फाटलेले ओठ, उकललेल्या टाचा, काळे घोटे, उकललेली त्वचा यांवर अत्यंत प्रभावशाली घरगुती असा उपाय.!

आरोग्य

रात्री झोपण्यापूर्वी ही क्रीम हाता पायाला लावा आणि मुलायम गोरी त्वचा मिळवा. सध्याच्या दिवसात बहुतेक करून हातांची आणि पायाची त्वचा कोरडी पडून ते रखरखीत होत असते, याकडे सतत दुर्लक्ष केले तर अश्यावेळी त्वचेतून कधी कधी रक्त येऊन लागते .काही व्यक्तींची त्वचा काळी पडू लागते. हाताचा कोपरा पायाचे घोटे आणि अशा अनेक त्वचेच्या समस्या दूर करणारा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला सांगणार आहे.आजच्या या लेखातील उपाय आपण दोन टप्प्यांमध्ये करणार आहोत.

सुरुवातीला आपण त्वचेवरील डाग घालवण्यासाठी स्क्राबिन संबधित उपाय जाणून घेणार आहोत.त्वचेला स्क्राबिन अत्यावश्यक आहे. स्क्राबिन बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम घेणार आहोत हे एक चमचा मोहरी चे तेल. तुम्ही या उपायासाठी नारळाचे तेल देखील वापरू शकता. मोहरीचे तेल मोईश्चरायजर म्हणून काम करते यानंतरचा दुसरा घटक म्हणजे तांदळाचा चुरा. अर्धा चमचा एवढा तांदळाचा भुगा आपण वापरणार आहोत.

हे वाचा:   बाजारात ही भाजी दिसताच विकत घ्या; इतके फायदे मिळतील कि तुम्हीसुद्धा भारावून जाल.!

हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे. तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या आणि हातांच्या त्वचेप्रमाणे मिश्रण बनवावे.आता ही पेस्ट चांगल्या प्रकारे मिक्स करून या मिश्रणाने आपल्या त्वचेवर चांगल्या प्रकारे पाच मिनिटे मसाज करायचे आहे .चांगल्या प्रकारे सक्रबिन केल्यानंतर स्वच्छ पाण्याने त्वचा धुवावी आता यानंतर आपण तिसरे घटक पदार्थ वापरून उपाय बनवणार आहोत, जे तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर लावायचे आहे.

हे बनवण्यासाठी आपण येथे सर्वप्रथम वापरणार आहोत कस्टर्ड ऑईल म्हणजे एरंडेलचे तेल. तुमच्याकडे एरंडेल तेल नसेल तर ऑलिव ऑइल किंवा बदामाचे तेल देखील तुम्ही वापरू शकता. या उपयांसाठी याप्रमाणे एक चमचा कस्टर्ड ऑईल घ्यायचे आहे.तुमची त्वचा कितीही ड्राय झालेली असेल तर या उपायाने नरम होणार आहे.या नंतरचा आपण दुसरा घटक वापरणार आहोत तो म्हणजे ग्लिसरीन.

हे वाचा:   फक्त “हे” पान खा आणि मुतखडा दूर करा; जाणून घ्या पानफुटी वनस्पतीचे जादूई फायदे.!

दहा ते पंधरा रुपये मध्ये ग्लिसरीन विकत मिळते. आजच्या उपाय यासाठी आपण एक चमचा या प्रमाणात ग्लिसरीन वापरायचे आहे यानंतर आपण एक पेट्रोलियम जेली वापरणार आहोत.येथे व्हॅसलीन पेट्रोलियम जेली चा वापर केला आहे.तुम्ही तुमच्या उपलब्धतेनुसार पेट्रोलियम जेली चा वापर करावा. एक चमचा या प्रमाणात ह्या जेली चा वापर करणार आहोत. हा उपाय पावरफूल बनवण्यासाठी आपण या मध्ये एक चमचा एवढे एलोवेरा जेल यामध्ये ऍड करणार आहोत.

आता हे सर्व घटक चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि आजचा उपाय आता तयार झालेला आहे. तुमचे कितीही फाटलेले ओठ,सुरकुत्या पडलेली त्वचा,भेगा पडलेल्या टाचा, काळे पडलेले गुडघे आणि गोटे डागमुक्त करणारा आजचा उपाय आहे. तुम्हाला पंधरा ते वीस दिवस करायचा आहे असे केल्याने तुमच्या त्वचा च्या सर्व समस्या पूर्णपणे दूर होणार आहे.