अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करत असतात परंतु आजच्या लेखामध्ये आपण घरच्या घरी आपला चेहरा कसा ग्लो करायचा आणि आपल्या चेहऱ्याच्या समस्या कशा पद्धतीने दूर करायचे आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत. हे चला ते मग जाणून घेऊया त्यांबद्दल . हा घरगुती आणि साधा सोपा उपाय आहे हा घरी उपाय करण्यासाठी आपल्याला एक पदार्थ लागणार आहे त्या पदार्थाचे नाव आहे ज्वारीचे पीठ.
असे म्हणतात की ज्वारीच्या पिठाची भाकरी बनवताना आपला हात आपण गाला ला लावल्यास आपली त्वचा डाग विरहित होते. ज्वारी थंडावा देणारी असून आपल्या त्वचेसाठी ज्वारी खूपच उपयुक्त ठरते. त्यानंतर आपल्याला उपाय करण्यासाठी हळद घ्यायची आहे. हळदी चेहर्यासाठी रामबाण ओळखली आहे. अनेक काळापासून लोक हळदीचा वापर चेहरा उजळण्यासाठी करत असतात.त्याचबरोबर हळदीचा उपयोग चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी चेहऱ्यावरील वांग दूर करण्यासाठी सुद्धा करत असतात.
अशी हळद आपल्याला ज्वारीच्या पिठामध्ये पाव चमचा टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला बदामाचे तेल घ्यायचे आहे. बदामाच्या तेलामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक पद्धतीने ग्लो येत असतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन तीन थेंब बदामाचे तेल घ्यायचे आहे. त्यानंतर आपला चौथा पदार्थ घ्यायचा आहे तो म्हणजे लिंबुचा रस.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन थेंब लिंबाचा रस घ्यायचा आहे कारण की जर तुमची त्वचा सेंसिटिव असेल तर त्याचा दुष्परिणाम त्वचेवर होऊ शकतो. चेहऱ्यावरील डाग निघून जाण्यास मदत होते. त्यानंतर शेवटचा पदार्थ आहे तो म्हणजे गुलाब जल. या गुलाब जलाचा चेहरा स्वच्छ होण्यासाठी केला जातो वरील सर्व पदार्थ हे गुलाबजल टाकून पेस्ट तयार होईल एवढे गुलाबजल आपल्या टाकायचे आहे.
आता आपण हात ,पाय ,काळसर पडलेली शरीरावरील कोणत्याही भागावर ची त्वचा वर हि पेस्ट लावू शकता. ही पेस्ट लावण्याआधी आपल्याला आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर ही पेस्ट लावायची आहे. ही पेस्ट अर्धा तास तरी आपल्या चेहऱ्यावर लावून ठेवायचे आहे.
त्यानंतर कोमट पाणी किंवा थंड पाण्याने आपण चेहरा स्वच्छ धुऊन टाकायचा आहे अशा पद्धतीने आठवड्यातून दोन-तीन वेळा जरी हा उपाय केला तरी आपल्या चेहऱ्यावरील जे काही काळे डाग आहेत ,वांग आहेत ,काळी त्वचा आहे ती पूर्णपणे निघून जाईल आणि आपला चेहरा हा चमकू लागेल.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.