मित्रांनो जर तुमच्या कुंडली मध्ये शनीची साडेसाती आलेली असेल, शनिदोष असेल तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत कि या शनी दोषांपासून तुम्हाला नक्कीच आराम पडेल. मित्रांनो शनीची साडेसाती जेव्हा जेव्हा सुरु होते माणसं घाबरून जातात कारण शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत. आपण जी काही कर्म करू त्याचे फळ देतात.
तुम्ही जर दुष्कर्म केलेली असाल तर तसे फळ शनिदेव देतात. तुमच्या घरातील पैसे अचानक गायब होऊ शकतो. तुम्ही जे काही काम करताय त्यामध्ये अनंत अडथळे येऊ शकतात. कोणत्या न कोणत्या प्रकारे तुमच्या जीवनात नुकसान ठरलेलं आहे जर शनिदोष असेल. आणि म्हणून चांगली काम करण्याचा प्रयत्न करा. मात्र आपल्याला माहितेय आपल्या हातून नकळत काही अशी काम घडतात ज्यामुळे शनिदेव आपल्यावरती क्रोधीत होऊ शकतात.
मित्रांनो जर तुमच्याही जीवनामध्ये अशा समस्या असतील, कोणतीही काम यशस्वी होत नाहीयत, कामामध्ये अडथळे येतात, पैसा प्राप्ती मध्ये अडचणी आहेत, नशीब साथ देत नाहीय तर लक्षात घ्या तुम्हाला जाणून घ्यायला हवं कि तुमच्या कुंडली मध्ये शनिदोष आहेत कि नाही.
मित्रांनो शनीदोष दूर करण्यासाठी काही गोष्टींचं पालन नक्की करा. पहिली गोष्ट म्हणजे शनिवारच्या दिवशी हा उपाय नक्की करा. आपल्या घराच्या आसपास काळा कुत्रा नक्की असेल त्या काळ्या कुत्र्याला आपल्या घरातील जी शेवटची भाकरी किंवा चपाती आहे ती नक्की खाऊ घाला. मित्रांनो शनिदोष जर लवकर नष्ट व्हायचा असेल तर या काळ्या कुत्र्याला जी भाकरी टाकत आहोत ती गोड बनवा म्हणजेच त्यात गूळ टाका. गूळ टाकून हि भाकरी बनवा.
तर अशी गोड भाकरी टाकल्याने शनिदोषांपासून मुक्ती मिळते. मित्रांनो सकाळची जी भाकरी किंवा चपाती असेल जिला तुम्ही गोड बनवलेली असेल ती कावळ्यांना खाऊ घाला. त्यामुळे शनिदेवाची कृपा आपल्यावर बरसते. मित्रांनो शनिअमावस्या शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्वाची आहे. तर या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना काही वस्तू दान द्या. यामुळे देखील शनिदोष बऱ्यापैकी दूर होऊ शकतो.
मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या एखादी वृद्ध व्यक्ती आहे तिचा कधीच अपमान करू नका, यामुळे शनिदोष प्रचंड प्रमाणात वाढतो.वृद्ध व्यक्तींसोबतच जे अपंग आहेत त्यांचा सुद्धा अपमान करू नका. जर तुम्ही त्यांच्या अपंगत्त्वावर हसलात तर हा एक मोठा अपमान असतो. यामुळे शनिदोष प्रचंड प्रमाणात वाढतो. जर तुम्ही वयस्कर व्यक्तिचे आशीर्वाद घेतलेत तर शनिदोष प्रसन्न होतात आणि काही प्रमाणात का होईना शनिदोष कमी होतो.
मित्रांनो स्त्रियांचा कधीच अपमान करू नका. त्यांना योग्य तो मान द्या, लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये कोणतंही शुभ कार्य असो त्या शुभ कार्याची सुरुवात स्त्रीच्या हातानेच करावी. यामुळे सुद्धा साडेसाती मध्ये फरक पडतो. तर मित्रांनो अशाप्रकारचे छोटेछोटे उपाय नक्की करा. तसेच हि माहिती आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्कीच विसरू नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.