मित्रांनो आज आपण बघणार आहोत मातीच्या माठातून पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे. पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घरी मातीची भांडी वापरली जायची. तवा, कढई अशी भांडी जेवण बनवण्यासाठी तर रांजण , माठ, अशी भांडी पाणी साठवण्यासाठी वापरली जायची. तर आज आपण मातीच्या माठातून पाणी पिल्यावर आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे जाणून आहोत.
मातीचे माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक असते, त्यामुळे त्यामध्ये पाणी ठेवल्याने हे गुणधर्म मिसळले जातात. असे पाणी पियाल्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो. मातीच्या माठाला लहान लहान छिद्रे असतात त्यामुळे त्याच्यातील पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते.
मातीच्या भांड्यातील पाण्याला एक विशिष्ट प्रकारची चव आणि गंध असतो. मातीच्या भांड्यातील पाणी पियाल्याने ऍसिडिटीचा त्रास कमी होतो. नियमितपणे मातीच्या भांड्यातील पाणी पियाल्याने शरीरातील प्रतिकारक क्षमता वाढते. तसेच रोगांशी वाढण्याची क्षमता वाढते.
मातीच्या माठातील पाण्याने उष्मघातापासून संरक्षण होते. मातीचे माठ वापरण्याचा अजून एक फायदा म्हणजे त्यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते. मातीच्या भांड्याला एखादे सुती कापड गुंडाळून ठेवल्यास पाणी लवकर गार होते. प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये बीपीएन नावाचे केमिकल असते जे आरोग्याला धोकादायक असते. म्हणून शक्य तितका प्लास्टिकचा वापर कमी करा.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.