धान्यातील कीड 1 मिनिटात पळून जाईल; फक्त वापरा घरातील हे दोन पदार्थ.!

ट्रेंडिंग

आपण घरामध्ये विविध प्रकारचे धान्य आणून ठेवत असतो त्यामध्ये गहू ,तांदूळ, मैदा, रवा हा किराणा महिन्याचा आपण एकदाच भरत असतो किंवा धान्याचा साठा पण घरामध्ये करून ठेवत असतो त्यामध्ये डाळी असतील, गहू असेल परंतु हे सामान आणल्यावर एक समस्या असते ते म्हणजे धान्यात किडे पडणे किंवा अळी पडणे ही समस्या खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवते.

आपल्यात धान्यात कीड पडली की धान्य खराब होते. धान्य खराब होऊ नये म्हणून आपण विविध केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरत असतो त्याच्यामध्ये गोळी, पावडर असते परंतु त्याचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो शिवाय त्याला मर्यादा सुद्धा असतात म्हणजे ज्या पावडर किंवा गोळ्या आहेत ते आपण तांदूळ किंवा रवा मैदा वगैरे आहे याच्यामध्ये ठेवू शकत नाही त्याचा वास यायला लागतो म्हणून आज तुम्हाला असा खास उपाय सांगणार आहे.

हे वाचा:   साबुदाणा कशाप्रकारे बनवला जातो.? साबुदाणा बनवण्याची पद्धत जाणल्यावर दंग व्हाल.!

या उपाय केल्याने तुमच्या धान्यामध्ये मग ते कुठल्या प्रकारचे धान्य डाळी असतील, कडधान्य असेल किंवा रवा किंवा मैदा कुठल्या प्रकारचे पीठ असेल त्याच्या मध्ये आळ्या ,कीड पडणार नाहीत आणि अगदी सहजरीत्या करता येणारा कुठलाही साईड इफेक्ट आणि कुठलाही वास वगैरे नसणारा हा उपाय आहे.

कुठल्या प्रकारचे धान्य जर तुम्ही स्टोअर करून ठेवत असाल, साठवून ठेवत असाल हा उपाय करण्यासठी आपल्याला मिरची घ्यायची आहे. लाल मिरची जास्ती सुकलेली मिरची तिखट असते त्याचबरोबर मिरचीला एक विशिष्ट गंध असतो त्यामुळे धान्यात कीड होत नाही त्याच बरोबर अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे त्याला एक विशिष्ट गंध असतो आणि त्याच्या वासाने ही कुठल्या प्रकारच्या धान्या मध्ये ठेवला तर त्या ठिकाणी किडे वगैरे होत नाही.हा पदार्थ रव्यामध्ये ठेवू शकता.

हे वाचा:   कपाटात ठेवा घरातील हि एक वस्तू, कपड्यांवरील येणारा घाणेरडा वास होईल चुटकीत गायब.!

या पदार्थ चे नाव आहे तेजपत्ता.मिरच्या आणि तेज पत्ता यामुळे धान्याला कीड लागत नाही.पावसाळ्यामध्ये हवेमध्ये मोईश्चर असतात आणि त्यामुळे ते खराब होतात तर त्यासाठी हा उपाय तुम्ही अवश्य करा असे केल्याने तुमचे धान्य अजिबात खराब होणार नाही.अगदी प्रत्येकाच्या घरात हे साहित्य मिरच्या आणि तेज पत्ते दोन्हींचा एकत्रित परिणामाने प्रकारच्या धान्यामध्ये, पिठामध्ये किड आले वगैरे होत नाही तर हा साधा सोपा उपाय आवश्‍य करा आणि आपले धान्य चांगले ठेवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.