डोकेदुखीच्या त्रासापासून अगदी सहजतेने घरच्या घरी लगेच सुटका करा. आज आम्ही तुमच्यासाठी या लेखामध्ये डोकेदुखी वर व सर्वात साधा सोपा व पारंपारिक उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला कोणतीही डोकेदुखी असेल तर ती डोकेदुखी पुर्णपणे बरी होऊन जाणार आहे.
हा उपाय करण्यासाठी तीन ते चार लवंग लागणार आहेत आणि त्याचबरोबर तीन ते चार काळीमिरी सुद्धा लागणार आहे. आपल्याला या दोघांची पावडर बनवायची आहे त्यानंतर ही पावडर आपल्याला तव्यामध्ये टाकून थोडीशी भाजायची आहे आणि त्याचा धूर आपल्याला घ्यायचा आहे.
म्हणजेच ज्या पद्धतीने आपण पाण्याची वाफ घेतो त्याच पद्धतीने आपल्याला या धुराची वाफ घ्यायची आहे ,असे केल्याने आपले डोके दुखी काही क्षणांमध्ये थांबून जाईल त्यानंतर आपण दुसरा उपाय करू शकतो तो म्हणजे हे जी पावडर आहे त्यामध्ये एक चमचा खोबरेल तेल काढायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे.
त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने आपल्याला एका वाटीमध्ये हे तेल काढायचे आहे आणि हे तेल जर आपण रात्री झोपतांना केसांना लावले तर त्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते तसेच आपली डोकेदुखी सुद्धा चांगली राहते. हे तेल आपल्याला आठ दिवस तरी रोज डोक्याला लावायचे आहे आणि त्याने हलकी मसाज करायचे आहे, असे केल्याने तुमची कितीही मोठी डोकेदुखी असेल तर ती पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.