळ आहे तुम्ही गिळू सुद्धा शकतात. दोन-तीन दिवस सातत्याने हा उपाय केल्यास तुमचे तोंड येण्याची समस्या लवकरच दूर होते.

या दरम्यान पोट साफ राहील अशा पद्धतीचा आहार करणे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर अति जागरण, मसालेदार, तिखट पदार्थ ,चहा ,कॉफी यांचे अति प्रमाणामध्ये सेवन करणे सुद्धा आपल्याला टाळले पाहिजे. जर या सगळ्या गोष्टीवर तुम्ही नियंत्रण केल्यास आणि लेखांमध्ये सांगितलेला उपाय जर केला तर तोंड येण्याची समस्या लवकरच तुमची नष्ट होईल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.