मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना चरबीच्या गाठी येतात त्या चरबीच्या गाठीना आपण लीपोमा असे म्हणतात. त्वचेवर चरबीच्या गाठी होण्याची समस्या अनेकांना होते. काही प्रमुख भागावर प्रामुख्याने खांदा, मान, मांडी आणि पोटावर अशा गाठी होत असतात. या चरबीच्या गाठी ज्या असतात त्या गाठी कॅन्सरच्या नसतात, पण चरबीच्या गाठी धो’कादायक ठरत नसल्याने त्यावर उपचार करण्याची आवश्यकता फार प्रमाणात नसते तरी पण उपचार करणे फार आवश्यक असते.
आनुवंशिकता, जेनरिक फॅक्टर, हार्मोनल बदल यामुळे हा त्रास होऊ शकतो. हा त्रास घालवण्यासाठी आपल्याला साधा सोपा घरगुती उपाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याला दोनच वस्तू आवश्य लागणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सुगंधित उटणे, जे आपण दिवाळी मध्ये सहजपणे वापरतो, सध्या मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध होते आणि हे उटणे तुम्ही घरच्या घरी तयार देखील करू शकता.
दुसरा महत्त्वाचा घटक लागणार आहे तो आपल्याला एरंडेल तेल किंवा आपण जे आपल्या घरामध्ये केसांना जे तेल लावतो ते कोणत्याही प्रकारचे तेल असुद्या ते तेल घ्यायचं आहे. सुरुवातीला ज्या ठिकाणी गाठ झाली आहे त्या ठिकाणी आपल्याला साधारणता एक चमचा उटणे घ्यायचे आहे, जशी गाठ असेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी एक चमचा उटणे घ्या, हे उटणे दिवाळी पुरतेच मर्यादित नसून त्याचा उपयोग आपण अशा पद्धतीने केला तर त्याचा आपल्या शरीरावरची गाठ पूर्णपणे जाण्यासाठी याचा उपयोग होतो.
यामध्ये आपल्याला ऍड करायचे आहे साधारणतः अर्धा चमचा एरंड तेल. जर तुमच्याकडे एरंड तेल नसेल तर तुम्ही जे डोक्याला लावता ते खोबरेल तेल कोणत्याही पद्धतीच असुद्या, ते घ्यायचं आहे, हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित पणे एकजीव करून घ्यायचं आहे, एकजीव केल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला गाठ झाली असेल मग पाठ असो किंवा मान असो किंवा मांडीला , त्या ठिकाणी व्यवस्थितपणे या उटण्याने पूर्ण मसाज करून घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला आंघोळीपूर्वी करायचा आहे.
तुम्ही सलग सात दिवस करायचा आहे. तुम्हाला शरीरावर ज्यापण ठिकाणी चरबीच्या गाठी असतील किंवा कोणत्याही गाठी असू द्या त्या पूर्णपणे जाण्यासाठी हा उपयुक्त उपाय आहे. दुसरा उपाय आहे, तोही सोपा आहे, एक चमचा एरंड तेल घ्यायचे आणि ज्या ठिकाणी चरबीची गाठ झालेली आहे त्या चरबीच्या गाठीला तेलाने आपल्याला मसाज करायचे आहे, साधारणता हा उपाय आपल्याला सात दिवस पर्यंतच करायचा आहे.
एरंड तेलामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेत त्यामुळे तुमच्या चरबीच्या गाठी पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल. त्याच प्रमाणे सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय आहे, लिंबूरस , शरीरातील फॅटी टिशू कमी होण्यास मदत होतात. त्यामुळे लीपोमाचा आकार कमी होतो. यासाठी ग्लासभर पाण्यात लिंबू रस मिसळून घ्यावे. अशा पद्धतीने या तीन पद्धतीचा उपयोग करून तुमच्या शरीरावर कुठेही गाठ असलेल्या चरबीची ती पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.