अशाप्रकारे घरातल्या घरात वेलची चे झाड लावा..या उपयांनी तुम्ही स्वतःच्या घरातच वेलची, इलायची उगवू शकता..

सामान्य ज्ञान

आपण घरामध्ये विविध प्रकारची झाडे, रोप लावतो, दररोजच्या जीवनात लागणाऱ्या वनस्पतींची कुंडीत मशागत करतो. चहात लागणारा गवती चहा आपण परसात लावतो. पण बहुगुणी वेलची घरात परसदारी उगवलेली फार कमी जणांनी ऐकली असेल. तोळ्यावर विकली जाणारी वेलची तुम्ही तुमच्या परसात तिचे झाड अशा प्रकारे लावू शकता व तिची मशागत करू शकता.

आपण घरी जी इलायची विकत आणतो तीच्यातील लहान लहान दाणे काढावेत. यासाठी आपल्याला मोठी वेलची लागेल जी घेऊन त्यातील त्याचे दाणे मोठे असतील. कारण या बिया जेवढ्या मोठया असतील तेवढे चांगले असते. हे सर्व दाणे एका प्लेट मध्ये किंवा वाटीत पाणी घेऊन त्यात भिजायला टाका.

या बियांचा वरील भाग कठीण असल्याने या बियांना 5 ते 6 तास भिजवून मऊ होईपर्यंत ठेवा. या बिया लावताना जास्त लावाव्यात कारण काही बिया जरी उगवल्या नाहीत तर अचानक प्रॉब्लेम नको त्यासाठी जास्त वापरा जेणेकरून बाकीच्या तरी उगवतील. आपण अगदी सोप्या पध्दतीने याला लावू शकता.

हे वाचा:   डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वर चीप का लावलेली असते.? ९९% लोकांना माहित नाही याचे कारण.!

या बिया किंवा दाणे लावण्यासाठी आपल्याला एक सिडलिं-ग पॉट ची गरज आहे हे आपल्याला बाजारात अगदी कमी किंमतीत मिळते. याला खाली एक छोटे छिद्र करा जास्तीचे पाणी जाण्यासाठी. हिरव्या वेलचीची झाडे उगवण्यासाठी आपल्याला 4 ते 5 प्लास्टिकचे ग्लास लागणार आहेत.

त्यांनाही पण छि द्र करा जर तुमच्याकडे सिडलिं-ग पॉट नसेल तर याने तुम्ही काम चालवू शकता. जी पण माती तुमच्या भागात उपलब्ध होईल ती माती घेऊन त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कंपोस्ट खत घालून त्या ग्लास मध्ये ही माती भरून घ्या. याने तुमची माती अधिक पोषक बनेल,

त्यामध्ये बिया चांगल्या प्रकारे उगवू शकतात आणि त्यात थोडं पाणी टाकून ते ग्लास घ्या. या ग्लासमध्ये तुम्ही विविध प्रकारची झाडे लावू शकता त्याने तुमच्या घरात सर्व नैसर्गिकरीत्या तयार जेवणासाठी लागणाऱ्या वनस्पती निर्माण होतील. या वेलची बिया थोड्या मऊ झाल्यावर त्या एका सुख्या कपड्यात किंवा टिशू पेपर मध्ये घेऊन त्यांना वेगवेगळे करून थोडे सुखवा.

हे वाचा:   ऑक्सीजन सिलेंडर आणि वेंटीलेटर मध्ये नेमका काय फरक असतो.? ९९% लोकांना माहीत नसलेलं सत्य.!

यानंतर या बिया त्या तयार केलेल्या ग्लासमध्ये टाकाव्यात, प्रत्येक ग्लासमध्ये 4 ते 5 वेलची बिया लावाव्या. त्याला तुम्ही वरून थोडी माती टाका आणि सूर्यप्रकाशमध्ये ठेवलात तरीही चालेल. अशा प्रकारे रोज या बियांना हळुवारपणे पाणी देत रहा. या वेलची बिया 10 ते 12 दिवसात उगवून येतात.