कुत्रे रात्री का रडतात..? या मागचं खरं कारण जाणून तुम्हाला धक्काच बसेल..!

अध्यात्म

मित्रांनो या जगामध्ये कुत्र्यापेक्षा वफादार कोणीच नाही असे म्हटलं जाते. भलेही मग माणूस एखाद्या माणसाचं मीठ खाऊन त्याला दगा देत असेल पण कुत्रा असं कधीच करत नाही. तो घरची भाकरी खाईल आणि घरच्या मालकाला कधीच दगा देत नाही हे आपल्याला माहितेय. त्याला चावाही तो घेत नाही किंवा डसत हि नाही.

या वफादारीमुळेच बरीच माणसं आपल्या घरात किंवा शेतामध्ये ठेवतात. पाहायला गेलं तर मांजर सुद्धा एक पाळीव प्राणी आहे परंतु मांजर हि कोणाचीही वफादार नसते. आपणास विश्वास वाटत नसेल तर एकदा अनुभव घेऊन बघा.

जेव्हा आपण कुत्र्याला एखादी भाकर टाकली तर तो जीवनभर तुमच्यासाठी आपली शेपटी हलवत राहील. पण आपण मांजरीस एक दिवस दूध पाजलं तर दुसऱ्या दिवशी तिच्यावर गुरगुर किंवा म्हणजे ती सुद्धा तुमचा चावा घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. कुत्रे हे माणसांचे खरे मित्र असतात, चांगले वाईट त्यांना लवकर समजते.

आता प्रश्न राहिला तर रात्री कुत्रे का रडतात किंवा मोठमोठ्याने आवाज ते का करतात. तर मित्रांनो कुत्र्यांच्या या रडण्याला अपशकुन मानले जाते किंवा आपण तसं मानतो. वृद्ध व्यक्तींच्या मतानुसार जेव्हा रात्री कुत्रे रडतात तेव्हा आपल्या परिवारातील कोणाचा तरी मृत्यू होणार आहे अशी भीती त्यांना वाटते.

हे वाचा:   टॉ-य-लेट मध्ये बोला हे फक्त 3 शब्द; शत्रू होईल पूर्णपणे बरबाद.!

काहींचे तर हे सुद्धा म्हणणे आहे कि कुत्र्यांना प्रेत आत्मा दिसतात. आणि आपल्या आजूबाजूंच्या संकटांना ते ओळखू शकतात किंवा समजू शकतात. कुत्र्यांनी रात्री अचानक रडायला जर सुरवात केली तर आपल्याला दचकन जाग येते. असं वाटते कि काय होईल आणि काय नाही.

त्यांचा संबंध प्रेत आत्म्यांशी जोडला जातो इथपर्यंत लोक जाऊन पोहोचलेले आहेत. हो गोष्ट तुमच्या मते खरी असेल पण ती खरी नाहीय.. सायंटीफिकली जर आपण शोध घेतला तर असे नाहीय. वैज्ञानिकांनी रिसर्च केले आहेत. कुत्र्याच्या तज्ज्ञाला सायन्स भाषेमध्ये होवल्स म्हणतात.

असे म्हणतात कि कुत्रे हि भेडीयांचीच एक जात आहे. त्यामुळे कुत्रे सुद्धा भेडीयांसारखा आवाज किंवा व्यवहार करतात. ज्याप्रमाणे एक भेडिया दुसऱ्या भेडियाला संदेश पाठवतो, ओरडतो तसेच कुत्रेसुद्धा आपल्या भाषेमध्ये दुसऱ्या कुत्र्यांना संदेश पाठवत असतात. म्हणजेच संकेत देत असतात.

आपण पाहतो कि प्रत्येक गल्लीमध्ये कुत्रे असतात. त्यामुळे कुत्रे ज्या गल्लीत किंवा मोहल्ल्यात राहतात तेव्हा ते त्याला आपला इलाका किंवा अधिकर क्षेत्र समजतात. त्यावेळी जर त्यांच्यात एका अनोळखी कुत्र्यांनी प्रवेश केला तर ते संकेत देतात, राग देतात आणि सर्व कुत्र्यांना सावधान राहण्यास सांगतात. म्हणजेच नवीन कुत्र्यांसंबंधी सर्वजण खबरदार व्हा यासाठी ते ओरडतात.

हे वाचा:   घरात कोणतेही बदल न करता दूर करा वास्तुदोष; वास्तुदोष दूर करण्यासाठी फक्त करा हा १ उपाय.!

होवेल्स म्हणजे एकमेकांना समजण्याची भाषा होय. ते फक्त चव घेण्यासाठीच ओरडत किंवा रडत नाहीत तर ते आपला राग व्यक्त करण्यासाठी होवेल्स करतात. जसे कि कुत्र्यांना मोठा आवाज आवडत नाही, भांडे फेकण्याचा आवाज जर आला तर तो त्यांना पसंद नसतो. आणि त्यामुळे कुत्रे त्यांचा विरोध दर्शिवितात, आणि एवढेच नाही तर त्यांच्या मोहल्ल्यात अनोळखी माणूस आला तर तो कुत्रा आपल्या साथीदारांना त्या माणसावर नजर ठेवण्याचा संकेत देत असतो.

कुत्रा या साठी रडतो कि आपल्या गल्लीतील माणसांना नुकसान होऊ नये जे आपल्याला रोज पोळी भाकरी टाकतात. तर मित्रांनो अशाप्रकारे हा गैरसमज दूर करा. मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.