कावळा ओरडल्याने काय घडते घरात? शुभ की अशुभ घडणार..काय असतात याचे संकेत जाणून घ्या..

अध्यात्म

कितीतरी पक्षी आपल्या आसपास फिरत असतात, काही पक्षी दिसणे शुभ मानले जाते, काही पक्षी शुभ संकेत देतात, अनेक लोकांना याची प्रचिती सुद्धा आलीय. जसे की कुंभार कावळा दिसल्यास काही वेळात शुभ वार्ता कानी पडते. संत ज्ञानेश्वरानी कावळा ओरडताना त्याच्यावरती अभंग लिहिला व त्याच्यानुसार असा संकेत मानला की भगवान पांडुरंग त्यांच्या भेटीला येत आहे व त्याचीच तयारी तयार करत आहेत.

आपल्या ध र्म शास्त्रात कावळा आपल्या घराजवळ ओरडल्याने शुभ मानले आहे. काहीतरी दैवी शुभ संकेत मानला जातो. तसेच घरातील पितृचे प्रतिक म्हणून सुद्धा कावळ्यांना मानले जाते. आपल्या संस्कृतीत पितरांना फार महत्व आहे, जर पिं-डाला कावळा शिवला नाही तर पितरांना मुक्ती मिळत नाही असे मानले जाते.

पितृपक्षात सुद्धा कावळ्यांचे महत्व फारच असते, त्या दिवसात कावळ्यांना खायला दिल्याशिवाय आपण जेवत नाही. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर १२ दिवसांचे कार्य केले जाते. यामध्ये मृत व्यक्तीच्या नावाने पिं ड दा न केले जाते. १० व्या दिवशी पिं-ड ठेवले जातात आणि काकस्पर्शाची वाट पाहिली जाते.

हे वाचा:   या दिशेला बसून जेवण करने म्हणजे आयुष्य कमी करणे ! या दिशेला बसून जेवण करण्याची चूक करू नका..

तेथे काकस्पर्श झाल्यास पूर्वजांनी आपण ठेवलेल्या अन्नाचे ग्रहण केले, असे मानले जाते. अन्यथा मृत पावलेल्या व्यक्तीच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत, असे मानून ते पूर्ण करण्याचा संकल्प बोलून दाखवला जातो. दिवसवाराप्रमाणे श्राद्ध तर्पण विधी करतानाही कावळ्याचा काकबळी काढून ठेवला जातो. जेव्हा स्वप्नात एखादा कावळा मिठाई खात असल्यास आपल्याला लवकरच धन प्राप्ती होणार आहे.

आपल्या घरात आर्थिक अडचण दूर होणार आहे. जर आपल्या डोक्यावरून केस ओढत एखादा कावळा गेला तर तो येणाऱ्या काळात येणाऱ्या सं-कटाचे संकेत देतो. जर एखाद्याच्या पगडीवर कावळा घाण करत असेल तर त्याच्या घरी लवकरच संतान प्राप्ती होणार आहे. जर शनिवारी घरावरती बसून कावळा सतत ओरडत असेल तर ते शुभ मानले जाते.

एखादी शुभ बातमी लवकरच तुम्हाला कळणार आहे हे तुम्हाला संकेत असतो. घरावरती किंवा घराबाहेर जर 2 कावळे भांडत असतील तर त्या घरात लवकरच अचानक अडचणी येणार आहेत. गच्चीवर किंवा छतावर जर कावळा मृत आढळला तर घराच्या विनाशाला सुरुवात होते.

हे वाचा:   हातात कडे घालण्याचे हे फायदे ऐकून थक्क व्हाल...आपल्या शरीरात काय काय घडते पहा..हे माहिती असले पाहिजे

एखादा दागिना जर कावळ्याने उचलून घेऊन गेला ते दुर्भाग्य लक्षण मानलं गेलंय. तसेच नोकरीच्या शोधात जात असताना घाणीवरती एखादा कावळा दिसला तर ते शुभ मानले जाते. सकाळी सकाळी अविवाहित मुलीच्या डोक्यावरून कावळा उडून गेला तर तिचा विवाह योग जवळ आला आहे.

तिचे लवकरच लग्न होण्याची वेळ जवळ आली आहे. कावळा जर नवविवाहित मुलाच्या डोक्यावरून सतत घिरट्या घालत असेल तर त्या तरुणाला पुत्रप्राप्ती होणार असल्याचा संकेत आहे.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.