पैसा येता-येता थांबतो अचानकपणे एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळणार असेल ते हातातून निघून जाते. अगदी कोणत्याही मार्गाने येणारा पैसा येता येता अचानक पणे थांबतो. तो पैसा आपल्या हातात पडतच नाही, घरामध्ये येतच नाही. अशावेळी या पैशाच्या वाटेतील बाधा कशा दूर करायचा असा प्रश्न अनेकांना पडत असतो. धनप्राप्तीसाठी ज्योतिष शास्त्रामध्ये एक महत्त्वाचा उपाय सांगितलेला आहे. हा उपाय केल्यामुळे पैशाची आवक वाढते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दिवसभरातील फक्त दहा ते पंधरा मिनिटे एवढा कालावधी लागणार आहे.
हा उपाय आपल्याला सातत्याने २७ दिवस करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे धनअधिपती कुबेर यांच्याशी संबंधित आहे. या विश्वामध्ये जेवढी धनसंपत्ती आहे त्या विश्वाचे कोषाचे धन अधिपती श्री कुबेर देव आहेत आणि त्यांना प्रसन्न करणारा हा एक महत्त्वाचा उपाय आहे. तुमच्या घरामध्ये कुबेर यांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर अतिशय उत्तम जर नसेल तर बाजारामध्ये हा फोटो मिळतो पण नसेल तर काही काळजी करू नका. आपण एका पाटावर एक लाल वस्त्र अंथरून त्या ठिकाणी फक्त एक दिवा जरी प्रज्वलित केला तरी चालेल.
हाच दिवा धन अधिपती कुबेर यांचं प्रतिनिधित्व करेल. अशाप्रकारे आपण कुबेर यांचे पूजन आपल्या देवघरामध्ये सुद्धा करू शकतात तसेच ही पुजा वेगळ्या पाटावर सुद्धा मांडू शकता. अशा प्रकारे आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन वेळा श्री कुबेर यांची पूजा अर्चना करायची आहे ,की पूजा अर्चना करत असताना आपल्याला श्री कुबेर यांचा मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. सत्तावीस दिवस मनोभावे जर आपण या श्री कुबेर मंत्राचा १०८ वेळा जप केल्यास आपल्याला योग्य ते फळ प्राप्त होते परंतु हा मंत्रजप करत असताना एक तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करा आणि मंत्रजप झाल्यानंतर श्री कुबेर चालीसाचे पठण करायचे आहे.
ज्या व्यक्तींना श्री कुबेर चालीसाचे पठण करणे शक्य होणार नाही त्यांनी आपल्या मोबाईलवर यूट्यूब च्या सहाय्याने फक्त कुबेर चालीसा ऐकली तरी चालेल आणि त्यानंतर आपण हात जोडून श्री कुबेर देवांना मनोभावे आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत त्या सांगायच्या आहेत. जर तुमच्याकडे मोत्याची माळ असेल किंवा चंदनाची माळ असेल तर अतिशय उत्तम कारण की चंदनाच्या किंवा मोत्याच्या माळ्यावर जर कुबेर मंत्राचा जप केल्यास अतिशय प्रभावी मानला जातो.
ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक मंत्र सांगितले गेले आहेत. त्या प्रत्येक मंत्राचा विशिष्ट समस्येसाठी व विशिष्ट इच्छापूर्तीसाठी त्याचा वापर केला जातो. म्हणूनच आपल्याला आपल्या जीवनातील धनप्राप्तीसाठी व धन येत असताना जे काही अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे “ओम श्रीम ओम ऱ्हीम श्रीम ऱ्हीम श्री वित्तेश्वराय नमः” या मंत्राचा जप जर मनोभावे केला तर तुमच्या जीवनातील ज्या काही धन समस्या आहेत. पैसा येता-येता थांबत आहे. हे सारे बंद होईल आणि पैशाची आवक वाढून तुमच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि प्रगती होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.