जेव्हा आपण एखादे कार्य वारंवार करू लागतो तेव्हा ते कार्य असे रूपांतर सवयींमध्ये होते. सवय सुद्धा दोन प्रकारच्या असतात. एक चांगली सवय व एक वाईट सवय. एखादे कार्य पुन्हापुन्हा केल्याने त्याची आपल्याला सवय होऊन जाते आणि त्याचा प्रभाव सुद्धा आपल्या भाग्यावर होत असतो.प्रत्येक कार्य करत असताना त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्व आपले जीवन व भाग्यावर सुद्धा होत असतो आणि म्हणूनच प्रत्येक कार्य करत असताना आपल्याला काळजीपूर्वक करणे सुद्धा गरजेचे आहे.
जर आपण चांगले कार्य करत असेल तर चांगल्या कार्याचा परिणाम आपल्या जीवनावर व्यक्तिमत्त्वावर व आपल्या भाग्यवंत अवश्य होतो यामुळे आपले व्यक्तिमत्त्व खुलून जाते परंतु जर आपण वाईट काम करत असेल तर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात.आपण आपल्या जीवनामध्ये आपले इष्ट देवता कुलदैवत असतात त्यांची पुजा-अर्चना करत असतो त्यांचा कृपा आशीर्वाद मिळविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो आणि आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो.
परंतु सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येक जण व्यक्त झालेला आहे आणि यामुळेच प्रत्येकाला देवपूजा करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही आणि अनेकदा आपल्या मनामध्ये ही खंत राहून जाते आणि कधी कधी आपल्याला वाईट सुद्धा वाटते परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ही देवपूजा करणे म्हणजे सर्व काही गोष्टी नाहीत. अनेकदा आपण आपल्या मनापासून जे काही कार्य गोष्टी करत असतो ते प्रामाणिकपणे करणे सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो.
देव फक्त कडक उपवास व्रतवैकल्ये करून प्रसन्न होत नाही तर जर आपले आचरण शुद्ध पवित्र असतील आपल्या वागण्याची शैली चांगली असेल तरीसुद्धा देव आपल्यावर प्रसन्न होऊ शकतो. जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर यश मिळवायचे असेल तर आपल्या जीवनामध्ये काही बदल करणे सुद्धा आवश्यक आहे त्याचबरोबर चांगल्या गोष्टींची सवय लावणे गरजेचे आहे अशा गोष्टी केल्याने परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला मदत करत असतो.
आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये अशा काही चार गोष्टी महत्त्वाच्या सांगणार आहोत. या चार गोष्टी स्वतः श्रीकृष्ण यांनी सांगितलेले आहेत. जी व्यक्ती या चार गोष्टींचा समावेश आपल्या जीवनामध्ये करतो त्या व्यक्तीला भरपूर प्रमाणामध्ये यश प्राप्त होते. त्या व्यक्तीच्या जीवनात कधीच गरिबी कंगाली दरिद्रता प्रवेश करत नाही. चला तर मग जाणून घेऊया श्रीकृष्ण यांनी सांगितलेले चार उपदेश कोणते आहेत..
तसे पाहायला गेले तर परमेश्वराच्या वर कोणीच नाही. आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपले परमेश्वर कुलदेवता इष्टदेवता यांचे नामस्मरण करायचे आहे आणि आपल्या घरातील सदस्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या कडे प्रार्थना करायची आहे. आपल्याला यश प्राप्त करायचे असेल तर आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद असणे गरजेचा आहे.
तुम्हाला पूजा-अर्चना करायला वेळ मिळत नसेल तर अशा वेळी आपण दिवसभरातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण करायचे आहे आणि आठवड्यातून आपल्या कुलदेवतेचा जो वार असेल त्या दिवशी छोटीशी पूजा करून आपल्याला आपल्या कुलदेवतेची पूजा करायची आहे व त्याचबरोबर आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला कुलदेवतेची नामस्मरण करायला सांगायचे आहे असे केल्याने तुमच्यावर कुलदेवता प्रसन्न होईल आणि ज्या व्यक्तीवर त्यांची कुलदेवता प्रसन्न असते त्यांचा कुळाचा नेहमी उद्धार होत असतो. कुळाचे संकटापासून संरक्षण होत असते म्हणूनच कुलदैवताची पूजा अवश्य करा.
दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक घरामध्ये प्रवेश करू नये परंतु सध्याच्या काळात अनेकदा आपण आंघोळ न करताच स्वयंपाक घरामध्ये प्रवेश करत असतो परंतु स्वयंपाक घरात प्रवेश करत असताना जर आंघोळ केली असेल तर उत्तमच असते स्वयंपाक घरामध्ये शिरल्यानंतर अग्नी देवतेला नमस्कार करायला हवा कारण की आपण जे अन्न बनवत असते ते अग्नी यांच्या कृपेने आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि त्याचबरोबर आपल्या घरातील अन्नाचा अपमान करू नये यांच्या घरामध्ये अन्नाचा अपमान केला जातो तेथे माता अन्नपूर्णा कधीच वास्तव्य करत नाही आणि यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्रता निर्माण होते. तिसरी गोष्ट म्हणजे चांगले कार्य करायला हवे.
आपल्या घरामध्ये येणारे ज्येष्ठ नागरिक व जे कोणी पाहुणे आपल्या घरामध्ये येत असतात त्यांच्याशी आपल्याला चांगले वागायला पाहिजे, त्यांचा अपमान आपल्याला करायचा नाही. त्यांची आज्ञा नेहमी ऐकायला हवी त्याचबरोबर आपल्या घरात नेहमीच सकारात्मक वातावरण निर्माण राहील याची काळजीसुद्धा आपल्याला कळायला हवे. चौथी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण घराच्या बाहेर एखादे कार्य करताना जात असतो तेव्हा प्रत्येक पाऊल टाकत असताना आपल्याला खाली पाहणे गरजेचे आहे.
आपल्या पायाखाली कोणताही एखादा छोटासा जीव येणार नाही व त्याचा मृत्यू होणार नाही याची दक्षता आपल्याला द्यायला हवी अशा प्रकारची व्यक्ती काळजी घेते ती त्या व्यक्तीला परमेश्वर अतिशय प्रिय असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घडत असतात म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. जर आपल्याला पूजा करायला वेळ मिळत नसेल तरी आपण या उपदेशाचा आपल्या जीवनामध्ये उपयोग केला तरी आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव लाभते आणि येणाऱ्या अडचणी संकटे दरिद्रता पासून आपल्याला सुटका मिळते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.