मृत्यू नंतर नेमके आपल्या शरीरासोबत काय घडते जाणून घ्या..मृत्यूच्या आधी काय दिसते, कसा असतो आ’त्मा..रहस्य पहा

सामान्य ज्ञान

जीवन अनिश्चित आहे तसेच मृत्यू अटळ आहे. खरं तर मृत्यू हा जीवनाचा अंत नव्हे. जीवन आणि मृत्यू यांचे आंतरिक नाते आहे. परंतु जीवनापेक्षा मृत्यूचेच भय अधिक असते. पण मृत्यू ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि जगण्याचा अवकाश हे एक जै-विक सत्य आहे. माणसाच्या शरिरातील पेशींना जिवंत राहण्याचा काही काळ असतो. त्यांना निरंतर सजीव राहता येत नाही.

काही वर्षांपूर्वी नियर डेथ एक्सपीरियन्स हा मृत्यू जवळच्या मनुष्यबरोबर एक प्रयोग केला होता. त्याचे ते पेंशट आपला अनुभव सांगत होते. वैद्यकीय अभ्यासानुसार, 50% लोकांनी सांगितले की त्यांना आधीच माहित होते की ते मेलेले आहेत. 56% लोकांसाठी, हा एक आनंददायी अनुभव होता. 24% लोकांचा शरीराबाहेरचा अनुभव होता, ते त्यांच्या शरीराबाहेर पडले होते आणि ते स्वत:च्या मृतदेहकडे पाहू शकत होते , 32% लोक कोणत्यातरी मृत व्यक्तीशी बोलत होते.

या व्यतिरिक्त काहींना दूरवरुन प्रकाश येताना दिसत असे व या प्रकाशामध्ये त्यांना त्यांचे मृत पूर्वजांचे दर्शन होई आणि कधीकधी अचानक आनंद किंवा कधी खूप भीती वाटायची .परंतु हा अभ्यास तसा पूर्ण नव्हता. हा प्रयोग पुढे खुप वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि येथील वेगवेगळ्या  लोकांवर केला गेला.

हे वाचा:   मुंबईच्या ताज हॉटेलची कमाई आणि तेथे काम करणाऱ्या वेटर चा पगार ऐकून तुम्हीही चकित व्हाल.!

यामुळे हे साध्य झाले की मृत्यू अशी प्रक्रिया आहे जी शरीरातील कोणत्यातरी गोष्टींमुळे उद्भवते जसे की शरीराच्या मुख्य व महत्वाच्या भागातील पेशींचा मृत्यू होतो. यावरून शास्त्रज्ञांनी असे शोधून काढले की मृत्यू जवळ असताना, आपल्या मेंदूत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे, मेंदूच्या प्रक्रियेस गती मिळते आणि यामुळे आपण विचित्र गोष्टी अनुभवतो.

मरताना असे आढळले की आपल्या मेंदूमध्ये आपल्या इंद्रियातून प्राप्त होणारी माहिती मिसळते. मरण्यापूर्वी आपले हृदय धडधडणे थांबेल. मेंदू पूर्णपणे बंद होतो आणि काही वेळात हळूहळू मेंदूच्या सर्व प्रक्रिया बंद होऊ लागतात. यामुळे, बाह्य अशा कोणत्याही सूचना या शरीरातील सर्व पेशींमध्ये पोहोचत नाहीत आणि सर्व कार्य थांबवतात.

यानंतर शरीराच्या सर्व स्नायूंना कायमचा आराम मिळतो कारण त्यांना ऑक्सिजन मिळत नाही. एकदा मेलेले शरीर असेल तर याचा अर्थ असा होत नाही की त्याच्या आत सर्व काही मृत आहे. काही पेशी अजूनही जिवंत असतात. मृत्यू नंतर, शरीराचे तापमान खाली येते कारण त्यात ऊर्जा निर्माण होत नसते आणि धडधड थांबल्याने रक्त देखील शरीराच्या खालच्या भागात जमा होऊ लागते.

हे वाचा:   प्रेम आणि कामवा’सना यांच्यामध्ये काय फरक आहे...वा’सना कशापद्धतीने भरलेली असते..बघा काय सांगते गरूड पुराण..

त्यामुळे काहीवेळ शरीर उष्ण असते जे हळूहळू थंड होत जाते. यावेळी शरीरातील विघटन देखील सुरू होते. शरीराच्या पेशींच्या मृत्यूनंतर कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण पेशींवर वाढू लागते. त्यामुळे शरीराचा रंग बदलण्यास सुरवात होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस तयार होतात. 2 ते 3 दिवसानंतर, आपल्या आत असलेले बॅ-क्टेरिया आपल्या अवयवांना खायला लागतात.

दरम्यान, त्याआधीच शरीराचा रंग बदललेला असतो, जो शेवटी पूर्ण काळा होतो. काही दिवसांनी किडे शरीराला खायला सुरुवात करतात. ही प्रकिया 1 वर्षापर्यंत जाऊ शकते आणि त्यानंतर फक्त हाडे आणि केस यासारख्या गोष्टी काही वर्ष तशाच राहतात. विज्ञानाच्या अनुसार मानवी मृत्यूनंतर या सर्व गोष्टी मानवी शरीरासोबत घडतात.