आपल्या घरात भांडण, वाद, तंटा व्हावे असे कोणालाच वाटत नाही याशिवाय ज्या घरात नेहमी भांडण होतात अशा घरात माता लक्षी सुद्धा कधीही थांबत नाही अशा प्रकारच्या घरांमध्ये दारिद्रता वास करू लागते.पती-पत्नी एकमेकांचे जोडीदार असतात. पती-पत्नी यांचे नाते हे विश्वासाचे ,मधुर व एकमेकांना साथ देणारे नाते असते परंतु अनेक वेळा त्यांच्या या पवित्र गोड नात्याला कुणाची तरी नजर लागते.
अशावेळी हे नाते गोड मधुर न राहता ताणतणावाचे बनुन जाते. छोट्या-मोठ्या कारणावरून पती-पत्नीमध्ये खटके उडू लागतात. भांडण होऊ लागतात. कधी कधी हे वाद एवढे मोठे होतात की त्यांचे परिणाम सुद्धा चांगले होत नाही. जेव्हा अशा प्रकारची भांडणे होतात तेव्हा या भांडणाचा दोघांना त्रास होतो. या भांडणमुळे दोन्ही व्यक्ती दुःखी होतात आणि त्यांच्या मधुर नात्यांमध्ये अंतर निर्माण होऊ लागते.
जर या गोष्टी मध्ये नवरा बायको यांचे निरीक्षण केले तर या भांडणाच्या मागे ठोस असे कोणतेच कारण नसते. छोट्या छोट्या गोष्टींमुळे नवरा बायको यांच्यात भांडण होत असते आणि हीच छोट्या गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणात विचार करतो तेव्हा या गोष्टी मोठ्या होतात. अनेकदा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो अशा वेळी नेमके कारण काय आहे की ज्यामुळे पती पत्नी यांच्यामध्ये भांडण होत असतात तर अशावेळी याचे उत्तर आहे ते म्हणजे अहंकार.
बहुतेक वेळा पती-पत्नी या दोघांमधील अहंकार हा भांडणाचे मूळ कारण ठरत असते. मी श्रेष्ठ अशी भावना दोघांपैकी प्रत्येक जण आपल्या मनामध्ये घेऊन वावरत असतात आणि अशा वेळेस एकमेकांचा अहंकार दुखावल्या मुळे सुद्धा भांडणाचे कारण निर्माण होते. प्रत्येक जण मी श्रेष्ठ अशा भावनेने जगत असतो आणि दोघांपैकी कुणीच मागे वळायला पाहत नाही यामुळेच भांडणं तीव्रतेने वाढतात.
जर अशा वेळी दोघांपैकी एकाने सुद्धा माघार घेतली तर भांडण नष्ट होऊ शकते. दोघांमधील नाते कायमस्वरूपी टिकू शकते म्हणूनच जर एखाद्या वेळी पती-पत्नीमध्ये भांडण झाले तर दोघांपैकी एकाने समजुतीने विभागून माघार घेणे गरजेचे आहे अशा वेळेस हे नाते चांगले राहू शकते व या नात्यामधील गोडवा निर्माण होऊ शकतो अन्यथा ही नाती पूर्णपणे नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.
कोणाच्याही सांगण्यावरून घरामध्ये भांडण करू नका त्याचबरोबर एकमेकांवर संशय सुद्धा घेऊ नका कारण की आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती नेहमी वावरत असतात ज्यांना आपले नाते चांगले असलेले पाहावत नाही म्हणून अशा वेळी आपल्या नात्यांमध्ये फूट पाडण्यासाठी दुष्ट व्यक्ती काहीतरी प्रयत्न करत असतात. बाहेरच्या व्यक्तींच्या वागणुकीमुळे आपल्या जीवनावर अजिबात परिणाम होऊ देऊ नका आणि आपले जीवन चांगले चालले असेल त्याला अजिबात खराब करू नका अन्यथा तुमचे जीवन उद्ध्वस्त सुद्धा होऊ शकते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.