सध्या आपण सगळेजण घरी राहून काम करत आहोत अशा वेळी आपल्या शरीराची हालचाल जास्त प्रमाणात होत नाही वर्क फ्रॉम होम केल्यामुळे एकाच जागेवर तासन्तास आपण बसत आहोत त्यामुळे अनेकांना गुडघेदुखी कंबरदुखी व शरीर अवयव दुखण्याची सुद्धा चान्सेस जास्त होऊ लागलेले आहे एका ठिकाणी खुर्चीवर जास्त सुरू झाल्यामुळे सुद्धा अनेकदा गुडघ्यांवर प्रेशर निर्माण होत असतो.
जर तुम्हाला गुडघेदुखी ,कंबरदुखी व कोणत्याही प्रकारचा जॉईन पेन पासून संरक्षण करायचे असेल तर हा घरगुती उपाय अवश्य करा. अनेकदा दुखणे पासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक पेन किलर चा उपयोग करत असतो परंतु वारंवार पेन किलर खाल्ल्याने त्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम सुद्धा भरपूर प्रमाणात होऊ शकतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक आयुर्वेदिक उपचार घेऊन आलेलो आहोत हा उपचार अतिशय प्रभावी आणि सोपा आहे.
हा उपाय केल्याने मुळापासून तुमच्या सगळ्या वेदना नष्ट होणार आहे. हा उपाय अगदी नैसर्गिक असल्याने या उपायापासून कोणत्या प्रकारचा दुष्परिणाम सुद्धा होणार नाही. फक्त एक दिवस हा उपाय केल्याने तुमच्या दुखणे दूर होणार आहे. जर दुखणे जुने असेल तर तुम्हाला हा उपाय सातत्याने सात दिवस करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्यानंतर पांढरी हळद आपल्याला घ्यायची आहे.
ही पांढरी हळद आपल्याला आयुर्वेदिक तसेच मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होऊन जाते. या पांढऱ्या हळदीमध्ये विटामिन ए, सोडियम, पोटॅशियम, खनिज ,कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात असते म्हणूनच आपल्या शरीरातील कोणतीही वेदना लगेच हा उपाय केल्यामुळे दूर होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन चमचे पांढरी हळद घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बजरंग लेपाचा सुद्धा उपयोग करायचा आहे.
बजरंग लेप मुळे आपल्या शरीरातील वेदना लवकर दूर करण्यास मदत होते त्यानंतर आपल्याला सम प्रमाणामध्ये मिठाचा उपयोग करायचा आहे त्यानंतर हे तिन्ही पदार्थ एकत्र करून त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी टाकायचे आहे आणि मंद आचेवर व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला तयार करायचे आहे, जेणेकरून या मिश्रणाची व्यवस्थित पेस्ट योग्य पद्धतीत लेप तयार होऊ शकेल.
हा लेप घट्ट झाल्यावर गरम गरम आपल्या शरीरातील ज्या भागावर वेदना खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे अशा ठिकाणी लावायचा आहे. जेव्हा कधी आपण या लेपचा वापर करणार आहोत अशा वेळी हा लेप गरम असायला हवा जेणेकरून आपल्या शरीरावरील या भागेवर आपण लावणार आहे तेथे योग्य पद्धतीने त्याचा प्रभाव पडू शकेल. एकदा का हा लेप लावल्यानंतर आपल्याला कॉटन म्हणजेच कापूस त्या जागेवर लावायचा आहे.
असे केल्याने तुमची गुडघे दुखी, कंबर त्यावरील वेदना लवकर दूर होणार आहे त्याचबरोबर जेव्हा आपण हा उपाय करणार आहोत त्या दिवशी आपल्याला एक ग्लास दूध मध्ये एक चमचा हळद टाकून ते मिश्रण प्यायचे आहे जेणेकरून आपल्या शरीराला कॅल्शियम मोठ्या प्रमाणामध्ये मिळून आपल्या शरीरातील हाडे मजबूत होणार आहेत.
अशा पद्धतीने आपल्या शरीराच्या आतील व बाहेरील वेदना दूर करणारा असा प्रभावी घरगुती उपचार आहे. हा उपाय तुम्ही अवश्य करा करा. म्हणूनच घरी बसून सुद्धा आपल्या शरीराची काळजी घेणे आपल्याला गरजेचे आहे म्हणूनच या लेखांमध्ये सांगितलेला उपाय तुम्ही सगळ्यांनी जरूर करा आणि विविध वेदनेपासून स्वतःची सुटका मिळवा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.