किवी फळ दिसायला चिकू सारखे दिसते. हे फळ विटामिन सी ने परिपूर्ण असते. कीवी हे फळ आजकाल बाजारात अगदी सहज उपलब्ध होत आहे. बटाट्याच्या आकाराचं आणि चिकूप्रमाणे दिसणारं फळ अगदी चविष्ट आहे. डॉ-क्टरांच्या मते दररोज एक किवी फळ खाल्ल्यानं व्यक्तीचे आयुष्य वाढते. किवी फळात सर्व उपयुक्त तत्व आहेत. ज्याची शरीराला गरज असते.
दिवसातून एक किंवा दोन किवी खाल्ल्याने तुमच्या त्वचेला नक्कीच फायदा होऊ शकतो. हे खाल्ल्याने तुमची त्वचा मुलायम आणि तजेलदार दिसू लागते. यांत एंटी बै क्टीरियल असतात जे आपल्या त्वचेला मुरुमे तसेच अनेक अशा गोष्टींपासून दूर ठेवते. हे फळ हृदयाच्याही अनेक आजारांपासून तुमचे सं र क्ष ण करते.
या फळात असलेले पोटेशियम लो ब्लड प्रेशरला नियंत्रित करते इतकेच नाही तर यांमुळे हृदयविकाराचा झ ट का येण्याचा धो का कमी होतो. जर तुमचे ब्लड प्रेशर स्थिर आणि नियंत्रणात असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या हृदयाचे आरोग्य उत्तम आहे. यांत फायबर आणि विटामिन आहेत जे आपल्या धमन्यांना मजबूत करून त्यांची क्षमता वाढवतात.
कीवी फळाच्या सेवनामुळे घातक कोलेस्ट्रेरॉल घटक कमी होण्यास मदत होते. नियमित 8-10 आठवडे कीवीचे सेवन केल्यास कोलेस्ट्रेरॉलमुळे होणारा त्रा स कमी होतो. यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.
हे फळ डोळ्यांचे आ-रोग्य वाढवते. अस्थमासारख्या आजारांमध्येही हे खूप गुणकारी आहे. हिरव्या रंगाचे हे फळ तुमच्या डोळ्यांसाठी फार उपयुक्त आहे. मैकुल पडल्याने तुम्हाला कमी दिसते, आणि हे फळ तुमच्या डोळ्यांचे रक्षण करते. कीवीमध्ये विटामिन ई आणि अॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात.
किवी फळात विटामिन सी चे प्रमाण अधिक असल्यानं अनेक रोगांपासून आपला बचाव करण्यास मदत मिळते. सोबतच हे फळ डिप्रेशनची समस्याही दूर ठेवतो. हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खुप उपयुक्त ठरतो. यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. त्वचेची कांती सुधारते.
डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांना कीवी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण डेंग्यूमुळे रक्तीतील प्लेटलेट्सची संख्या प्रचंड प्रमाणात कमी होते. कीवीतील औषधी गुणधर्मांमुळे रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यास मदत मिळते. किवी मध्ये असणारे घटक रोगप्रतिकारक पेशी मजबूत करून घातक वि षा णूं वि-रोधात ल-ढण्यासाठी शरीराची शक्ती वाढवण्याचं काम करतात.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.