सध्याच्या दिवसांमध्ये आपल्यापैकी अनेक जण महिन्याचा सामान भरून ठेवतात आणि या किराणा सामान मध्ये वेगवेगळे पीठ सुद्धा समावेश असते म्हणजे रवा, मैदा, बेसन पीठ, गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ हे सर्व पदार्थ आपण भरपूर दिवसाचे आणल्यामुळे अनेकदा जास्त काळ वापरलं नसल्यामुळे सुद्धा या पदार्थांमध्ये कीड लागण्याची शक्यता असते.
त्याचबरोबर सध्याचे वातावरण हे पावसाळ्याचे आहे आणि यामुळे वातावरणातील आद्र्ता कमी होते यामुळे या धान्यांना बुरशी लागण्याची शक्यता सुद्धा असते, अशावेळी अनेक जण चिंता व्यक्त करत असतात म्हणून अशी चिंता दूर करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या धान्याची संबंधित जी कीड लागण्याची ही समस्या आहे ती पूर्णपणे दूर होणार आहे .चला तर मग जाणून घेऊन त्या बद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपण तेजपान आणि कडुलिंबाची पाने वापरणार आहोत. आपल्या स्वयंपाक घरामध्ये तेजपान सहज उपलब्ध असते आणि कडू लिंबाचे पान आपल्या आजूबाजूला सहज बाजारांमध्ये मिळते. हे तेजपत्ता चे पान आपल्याला रवा चा डब्बा, पिठाचा डबा यामध्ये ठेवायचे आहे यामुळे किडीपासून संरक्षण होते तसेच वातावरणामध्ये आर्द्रता निर्माण होते.
आद्रतेपासून सुद्धा पदार्थांचे संरक्षण होते. यामुळे ओलाव्यापासून संरक्षण होते आणि हे पीठ जास्त काळ टिकते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा उपाय सुद्धा करायचा आहे त्यामुळे दुसऱ्या उपायांमध्ये आपल्याला पुदिनाचे पाने लागणार आहेत. या पुदीनाचे एक पान आपल्याला स्वच्छ करून कोरडे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पिठाच्या डब्यामध्ये ठेवायचे आहे.
या पानाच्या वासामुळे पदार्थांना कीड लागत नाही. हे सर्व उपाय केल्यामुळे आपल्या घरातील रवा,मैदा, बेसन पीठ, गव्हाचे पीठ वेगवेगळ्या प्रकारचे पीठ जास्त काळ टिकते आणि यामुळे त्यांचा वापर सुद्धा जास्त काळ होतो. या पदार्थांना किड लागण्यापासून तुम्ही हवाबंद डब्याचा उपयोग सुद्धा करू शकता त्याचबरोबर जास्तीत जास्त काळ टिकण्यासाठी यांना फ्रिज मध्ये सुद्धा ठेवू शकता.
तर हे होते काही महत्त्वाचे उपाय जेणेकरून आपल्या घरातील जे काही पदार्थ आहेत ते जास्त काळ टिकावे. तुम्हीसुद्धा पदार्थांमध्ये कीड लागलेल्या समस्येपासून त्रस्त असेल तर वरील उपाय अवश्य करा आणि आपले घरातील पीठ जास्त काळ टिकवा.