आयुष्यभर गरीबच राहतात या 5 प्रकारच्या व्यक्ती; अशा लोकांवर लक्ष्मी कधीच कृपा करत नाही.!

अध्यात्म

आचार्य चाणक्य हे चाणक्य नीती चे लेखक मानलेले आहेत त्यांनी आपल्या विद्वान बुद्धिमत्तेच्या आधारावर चाणक्यनीति ग्रंथ काढला आणि मानवी जीवनात व्यावहारिक जीवन जगत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबद्दलचे मुद्देसूद मत मांडले आहे. आचार्य चाणक्य असे म्हणतात की ,अशा प्रकारच्या पाच व्यक्ती नेहमी गरीब असतात त्यांच्यावर लक्ष्मी कृपा होत नाही, त्यांच्या जीवनामध्ये माता लक्ष्मी येत नाही , लक्ष्मी म्हणजे पैसा ,धन, संपत्ती ,वैभव होय. सध्याच्या जीवनामध्ये जगत असताना प्रत्येकाला पैसा हवा आहे.

प्रत्येक जण मेहनत करत आहे परंतु मेहनत करत असतानाच आपल्याला सगळ्यांना पैसा प्राप्त होतं होतो असे नाही. आपल्यापैकी अनेक जण काबाडकष्ट करत असतात तरीही त्यांच्या आयुष्यामध्ये पैसा धन वैभव येत नाही आणि यामुळे लोक त्रस्त होऊन जातात. काय करावे हे समजत नाही.किती मेहनत केली तरी पदरात निराशाच येत असते.

आचार्य चाणक्य असे म्हणतात की जर एखादी व्यक्ती मनापासून प्रामाणिकपणे दिलेले कार्य व्यवस्थित रित्या पार पाडत असेल तर त्याच्या जीवनामध्ये लक्ष्मीप्राप्ती आवश्यक होते. कधीकधी लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी वेळ होऊ शकतो परंतु एक ना एक दिवस त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये धन वैभव संपत्ती प्राप्त होत असते. याउलट जी व्यक्ती लांडीलबाडी ,चोरी अशा पद्धतीच्या माध्यमातून पैसा कमवते त्या व्यक्तीकडे पैसा येतो पण तो पैसा दीर्घकाळ टिकत नाही.

कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा बाहेर निघून जातो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण अशा व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत त्यांच्या जीवनामध्ये लक्ष्मी कधीच राहत नाही ते नेहमी गरीब गरीबच राहतात चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..

आचार्य चाणक्य म्हणतात की की पहिली व्यक्ती आहे ती व्यक्ती म्हणजे कठोर शब्द वापरणारी व्यक्ती. कठोर शब्द वापरणारे व्यक्तीकडे माता लक्ष्मी कधीच वास्तव्य करत नाही आणि त्याच्या जीवनामध्ये कधीच पैसा धन वैभव टिकत नाही कारण की तो व्यक्ती त्याच्या कठोर शब्दामुळे इतरांच्या भावना दुखावत असतो आणि त्यामुळेच लोक त्याच्यापासून दूर राहतात.

हे वाचा:   कुंभ राशीवर वेड्यासारखं प्रेम करतात या 3 राशी.. या तीन राशी कधीच कुंभ राशीला दुख देत नाहीत..नेहमी सुख आणि प्रेम देत असतात..

पैसा सुद्धा दुरावत असतो म्हणून आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे की आपल्या डोक्यावर बर्फाचा खडा असावा. जिभेवर साखरेचा खडा असावा आणि सगळ्यांना सोबत वागत असताना आपल्याला प्रेमाने वागायला हवे. बहुतेक वेळा कठोर शब्द वापरल्याने लोक जवळ येण्याची लांब होत जातात आणि कठोर शब्द वापरल्याने अनेकदा लोकांचा अपमान सुद्धा होतो आणि अनेक वेळा लोक आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्याशी वैर भावनेने वागू लागतात आणि यामुळेच आपल्या कडे धन धन पळू लागते. लोक आपल्याकडे जवळ येत नाही म्हणून नेहमी सर्वांशी प्रेमाने आदराने वागायला हवे.

