मित्रांनो, प्रत्येक महिन्यात एकादशी तिथी येते. एकूण वर्षात २४ एकादशी येतात. अधिकमासात यांची संख्या एकूण २६ इतकी होते. वैशाख कृष्ण एकादशीला अपरा एकादशी असेही संबोधले जाते. या एकादशीला श्रीविष्णूंची विशेष पूजा केली जाते. प्रत्येक मराठी महिन्यात दोन एकादशी येतात.
एकादशी म्हणजे श्रीविष्णूंना प्रसन्न करणे त्यांची आराधना करणे होय. श्रीविष्णू हे सृष्टीचे पालन करणारे आहेत, अशी मान्यता आहे. श्रीविष्णूंच्या पूजनाने, भजनाने आणि उपासनेने जीवनातील विघ्न दूर होतात. सुख, शांतता, समृद्धी येते, असेही सांगितले जाते. या दिवशी आपले कर्ज फिटावे, आपण कर्जमुक्त होण्यासाठी या दिवशी हा खास उपाय करा, यामुळे तुमचे कर्जाचे हप्ते थकणार नाहीत
किंवा कर्ज फिटण्यास अडचण येणार नाही. त्यामुळे हा उपाय नक्की करा. 6 जून अपरा एकादशी दिवशी हा उपाय करायचा आहे, पिंपळाच्या झाडाचे महत्व आपल्या हिंदू पुराणात भरपूर आहे, यामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात, एकादशीला श्रीहरी विष्णू यांची पूजा केल्यास आपल्या जीवनातील अडचणी कमी होतात.
एक कलश पवित्र, शुद्ध जल घेऊन त्यात थोडी साखर अथवा गुळ घालून या दिवशी सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाची पूजा करा व हे जल अर्पण करून 7 किंवा 11 प्रदक्षिणा घाला व ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. तसेच तुमच्या कर्जमुक्ती साठी श्री हरी विष्णूंकडे प्रार्थना करा.
तसेच घरात सतत वाद होत असतील तर या दिवशी सायंकाळी एक दिवा ज्यामध्ये राई च तेल घालून पिंपळाच्या झाडाखाली लावा, सुर्यास्तावेळीच हा दिवा प्रज्वलित करा. तसेच या दिवशी सकाळी लवकर उठून घरातील स्वछता करा व स्नान करून देवपूजा करा, भगवान श्री विष्णू व माता लक्ष्मीची एकत्र पूजा केल्याने या दिवशी विशेष आशीर्वाद मिळतो. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
तसेच या दिवशी दक्षिणावर्ती शंख घेवून त्याने भगवान विष्णूंना या दिवशी अभिषेक केल्यास आपली मुक्तता होते, जीवनातील अडचणी दूर होतात. जीवनात जर प्रत्येक कार्यात अडथळे येत असतील तर तुम्ही घरातील या एक वस्तूचा उपाय करा ज्यामुळे घरात भरपूर धन येईल, सर्व आर्थिक स म स्या दूर होतील.यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. यासाठी 1 रुपयाचा शिक्का स्वच्छ धुवून पुसून घ्या,
देवपूजा, माता लक्ष्मी व भगवान श्री हरी विष्णू म्हणजेच नारायण यांची एकत्रित पूजा करा, पूर्ण श्रद्धेने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करत पूजा करा व त्यांच्या चरणी हा एक रुपया अर्पण करा व पारिवारिक सुख तसेच घरगुती अडचणी यासाठी प्रार्थना करावी, नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल.
दुसऱ्या दिवशी हा रुपया नमस्कार करून घेवून तुमच्या तिजोरीत अथवा धनसंचय असणाऱ्या ठिकाणी ठेवा. याचा परिणाम नक्कीच थोडया दिवसात जाणवेल. यादिवशी कांस्य धातूच्या भांड्यात जेवण करू नये, तसेच तांदूळ अथवा तांदळाच्या कोणत्याही पदार्थांचे सेवन करू नका. भगवद्गीता, विष्णू सहस्त्रणाम, विष्णू स्तोत्र, विष्णू यंत्र पूजन, माता लक्ष्मी पूजन या दिवशी करावे.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.
अशाच उपयोगी धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.