लग्न करण्यासाठी कुंडली जुळणे खरच गरजेचे आहे का.? जाणून घ्या यामागील खरं सत्य.!

अध्यात्म

मुलगा मुलगी वयात आल्यानंतर त्यांच्या साठी स्थळ शोधण्याची कार्य आई वडील करत असतात आणि आवश्यक व गरजेचे सारखा इच्छेनुसार स्थळ मिळाल्यावर घेणे देण्याची चर्चा सुरू होते आणि मग धूम धडाका मध्ये लग्न लागते. कधीकधी हे लग्न धूम धडाके मध्ये होऊन सुद्धा येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये लग्न बसून जाते किंवा त्या लग्नामध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या असतात. दोघांच्या जीवनामध्ये असे काही घटना घडतात की त्यामुळे पुढे लग्न टिकणं कधी कधी अशक्य होऊन जाते.

कोणत्या ना कोणत्या कारणामुळे काहीतरी दोघांमध्ये भांडणं होऊ लागतात आणि परिणामी लग्न मोडण्याच्या परिस्थितीमध्ये येऊ लागते असे का होते असा प्रश्न सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होतो पण त्याचबरोबर असेसुद्धा म्हटले जाते की लग्नाच्या गाठी या स्वर्गामध्ये बांधल्या जातात. आपण फक्त योग्य तो वर शोधून त्याच्यासोबत संसार करायचा असतो. या जोड्या जोडताना आपल्याला खूप खटाटोप करावा लागतो.

आपल्याकडे काही या जोड्या सहज जोडल्या जातात. काहींना जोड्या जुळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. काही जोड्या गुंतागुंती असेल तर ती सोडावी लागते. काहींच्या जोड्या सहज निर्माण होऊन पुढे संसार सुद्धा व्यवस्थित होऊ लागतो परंतु काहींना खूप सार्‍या आपण त्यांना सामोरे जाऊन प्रयत्न करावे लागतात. लग्न जुळवताना सर्वात पहिले काम म्हणजे कुंडली जुळवणे.

हे वाचा:   देव पूजा करा किंवा नका करू पण या पाच सवयी जरूर लावा; पैसा व सुख कधीच कमी पडणार नाही.!

काही लोकांचा कुंडलीवर विश्वास असतो तर काही लोकांचा कुंडलीवर विश्वास बसत नाही. आजकालची तरुण पिढी तर कुंडली ग्रहतारे यांच्यावर आजिबात विश्वास ठेवत नाही परंतु आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या पुढे तरुण पिढीचे काही चालत नाही आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या म्हणण्यानुसार या व्यक्ती आपल्या कुंडलीची तपासणी करु लागतात. ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडली ग्रह तारे आकाशगंगा दोष निवारण या सर्व गोष्टींना खूपच महत्त्व देण्यात आलेले आहे.

ज्या व्यक्तीला ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे अशा व्यक्तीने कुंडली आवश्य पाहीली पाहिजे व ज्या व्यक्तीची कुंडली व्यवस्थित नसेल तर अशा व्यक्तीने दोष निवारण करून काही शांती करून आपले कुंडलीतील ग्रह-तारे व्यवस्थित करायला हवे. जर मुलगा व मुलगी यांचे मन एकमेकांसोबत जुळत नसतील तर अशा वेळी कुंडली जुळवणे सुद्धा काय फायदा आहे. जर मुला-मुलींचे मन एकमेकांसोबत जोडली असेल तर अशा वेळी कुंडली जुळवणे कधीही चांगले असते.

अनेकदा काही लोकांचे कुंडलीत 36 36 गुण जुळत असतात परंतु त्यांचे तोंड नेहमी 36 आकारासारखे असते परंतु काही जण असे सुद्धा असतात की त्यांचे गुण जरी कुंडलीतील जुळत नसले तरी त्यांचे वागणे एकमेकांशी नेहमी चांगले असते त्यांचे मन एकमेकांबद्दल नेहमी आदाराने एकमेकांकडे पाहत असते. ते आनंदाने संसार करत असतात.

हे वाचा:   मृत्यूनंतर आ'त्मा किती दिवस हा घरामध्येच राहतो? यानंतर कसा असतो आ'त्माचा पुढचा प्रवास..गरुड पुराणात सांगितलेली ही माहिती जाणून घ्या..

आपल्या आजूबाजूला असे अनेक जोडपी आहेत की ज्यांनी कुंडली न पाहता सुद्धा आपल्या लग्नाचा 75 वा वाढदिवस साजरा करत आहात. कुंडली ही पाहणे ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. जर तुम्हाला कुंडली पाहायची असेल तर अशा वेळी ती नीट पहा परंतु कुंडली पाहिल्यानंतर जर काही दोष निवारण होत असेल तर त्याचे उपाय करा परंतु कुंडली मुळे काही नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये करून घेऊ नका अन्यथा कुंडली पाहूच नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.