विवाह म्हटले की दोन जीवांचे एकत्र येणे आणि आयुष्यभर एकमेकांना समजून घेऊन साथ देणे होय. पण कित्येक घरात छोट्या छोट्या कारणावरून वाद विवाद निर्माण होतात. त्यामुळे आपल्या घरात सतत तणाव निर्माण होतो , परिणामी घरातील सर्व वातावरण नकारात्मक होते आणि त्याचा वाईट प्रभाव घरातील मुलांवर पडतो.
काही वेळेस दोघांची काही चुक नसताना भांडणे होतात , ज्याचे कारण तुमच्या वास्तूतील दोष असतात. तुमच्या वै-वाहिक जीवनात हे वास्तुदोष कलह निर्माण करतात . लग्नाच्या बंधनात अडकणे जेवढे गरजेचे असते तेवढे गरजेचे त्या पवित्र नात्याच्या बंधनाला जीवनभर निभावून नेणे असते.
सततच्या वादामुळे वैवाहिक जीवन दुःखी राहते. सतत दडपण, तणाव राहतो. वास्तूमधील काही दोष हे आपल्या नात्याला दूर करतात असे आपले वास्तुशास्त्र सांगते, जे प्रत्येक विवाहित व्यक्तीला माहीत असायला हवे. सर्वात महत्त्वाचा वास्तुदोष म्हणजे तुमच्या घरातील ब्रह्मस्थान जर उंच नसेल, मोकळे नसेल तसेच जर त्यावर कोणतीही वजनदार वस्तूची निर्मिती केली असेल तर याने घरातील पती-पत्नीचे विचार कधीच एकत्र येत नाहीत.
त्यांच्यामध्ये सतत कलह होतात. घरातील नैऋत्य कोपरा खाली सरकला असेल किंवा दिशा अथवा नैऋत्य खोली अंतर कमी जास्त असेल तर समजून जा की तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच ईशान्य कोपऱ्यात जर अतीव वाढ असेल किंवा विनाकारण कमी झालेला असेल तर घरात आर्थिक परिस्थिती बिकट होते.
परिणामी गरजा भागत नसल्याने वादाचे कारण बनते. त्यासाठी घर बांधताना असो किंवा फ्लॅट खरेदी असो घरातील सर्व कोपरे समान आहेत का याची पडताळणी करायला हवी. कोपऱ्यांची साफ सफाई बरेचजण वरचेवर करत नाही, तसे करू नये, साफसफाई रोज केलीच पाहिजे.
ग र्भ व ती स्त्रीसाठी दक्षिण दिशा अशुभ मानली जाते. या दिशेला झोपल्याने तिला नीट झोप येत नाही आणि गर्भपात होण्याची शक्यता असते. नव विवाहित जोडप्याच्या खोलीत आरसा असेल तर अशुभ मानले जाते आणि जर लावला असेल तर याची काळजी घ्यावी की झोपताना तुमचे प्रतिबिंब त्यामध्ये दिसले नसले पाहिजे. त्यासाठी तुम्ही पडदा लावू शकता.
विवाहित दाम्पत्य ज्या खोलीत झोपते, त्या खोलीतील बेड वर बाहेरून आलेल्या व्यक्तीची नजर जाऊ नये, बसू नये याची काळजी घ्या तसेच तुमच्या खोलीला एक पेक्षा जास्त दरवाजे असता कामा नये. याने खोलीत नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे नवरा बायकोमध्ये सतत वाद निर्माण होण्याची शक्यता असते. या काही गोष्टींची काळजी घ्यावी त्यामुळे तुमचे वै-वाहिक जीवन आनंदी बनेल.