कोणी कितीही विचारले तरी आपण आपल्या घरातील या 5 गोष्टी कधीच कोणाला सांगू नये !

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीती मध्ये संगितले आहे की काही गोष्टी आहेत ज्या कधीही कोणाला सांगू नये. चला तर जाणून घेऊ यात त्या कोणत्या गोष्टी आहेत. त्यातील पहिली बाब म्हणजे आपला आपमान जर आपला आपमान झाला असेल तर ही गोष्ट कोणाला ही सांगू नये. कारण लोकांना अशी सवय असते की समोरच्याचे दुःख रडून ऐकायचे आणि इतरांना हसून सांगायचे.

त्यामुळे कधी-कधी जीवनात आशा काही गोष्टी घडतात की त्यात आपला आपमान होतो. या गोष्टी गुप्तच ठेवाव्यात. कारण त्यांना आपल्या जीवनात काय घडते याच्याशी काही ही देणेघेणे नाही. आपल्याला आपल्या जीवनातील चांगले व आनंदी घटनाच इतरांना सांगायच्या आहेत.

दुसरी बाब म्हणजे आपल्या परिवारातील काही गुप्त गोष्टी इतरांना सांगू नये. शक्य तो घरामध्ये फूट यामुळे नाही पडत की घरात भांडण तंटे होतात. तर घरात फूट यामुळे पडते की बाहेरचा व्यक्ती आपल्या घरात भांडणे लावतात. याचा अर्थ असा की जेंव्हा आपण आपल्या घरातील सर्व गोष्टी बाहेरच्या व्यक्तींना सांगतो तेंव्हा आपल्या घरातील लहानात लहान गोष्टी बाहेरच्या व्यक्तींना माहीत होतात.

हे वाचा:   नोकरी करत असताना श्रीमंत कसे बनावे.? करा फक्त हा उपाय व्हाल अचानक श्रीमंत.!

त्यामुळे ते त्याचा गैरफायदा घेतात आणि आपल्या घरात भांडणे आणि वादविवाद लावण्याचे काम करतात. म्हणून कधीही बाहेरच्या व्यक्तींना घरातील सर्वच गोष्टी सांगू नयेत. पुढील बाब म्हणजे आपल्या मनातील दुःख इतरांना कधीही सांगू नये. काही व्यक्तींना अशी सवय असते की आपल्या छोट्या-छोट्या समस्या ते इतरांना सांगत सुटतात.

त्यांना असे वाटते की यामुळे आपले मन मोकळे होते. पण खरे तर आपले दुःख, त्रास, समस्या इतरांना सांगून आपण आपलेच नुकसान करून बसतो. ते तुम्हाला तुमच्या समोर सहानभूती दाखवतील पण तुमच्या पाठीमागे तुमच्यावर हसतील तुमच्या बद्दल एकमेकांना सांगून तुमची खिल्ली उडवतील. यामुळे आपले दुःख व त्रास आशा व्यक्तींना सांगा जे तुमच्या खूप जवळचे आहेत आणि ज्यांच्या वर तुमचा संपूर्ण विश्वास आहे.

हे वाचा:   रस्त्यावर पडलेले नाणे व कोणतेही वस्तू उचलणाऱ्यानी नक्की वाचा ही माहिती; नाहीतर होईल खूप पछाताप.!

पुढील गोष्ट म्हणजे आपले झालेले नुकसान व धनहानी हे इतरांना सांगू नये. जीवनात कितीतरी वेळा असे प्रसंग येतात की आपल्या हातात पैसा शिल्लक राहत नाही आणि घरात आर्थिक अडचण येते आणि पैसा टिकतच नाही आपण गरीब व कंगाल होतो. आशा वेळी आपली गरिबी, दरिद्रता इतरांना सांगू नये.

कारण यामुळे इतर लोक तुम्हाला मदत तर करणार नाहीत पण तुम्हाला कमी लेखतील. आजकाल ज्याच्याकडे पैसा आहे तो बलवान समजला जातो. जर पैसा नसेल तर आपल्याला कोणीही मानसन्मान देणार नाही. ज्यांच्या कडे पैसा धन संपत्ती नाही जेंव्हा तुमची आशी परिस्थिती असेल तेंव्हा या परिस्थितीतुन बाहेर कसे पडता येईल याचा विचार करा.

आपल्या शक्तीवर विश्वास ठेवा एकच परिस्थिती नेहमी राहत नाही. तसेच सुखाचे व दुःखाचे दिवस येत जात राहतात. म्हणून स्वतःचा सन्मान स्वतः करावा आणि या काही गोष्टी इतरांना सांगणे टाळावे.