व्यक्तीच्या आजूबाजूच्या गोष्टीमुळे त्याच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो म्हणूनच ते आपले घर व घरातील वस्तू लोक आपल्या घराची रचना वास्तुशास्त्रानुसार करत असतात. घरातील वस्तू देखील वास्तुशास्त्रानुसार ठेवल्या जातात. त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये वेगवेगळे फोटो लावत असतो तसेच घरामध्ये वावरत असताना आपण त्या फोटोकडे नेहमी पाहत असतो.
त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर होत असतो मग तो नकारात्मक असेल किंवा सकारात्मक प्रभाव असेल ते आपण लावलेला फोटोवर अवलंबून असते म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणते फोटो लावायला हवेत आणि त्यांचा आपल्या जीवनावर नेमका कोणता प्रभाव पडतो. याबद्दलची महत्वपूर्ण माहिती आज आपण आपल्या लेखाबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल.. सर्वात महत्त्वाचा पहिला फोटो म्हणजे श्रीकृष्ण यांचा गायी सोबत उभे असलेल्या तसेच बासरी वाजवताना अनेकदा आपण फोटो पाहत असतो.
असा फोटो घरामध्ये लावणे शुभ मानले गेलेले आहे. हा फोटो आपल्याला आपल्या पूजेचे घरांमध्ये लावायचा आहे त्यामुळे सौभाग्य, धनप्राप्ती चा मार्ग मोकळा होतो त्यानंतर दुसरा फोटो आहे राम दरबाराचा. हा राम दरबाराचा फोटो देखील शुभ मानला गेलेला आहे. हा फोटो आपल्याला आपल्या हॉलमध्ये लावायचा आहे. ह्या फोटो मुळे घरातील सदस्यांमध्ये प्रेम भावना निर्माण होते आणि त्याचबरोबर घरातील सदस्यांमध्ये एकीची भावना सुद्धा निर्माण होते.
तिसरा फोटो म्हणजे समुद्रकिनारी धावणाऱ्या सात घोड्यांचा फोटो. या फोटोमुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये, कामाच्या ठिकाणी,नोकरीमध्ये यश प्राप्त होते तसेच तुमचा व्यवसाय प्रगतिशील राहतो. हा फोटो तुम्हाला ऑफिसमध्ये तसेच कामाच्या ठिकाणी पूर्व दिशेला लावायचा आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा फोटो म्हणजे माता यशोदा आणि भगवान कृष्ण यांचा फोटो. हा गर्भवती स्त्रियांच्या रूम मध्ये लावावा.
हा फोटो अशा महिलांसाठी शुभ मानला गेलेला आहे यामुळे त्यांच्यातील मातृत्वाची भावना अतिशय घट्ट होते. पुढील फोटो आहे तो म्हणजे राजहंसाचा. पाण्यामध्ये पोहत असलेला राजहंसाचा फोटो आपल्या अतिथी कक्षांमध्ये लावावा यामुळे आपल्या धनप्राप्ती चा मार्ग मोकळा होतो त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते. त्यानंतर पुढील फोटो आहे तो म्हणजे घरामध्ये लावणे अशुभ मानला जातो. हा फोटो म्हणजे युद्धाचा फोटो मग तो फोटो महाभारतातील असू दे किंवा रामायणातील युद्ध करताना असुदे.
युद्ध करत असतानाचा फोटो फोटो युद्ध करत असतानाचा फोटो जर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावला तर घरामध्ये कटकटी भांडण ,वैरभावना निर्माण होण्याची शक्यता असते आणि या सर्व गोष्टीमुळे घरातील वातावरण होते तसेच वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये वाहणाऱ्या झराचा फोटो सुद्धा लावणे चुकीचे मानले गेले आहे. अशा प्रकारच्या फोटोमुळे धनहानी होत राहते आणि आपले मन अस्थिर राहते तसेच आपल्या घरामध्ये आपल्या सदस्यांचा स्मितहास्य करतानाचा एखादा फोटो जरूर लावावा ते शुभ मानले गेलेले आहे.
अशाप्रकारच्या फोटोमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच गृह क्लेश दूर होतात. हा फोटो आपल्याला पश्चिम दक्षिण दिशेला लावायचा आहे. तसेच विनाशकारी विध्वंस करणारे दृश्य दर्शविणारे फोटो घरामध्येे कधीच लावू नये. अशा प्रकारचे फोटो लावल्यामुळे घरामध्ये हानी खूप मोठ्या प्रमाणावर होत राहते म्हणजेच दुर्गामातेचे रुद्र रूप धारण केला गेलेला महिषासुराचा वध करताना असणारा फोटो व रुद्र अवतारामध्ये नटराज याचा फोटो अशा प्रकारचे फोटो घरामध्ये लावू नये कारण हे फोटो विनाशाचे सुचक मानले गेलेले आहे.
माता सरस्वती चा फोटो देखील शुभ मानला गेलेला आहे म्हणून तुमच्या घरांमध्ये लहान मुलांच्या खोलीमध्ये माता सरस्वती यांचा फोटो जरूर लावावा यामुळे मुलांचे अभ्यासात मन लागते. हा फोटो आपल्याला उत्तर दिशेला लावायचा आहे तसेच तसेच भगवान धन्वंतरी यांचा हातामध्ये अमृतकलश घेतलेला फोटो आपल्याला घरामध्ये लावायचा आहे यामुळे आपल्या आरोग्य संबंधित ज्या काही समस्या असतात त्या सगळ्या नष्ट होतात आणि भगवान धन्वंतरी यांच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये नेहमी निरोगी वातावरण राहते तसेच रडणाऱ्या बाळाचा फोटो घरामध्ये लावू नये.
असे केल्यामुळे घरामध्ये द्वेष निर्माण होतो त्याच बरोबर उभ्या स्वरूपात असलेल्या माता महालक्ष्मी चा फोटो सुद्धा घरामध्ये लावू नये कारण की माता महालक्ष्मीला चंचल असे संबोधले गेले आहे आणि उभी असलेली महालक्ष्मी माता एका ठिकाणी स्थिर राहत नाही. अशा मुळे तुमच्या घरामध्ये अनेकदा आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणूनच कमळावर बसलेल्या स्मितहास्य मुद्रे मध्ये असलेल्या माता महालक्ष्मी चा फोटो घरामध्ये लावायचा आहे.
या फोटोमुळे तुमच्या घरामध्ये माता महालक्ष्मी यांचे वास कायमस्वरूपी राहील आणि तुमच्या जीवनामध्ये कधीच पैसा धन यांची कमतरता राहणार नाही त्याचबरोबर घरामध्ये माता अन्नपूर्णा ची मूर्ती किंवा फोटो आपल्याला स्वयंपाक गृहामध्ये लावायचा आहे, असे केल्यामुळे घरामध्ये अन्नाची बरकत राहते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.