वाढते वजन सध्या सामान्य समस्या बनली आहे. कारण या धावत्या युगात बदलती आणि सुस्त जीवनशैली तसेच चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाच्या समस्या निर्माण होतात. सध्याच्या बिकट परिस्थितीत लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुढे जाऊन हाच लठ्ठपणा इतर काही आजारांना निमंत्रण देत असतो.
पोटावरील चरबी ही खूप लोकांचा चिंतेचा विषय बनली आहे. पण हे चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठी आयुर्वेदात काही घरगुती वस्तूचा वापर करून काही उपाय सांगितले आहे, त्यासाठी आपल्याला 3 वस्तूंची गरज लागणार आहे. यामध्ये पहिली गोष्ट अद्रक लागणार आहे. आपल्या घरामध्ये स्वयंपाक घरामध्ये आलं नेहमीच असत.
या आल्याची पेस्ट तयार करून ती एका डिशमध्ये ठेवायचे आहे. आल्याने आपली चरबी कमी होण्यास अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामुळे हा उपाय केल्याने वजन कमी होण्यासाठी मदत होते. त्याच बरोबर आपल्याला 4 ते 5 लसनाच्या पाकळ्या लागणार आहेत. तसेच हा लसूण सोलून घ्या आणि त्याचे बारीक छोटे छोटे तुकडे करून ते सुद्धा डिशमध्ये ठेवा.
तसेच तिसरा घटक आपल्याला लवंग लागणार आहे. लवंगेचे खुप महत्वपूर्ण फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत. चार ते पाच लवंग घेऊन हे सर्व घटक एकत्र ठेवायचे आहेत आणि गॅसवर पातेल्यात एक ग्लास पाणी कमी गॅस करून ठेवायचे आहे. ते पाणी उकळले की ते खाली उतरून थोडे कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडी कोंथिबीर मिक्स करायची आहे आणि एक चमचा कॉफी मिक्स करा.
त्यानंतर अर्धा लिंबाचा रस त्यामध्ये टाकुन हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करावे आणि त्यानंतर हे एका ग्लास मध्ये गाळून घ्यावे. हे एक ग्लास द्रावण आपल्याला उपाशीपोटी सलग सात दिवस घ्यायच आहे. सातव्या दिवशी तुम्हाला नक्कीच परिणाम जाणवेल. तसेच 15 दिवसात तुमचं वजन तर कमी होण्यास मदत होईलच,
पंधरा दिवस हा उपाय केल्यास पंधरा किलो पेक्षा जास्त वजन उतरेल. परिणामी तुमची पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत होईल.तसेच हा उपाय घरगुती असल्याने त्याचे काही साईड इफेक्ट होणार नाही. कमी वजन असणारा व्यक्ती हा सर्व प्रकारच्या आजारापासून दुर असतो असे सांगितले जाते.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.