सिताफळ खाल्ल्याने होणारे जबरदस्त फायदे जाणून तुम्हीसुद्धा भारावून जाल.!

आरोग्य

आपल्या आजूबाजूला अनेक असे फळझाडे असतात, जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात परंतु अनेकदा आपल्याला त्यांचे फारसे फायदे माहिती नसल्याने आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये सुद्धा आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आज आपण सीताफळ खाण्याचे महत्त्वाचे फायदे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या फळाचे असे कोणते औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी उत्तम महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

सीताफळ हे आपल्याला आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जाते. या सीताफळाचे आपल्या शरीराला औषधी गुणधर्म भरपूर आहे. सिताफळ यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, विटामिन के, तंतुमय पदार्थ ,सिग्न पदार्थ, पिष्टमय पदार्थ ही सर्व घटक उपलब्ध असतात.

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा या फळाला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. हे फळ कफनाशक, पित्तनाशक मानले गेले आहे तसेच फळ बलवर्धक, पित्तशामक मानले गेलेले आहे. सीताफळ मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते म्हणून जेव्हा मुलामुलींची वाढ होत असते अशा वेळी जर आपण कॅल्शिअम दिले तर त्यांची शरीर मजबूत बनते व शरीर मजबूत तर बनतेच पण त्याचबरोबर हाडांची स्थिती सुद्धा व्यवस्थित राहते.

हे वाचा:   मातीच्या माठातील पाणी पिण्याचे हे आरोग्यदायी फायदे ऐकून तुम्ही भारावून जाल..!

डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा अनेक महिलांना शरीरामध्ये अशक्तपणा निर्माण असतो अशावेळी जर सिताफळ सत्व प्राशन केले तर आपल्या शरीरातील शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली जाते. हे सिताफळ सत्व आपल्याला मेडिकल स्टोअरमध्ये सहजरीत्या उपलब्ध होऊन जाते. जर एखाद्या व्यक्तीचे वजन नियंत्रणामध्ये येत नसेल आणि वजन जर आपल्याला नियंत्रणात करायचे असेल तर अशा वेळी सुद्धा सिताफळ महत्त्वाची भूमिका बजावत असते.

ज्या व्यक्तीच्या हृदयाची ठोके जास्त पडत असते, जीव नेहमी घाबरलेले वाटत असेल तर आपल्या हृदयाच्या मांसपेशीं चांगल्या करण्यासाठी सुद्धा सिताफळाचे सेवन आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरते. जर तुमच्या शरीरामध्ये जास्त उष्णता निर्माण झालेली असेल, पोटामध्ये जळजळ होत असेल तर अशावेळी सीताफळ खाणे गरजेचे ठरते.

सीताफळ हे उष्णता कमी करणारे फळ मानले जाते आणि त्याचबरोबर सीताफळाच्या अंगी शीतलता प्रदान करणारे गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील उष्णता पूर्णपणे निघून जाते व शरीराला थंडावा प्राप्त होतो. जर एखादा व्यक्ती बेशुद्ध झाला असेल तर अशा वेळी सिताफळाच्या पानांचा रस व्यक्तीच्या दोन्ही नाकामध्ये दोन दोन थेंब टाका, असे केल्याने व्यक्ती शुद्धी मध्ये येऊन जातो.

हे वाचा:   फक्त या उपायाचा घरच्या घरी उपयोग करा; जॉईंट पेन या समस्येपासून मिळेल लवकरात लवकर सुटका.!

सिताफळाच्या बियांचे कावड्या जर आपण रात्री झोपताना केसांना बी ची पावडर लावली तर आपल्या केसांमधील उवा मरतात व त्याचबरोबर केसांमधील कोंडा सुद्धा दूर होतो. या पावडर मध्ये शिकाकाई मिसळली तर केस स्वच्‍छ होतात व केस आपले चमकू लागतात. ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला आहे अशा व्यक्तींनी सिताफळ अजिबात खाऊ नये कारण की सीताफळ हे शितलता निर्माण करणारे असल्यामुळे या आजारात जास्त प्रमाणात होऊ शकते व त्याचबरोबर त्या लोकांना मधुमेह आहे अशा व्यक्तीने सुद्धा सीताफळ जास्त प्रमाणात खाऊ नये जास्त प्रमाणामध्ये सीताफळ खाल्ल्याने वजन सुद्धा वाढू शकते.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.