हि फळे म्हणजे आयुर्वेदिक शास्त्रातील महत्वाचे एक फळ मानले गेले आहे. जर तुमच्या अंगावर खाज येते तसेच सोयरासिस सारखा प्रकार आढळून येतो. अशा आजारावर सुद्धा हे फळे महत्त्वाची भूमिका बजावतात शिवाय अंगावर जर मळ बसला असेल तर मळ स्वच्छ करण्यासाठी सुद्धा ही फळे उपयुक्त ठरतात.
अनेक जणांची ल’घ’वी बंद होऊन जाते या फळाच्या वापरामुळे सुद्धा लघवी व्यवस्थित होऊ लागते. ज्या व्यक्तींना कंबरदुखी, गुडघेदुखी ,सांधेदुखी, वाताचा त्रास आहे अशा व्यक्तींसाठी सुद्धा ही फळं खूपच महत्त्वाची ठरतात. ही फळ आहेत रिटा या वनस्पतीची. या वनस्पतींची फळे सुकल्यानंतर त्याची साल आवळा व शिकाकाई सोबत काढा बनवून अंघोळ करण्याने तसेच पाण्यात टाकल्याने त्याद्वारे केस धुतल्यामुळे आपले केस मजबूत बनतात.
जर तुमच्या अंगाला खाज येत असेल तर अशावेळी रिटाची टरफले आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून या पाण्याद्वारे आंघोळी केल्यामुळे आपल्या शरीरावरील खाज लवकर बरी होते त्याच बरोबर अंगावरील मळ सुद्धा लवकर निघून जातो.अनेकांची लघवी बंद होऊन जाते अश्यावेळी हि लघवी मोकळी होण्यासाठी रिटा तसेच खारीक च्या बिया पाण्यामध्ये ओटीपोट तसेच मूत्र इंद्रियावर याचा लेप लावायचा आहे आणि थोडासा शेक द्यायचा आहे असे केल्याने बंद झाली लघवी लवकर मोकळी होईल.
ज्या व्यक्तींना गुडघे दुःखी ची समस्या आहे अशा व्यक्तींनी रिटाच्या सालींची बारीक पावडर करून गरम पाण्यामध्ये टाकून त्याचा लेप तयार करून घ्या आणि हा लेप गुडघे दुखी असणाऱ्या ठिकाणी लावा. असे केल्याने गुडघेदुखी लवकरच थांबून जाईल. ज्या व्यक्तींना श्वसनाचा, दमाचा आजार आहे अशा व्यक्तींनी या रिटाच्या फळांचा काढा सुद्धा उपयुक्त ठरतो अशा पद्धतीने रीटा हा अतिशय उष्ण असणारा फळ आहे आणि आयुर्वेदिक शास्त्रामध्ये याचे अमूल्य असे महत्व आहे.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.