आपल्या जिभेवर आपले नियंत्रण असायला हवे. जर आपल्याला भरपूर श्रीमंत व्हायचे असेल तर अशा वेळी माणसे जोडायला शिका त्यानंतर दुसऱ्या प्रकारची व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती भरपूर प्रमाणात खाते. पोट भरले असेल तरी जास्त प्रमाणामध्ये खाण्याची इच्छा ठेवत असते अशी व्यक्ती नेहमी गरीब राहत असते. अशी व्यक्ती भविष्यात कधी श्रीमंत बनत नाही कारण की जेव्हा आपण पोट भरले असताना एकापेक्षा जास्त पदार्थ खातो तेव्हा आपल्याला अनेक आजार होण्याची शक्यता असते आणि आजार होतात तेव्हा आपल्याकडे पैसा वेगवेगळ्या मार्गाने दवाखान्यात जात असतो आणि म्हणूनच आपल्या पोटाला आवश्यक असेल तेवढेच अन्नपदार्थ आपल्याला खायला हवे अन्यथा लक्ष्मी तुमच्या जीवनातून कायमस्वरूपी निघून शकते.

तिसरी व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीचे दात अतिशय खराब आहे ,त्या व्यक्तीच्या जीवनातील सुद्धा लक्ष्मी निघून जाते. सध्याच्या जीवनामध्ये संवाद साधने ही अत्यंत महत्वाची शैली आहे. आपण एकमेकांशी संवाद साधतो तेव्हा जर आपल्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर त्याची संवाद साधण्याची इच्छा व्यक्त करत नाही. म्हणून जर तुम्ही तुमचे दात स्वच्छ ठेवले नाही तर अनेकदा बोलताना आपल्या तोंडातून घाणेरडा वास येत असतो आणि अशावेळी समोरचा व्यक्ती तुमच्याशी बोलण्याची इच्छा ठेवत नाही आणि यामुळे सुद्धा माणसे तुमच्यापासून दूर जातात आणि परिणामी पैसा तुमच्याकडे येत नाही त्यानंतर ची चौथी गोष्ट म्हणजे आपले कपडे नेहमी स्वच्छ असायला हवे.

हे वाचा:   तूळ राशी जून २०२२: अत्यंत शुभ फळे मिळणार, मोठा राजयोग, तुमचा प्रयत्न यशस्वी होऊन आर्थिक लाभ होण्यासाठी..

ज्या व्यक्तीचे कपडे स्वच्छ नसतात, घाणेरडे असतात, त्या कपड्यातून जर वास येत असतो अशा प्रकारच्या व्यक्ती कडे सुद्धा पैसा लक्ष्मी टिकत नाही. आपण बाहेरून कसे दिसतो यावरून अनेक जण आपली पारख करत असतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या कपडे चांगले परिधान करायला हवे. ज्या ठिकाणी स्वच्छता असते अशा ठिकाणी लक्ष्मी निवास करत असते ज्या ठिकाणी अस्वच्छता असते या ठिकाणी लक्ष्मी कधीच वास करत नाही म्हणून आपल्याला सुद्धा आपले कपडे नेहमी स्वच्छ ठेवायचे आहेत जेणेकरून आपण बाहेर चांगले दिसू.

त्यानंतर शेवटची व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठूते व्यक्ती नेहमी ताजेतवाने दिसते आणि अशा व्यक्तीकडे पैसा लक्ष्मी नेहमी वास करत असते आणि जी व्यक्ती सूर्योदयानंतर उठते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी आळस, दारिद्रता ,गरिबी येऊ लागते. तुम्ही जर पाहिले असेल तर जी व्यक्ती सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करण्याची योग्य व्यायाम करते आणि यामुळे त्या व्यक्तीला दिवसभर ताजेतवाने वाटत असते.

आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कार्य करत असताना प्रसन्न असते उलट जी व्यक्ती उशिरा उठते हो ती व्यक्ती सर्व काम घाईगडबडीत करते आणि परिणामी काम चांगले होण्याची बिघडून जाते तर या काही अशा पाच प्रकारच्या व्यक्तींचे वैशिष्ट्य होते ज्यांच्याकडे लक्ष्मी कधीच वास करत नाही तुम्हाला सुद्धा या सवयी असतील तर आजच्या सोडा आणि तुमचे जीवन चांगले करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.