कसलेही दुर्भाग्य असुद्या या वस्तूंचे दान केल्याने वाईट दिवस कायमचे निघून जातील.!

अध्यात्म

आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे. आपण वेगवेगळ्या दिवशी वेगळ्या प्रकारचे दान करत असतो आणि त्याच बरोबर असे काही वार असतात त्या वारांना केलेले दान पवित्र मानले जाते,अशाच प्रकारे आपल्याला सोमवारच्या दिवशी सुद्धा दान करणे गरजेचे आहे. सोमवारच्या दिवशी केलेले दान महादेवांना अर्पित केलेले असते.

तुमच्या जीवनामध्ये खूप सारे संकटं असतील, अडचणी असतील, वारंवार घरातील सदस्य आजारी पडत असतील, तुमच्या मागे दुर्भाग्य लागलेले असतील, जीवनामध्ये अनेक वाईट गोष्टी घडत असतील तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत त्यामुळे तुमचे दूरभाग्य सौभाग्य मध्ये बदलून जाणार आहे ,चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

जेव्हा आपण कोणत्याही वस्तूचे दान करत असतो तेव्हा दान केलेली वस्तू पुन्हा आपल्याला हजार पटीने परत मिळत असते म्हणजेच आपल्याला दान केलेल्या वस्तूची पुण्य खूप लागत असते म्हणूनच आपल्याला अशा काही गोष्टी दान करायचे आहेत ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव जाणार आहे. आपल्याला या काही गोष्टी दान करायच्या आहेत पण त्याच बरोबर महादेव यांना सुद्धा शरण जायचे आहे.

आपल्या हातातून ज्या काही कळत नकळत गोष्टी घडलेल्या आहेत त्यांच्याबद्दल महादेवांना क्षमा अर्चना मागायची आहे आणि भविष्यात आपल्या हातातून नेहमी चांगले सत्कर्म व्हावे यासाठी प्रार्थना करायची आहे. सोमवारच्या दिवशी ज्या वस्तूंचे दान केले जाते त्यापैकी पहिली वस्तू म्हणजे मीठ. जर तुमच्याकडे जाडे मीठ असेल तर उत्तम अन्यथा साधारण मीठ सुद्धा चालेल.

जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला मीठ दान करत असतो तेव्हा त्याचे फळ आपल्याला खूपच चांगले प्राप्त होते परंतु मिठाची दान करताना कधीच हातामध्ये मीठ घेऊन समोरच्या व्यक्तीला द्यायचे नाही त्यासाठी आपल्याला मीठ सर्वप्रथम एका भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि ते भांडे आपल्याला जमिनीवर ठेवायचे आहे आणि समोरच्या व्यक्तीला ते मीठाचे भांडे स्वीकारण्याची विनंती करायची आहे. आपल्या हाताने मीठ कधीच समोरच्या व्यक्तीला देऊ नये असे केल्याने आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर जाण्याचा धोका संभावतो.

हे वाचा:   पायपुसनी खाली ठेवा ही 1 वस्तू; पैसा इतका येईल की सांभाळता येणार नाही.!

ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये भरपूर अडचणी आहेत, दुःख ,कटकटी अशांतता, निर्माण झालेली आहे अशा व्यक्तीने जर सोमवारच्या दिवशी मिठाचे दान केले तर त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडू लागतात त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे म्हणजे गूळ. ज्या घरामध्ये सासू-सुनेचे जमत नाही, वडील मुलाचे जमत नाही, वारंवार घरामध्ये भांडण होत आहेत, नेहमी कटकटी घडत आहेत, घरातील सदस्य प्रेमाने वागणे ऐवजी वैराच्या भावनेने वागत असतील तर या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला सोमवारच्या दिवशी गुळाचे दान करणे अत्यंत गरजेचे आहे.

असे केल्याने आपले नाते अतिशय घट्ट बनते. घरातील सदस्यांमध्ये प्रेमभावना निर्माण होते. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी गुळाचे दान महत्त्व मानले जाते परंतु जर आपण सोमवारच्या दिवशी गाईला गुळासोबत चपाती किंवा भाकरी दिली तर यामुळे सुद्धा आपल्याला हजार पटीने पुण्य लागते आणि गोमाता च्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये धना चे वेगवेगळे मार्ग सुद्धा निर्माण होतात.

ज्या व्यक्तीच्या घरामध्ये आजारपण आहे,सातत्याने रोगराई निर्माण होत आहे व घरात एखादा सदस्य अंथरुणाला खिळलेला आहे अशा लोकांनी सोमवारच्या दिवशी तूपाचे दान करणे आवश्यक आहे. जी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीने जरी तुपाला स्पर्श केला आणि हे तूप आपण एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला दिले तरी आपले आजारपण दूर होऊन जाते. असे केल्याने रोगापासून आपली मुक्ती होते.

जर आपण महादेवाच्या पिंडीवर तूप अर्पण केले तर आपल्याला रोगापासून मुक्ती तर होतेच पण त्याचबरोबर माता महालक्ष्मीची कृपा दृष्टी सुद्धा आपल्यावर होते. आपल्या जीवनामध्ये धनाचे वेगवेगळे योग येऊ लागतात, पैसा अचानकपणे येऊ लागतो. त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे तीळ. तिळला अध्यात्मशास्त्र मध्ये अनन्य महत्त्व सांगण्यात आलेले आहे.

हे वाचा:   गरीबी आणि आर्थिक ब”र्बादी चे कारण असते अशा प्रकारचे टॉयलेट आणि बाथरूम.!

ज्या व्यक्तींवर शनिदेवाची वक्रदृष्टी पडली आहे त्यांच्या जीवनामध्ये साडेसाती आहे ,अशा व्यक्तीने शनिवारच्या दिवशी शनिदेवांना तीळ वाहणे चांगले मानले जाते. तसे पाहायला गेले तर तिळाचे दोन प्रकार आहेत.एक काळी आणि पांढरी तीळ. काळे तीळ आपल्याला शनिवारच्या दिवशी शनिदेवांना अर्पण करायचे आहे आणि सोमवारच्या दिवशी आपल्याला पांढरे तीळ महादेवाने अर्पण करायचे आहे असे केल्याने आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.

अनेकदा आपण आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींसमोर कोणतेही प्रेझेंटेशन करण्यासाठी घाबरत असतो. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी उद्योगधंद्याच्या वेळी सादरीकरण करताना आपल्यामध्ये अनेकदा आत्मविश्वासाचा अभाव जाणवत असतो. जर आपण सोमवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर पांढरे तीळ अर्पण केले तर आपल्या आत्मविश्वास वाढतो आणि आपण कोणतेही कार्य चांगले करण्यास पुढे येतो. चल हे होते काही अशा महत्त्वाच्या वस्तू ज्या आपल्याला सोमवारच्या दिवशी दान करायला हव्यात यामुळे महादेवांचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडवून आणतील आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदु लागेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.