आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आहारामध्ये समाविष्ट करत असतो. या कडधन्याचे आपल्या शरीराला विविध फायदे सुद्धा मिळत असतात परंतु असे काही कडधान्य आहेत जे आपल्या शरीराला अतिशय ऊर्जा प्रदान करत असतात आणि कमी काळामध्ये आपल्या शरीराला पोषक तत्वा सुद्धा प्रदान करण्याचे कार्य करत असतात.
या लेखामध्ये आपण अशाच प्रकारच्या एका कडधान्य बद्दल माहिती जाणून घेणार आहोत ते कडधान्य म्हणजेच चणे.चणे हे नियमितपणे खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा प्राप्त होत असते आणि चणे खाण्याचे वेगवेगळे प्रमाणसुद्धा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये व अन्न शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. चण्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील स्नायू सुद्धा वाढतात आणि त्याचबरोबर पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी मदत होते.
नियमितपणे चणे सेवन केल्याने आपल्या डोळ्यांची नजर सुद्धा तेज बनते आणि त्याचबरोबर हृ”दयाची गती सुद्धा निरोगी राहते. त्याचबरोबर चणे खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदे सुद्धा मिळत असतात. आपल्यापैकी अनेक जण दैनंदिन जीवनामध्ये चण्यांचा समावेश वेगवेगळ्या भाजीपाल्यामध्ये सुद्धा करत असतो.
आपण अनेकदा चणे उकळून घेतो किंवा कच्चे सुद्धा खात असतो परंतु अशावेळी आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की जर आपल्या शरीराला शक्ती प्राप्त होत असेल तर अशा वेळी हे चणे कच्चे खायला हवे की उकळून खायला हवे. जर आपण चुकीच्या पद्धतीने चणे खाल्ले तर आपल्या शरीराला त्याचा फायदा होण्याऐवजी चुकीचा फायदा होऊ शकतो म्हणून आजच्या लेखामध्ये आपण चणे खाण्याचे नेमकी कोणती पद्धत आहे याबद्दल जाणून घेणार आहोत.
बहुतेक वेळा आपण चणे खात असतो, ते शिजवून खात असतो किंवा कधीकधी चणे उकळलेले असतात तर कधीच मोड आलेले चणे आपण खात असतो. या तिघांपैकी नेमके कोणते चणे खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते हे सुद्धा जाणून घेणे अत्यंत गरजेचे ठरते आणि हे जाणून घेत असतानाच कोणते चणे खाल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते व कोणत्या प्रकारचे चणे आपल्या पचनसंस्थे साठी चांगले असते हे जाणून घेणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे ठरते.
कच्चे चणेमध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन यांची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये असते आणि फॅट कमी असते. जेव्हा आपण चणे उकळतो तेव्हा त्यामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन ची मात्रा कमी होऊन जाते आणि जेव्हा आपण त्याने भिजवून मोड येण्यासाठी ठेवतो तेव्हा यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व यांची मात्रा आपल्याला आढळते यामुळे आपल्या शरीराला आवश्यक पोषकतत्व सुद्धा प्राप्त होतात.
आपल्या शरीरासाठी पोषक ठरतात पण त्याचबरोबर उकळलेले चणे खाल्ल्याने आपली पचनसंस्था सुद्धा चांगली राहते आणि उकळलेले चणे खाल्ल्याने ते पचन होण्यासाठी सुध्दा जास्त कालावधी अवधी लागत नाही म्हणून या दोघांपैकी उकळलेले चणे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. जर तुमच्या वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करत असाल तर अशा वेळी आहारामध्ये उकळलेले चणे खाणे अत्यंत गरजेचे ठरते.
जेव्हा आपण मोड आलेले चणे बद्दल चर्चा करतो तेव्हा अशा वेळी अशा प्रकारचे चणे खाणे आपले शरीर खुपच पोषक ठरतात अशा प्रकारच्या चण्यामध्ये विटामिन चे प्रमाण भरपूर असतात परंतु जेव्हा पण हे चणे भिजत असतो तेव्हा विशिष्ट प्रकारची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे.
कारण बहुतेक वेळा जास्त काळ चणे भिजल्यामुळे त्यावर अनेक सूक्ष्मजीवांची वाढ होण्याची शक्यता असते आणि अशा वेळी हे चणे खाताना यामध्ये थोडे गरम पाणी टाकून खायला हवे अन्यथा आपल्याला या जीवजंतू मुळे पोटात इ’न्फेक्शन सुद्धा होऊ शकतात म्हणून आहारामध्ये चण्याचा सेवन करत असताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. चणे खाल्ल्याने आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा प्राप्त होते आणि ही ऊर्जा आपल्या शरीराच्या विकासासाठी आणि वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.