फक्त एका प्लॅस्टिक बॅग ने बनवा झाडू फक्त 2 मिनिटांत.. यानंतर झाडू घेण्याची गरजच पडणार नाही.!

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, आज आपण एका प्लास्टिक बॅग पासून एक झाडू तयार करणार आहोत तेही फक्त दोन मिनिटामध्ये. एकही रुपया खर्च न करता या झाडूने तुम्ही पूर्ण घर स्वच्छ करू शकता, जाळे काढणे, खिडक्या साफ करणे, भिंती साफ करणे, जिथे आपला हात पोहोचू शकत नाही तिथे हा झाडू जाऊन स्वच्छता करेल. तुमची कामे पूर्ण होणार आहेत तेही अगदी कमी वेळेमध्ये आणि यामध्ये तुमचे भरपूर पैसे देखील वाचतील. ज्या कॅरी बॅग आपल्या कपड्या सोबत येतात त्या आपण अशाच घरामध्ये ठेवतो. त्यात आपण काहीतरी कचरा टाकतो, काहीतरी ठेवतो.

पण आज या बॅगचा तुम्ही असा भन्नाट आगळा वेगळा उपयोग एकदा नक्की करा, ज्यामुळे तुमची अवघड किचकट कामे सोपी होतील आणि भरपूर पैशांची बचत सुद्धा होईल. यामध्ये तुम्हाला कोणतही मोजमाप घ्यायची गरज नाही फक्त आणि फक्त एका कॅरीबॅग पासून देखील तुम्ही हे करू शकता. नक्कीच तुम्ही या झाडूला पुढचे 10 ते 20 वर्ष सहज वापरू शकता, एवढा छान, मजबूत आणि युजफूल हा झाडू बनतो.

यासाठी आता एक कॅरी बॅग आपल्याला घ्यायची आहे. अशा मध्यम आकाराची कॅरी बॅग घ्या किंवा छोटी मोठी देखील तुम्ही घेऊ शकता तर याच्या आपल्याला अशा पट्ट्या करायच्या आहेत. तर आता बघा याला देखील मी असं पट्ट्यामध्ये कट करणार आहे. आता आपण याच्या अशा तीन फक्त मी पट्ट्‌या काढलेल्या आहेत कारण की बाकी भाग याचा फाटलेला होता तर अशा काही पट्ट्या आपल्या तयार आहेत.

आता काय करायचं आपण मधोमध्ये याला कट केलं होतं तर याच्या दोन्ही बाजू अशा बंद आहेत तर त्याला अगोदर आपण ओपन करून घेऊयात, म्हणजे आपल्याला एक अशी लांब पट्टी मिळेल. आता बघा याच्या कडा आपण कट केल्या आणि आपल्या अशा पट्ट्‌या तयार आहेत. आता बघा काय करायचं एक पट्टी आपल्याला घ्यायची आहे तुम्ही याला दोन तीन वेळा फोल्ड करून देखील अशापकारे यावरती एक बोट अर्था अर्धा इंच असे कट मारू शकता.

हे वाचा:   त्या जागे वरचे केस काढण्याची योग्य पद्धत..त्या भागाचा काळेपणा दूर करा..अनावश्यक शरीरावरचे केस फक्त 1 मिनटात घरच्या घरी अशाप्रकारे..

वरची बाजू पूर्णपणे कट करायची नाही थोडासा भाग असा ठेवायचा आणि फक्त खाली अस आपण याला कट करून घ्यायच आहे. आता बघा या सर्व पट्ट्यांना आपण असं कट करून घेतलेल आहे. यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एक दांडी. तर इथे अगदी छोटीशी तुम्ही दांडी देखील घेऊ शकता, लाकडाचा पाईप असेल तर पाईप घेऊ शकता पण मी थोडीशी अशी लांब दांडी घेतलेली आहे.

त्यांनतर बघा आता एक पट्टी घ्यायची. इथे आपल्याला काही चिकट पट्टी असं काही लागणार नाही. पुन्हा नंतर आपण चिकट पट्टी वापरणार आहोत एक दोन ठिकाणी. सुरुवातीला फक्त याला असं दाबून एका ठिकाणी ठेवायचं आणि त्यानंतर अगदी हात नाही फिरवायचा फक्त जी दांडी आपण घेतलेली आहे ती फिरवत राहायची आहे. जास्त खाली नाही घ्यायचं. त्याच ठिकाणी थोडं थोडसं खाली घेऊन आपण याला असं फिरवून घ्यायचं म्हणजे छान हे असं जाड गुच्छेदार बनत. जेणेकरून वापरायला सोपं जातं.

त्यानंतर एक चिकट पट्टीचा छोटासा भाग घ्यायचा त्यावरती चिटकवायचा आणि त्यानंतर दुसरी आपण जी पट्टी कट करून ठेवली ती आपल्याला या ठिकाणी अशापकारे ठेवून आपली जी दांडी आहे त्याला फिरवून फिरवून त्या जागेवरतीच याला अशापकारे लावायच आहे. जाड आपला झाडू तयार होतो. तर बघू शकता अशाप्रकारे आपण सध्या फक्त दोन पट्ट्या लावलेले आहेत तुम्हाला जर हा छोटा हवा असेल तर तुम्ही अगदी एकच जी कॅरी बॅग आहे मिडीयम साईजची ती जरी वापरली तरी चालेल आणि जी नॉर्मल साईजची कॅरी बॅग असते त्यामध्ये तर खूप छान हा झाडू बनतो. अगदी दुकानामध्ये इकडे तिकडे कुठेही तुम्ही याला वापरू शकता.

हे वाचा:   या पाच राशीच्या व्यक्ती लगेच प्रेमात पडतात.. कारण यांच्यामध्ये खूप उत्साह असतो.. आजच जाणून घ्या..

बाथरूम टॉयलेटच्या जाळ्या स्वच्छ करण्यासाठी आणि छोटासा जर तुम्ही याला हातभर दांडी घेऊन जर बनवलं तर तुमचा जो बेड आहे, सोफा आहे, त्यासाठी सेपरेट असा हा झाडू जरी ठेवला तरी त्याची देखील स्वच्छता करायला तुम्हाला याला वापरता येईल. आता बघा अगदी जिथे आपला हात पोहोचू शकत नव्हता आपण किती सहज याच्या मदतीने काढू शकतो.

बाजारामध्ये असे वेगवेगळे झाडू मिळतात पण भरपूर त्यासाठी पैसे मोजावे लागतात. ते लवकरच खराबही होतात पण त्यापेक्षा जर तुम्ही फक्त दोन मिनिट वेळ काढला तर नक्कीच तुम्ही देखील असे पैसे वाचू शकता आणि घरामध्ये हाताने बनवलेल्या गोष्टींची मजाच वेगळी त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा. प्लास्टिक कॅरी बॅगचा असा यूज तुम्ही कधी पाहिलाय का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या लेखाला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व महिलांना याचा फायदा होईल.