श्रावण महिन्यात आपण अनेकांनी महादेव यांची पूजा अर्चना केली आहे. आणि भगवान भोलेनाथ त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काही तरी प्रयत्न करत असतो. आपण सुद्धा भोलेनाथ यांना प्रसन्न करण्यासाठी बिल्वपत्र म्हणजेच बेलाची पानने शिवलिंगावर वाहतो. असे केल्याने भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतात.
ही बेलाची पान वाहल्याने भगवान भोलेनाथ शांत होतात आणि त्यांचा आपल्याला आशीर्वाद नक्की मिळतो. ही बेलपत्र तोडताना आणि देव शंकर यांना अर्पण करताना काही नियमांचे पालन करणे गरजेच आहे. आपल्या मनामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये धर्माचं पालन करताना निसर्गाचे सुद्धा रक्षण होईल याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसते आणि म्हणूनच देवी-देवतांना जी फुल आणि पान आपण अर्पित करतो तेव्हा फुल आणि पान तोडणे संबंधी काही नियम बनवण्यात आलेले आहेत.
आज आपण अशी च एक महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.हे बेल पत्र म्हणजेच बेलाची पानं तोडताना आपण कोणती काळजी घ्यावी तसेच बेलाची पाने महादेवांना वाहताना आपण कोणत्या नियमांचे पालन करावे. पहिली गोष्ट चतुर्थी ,अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या या तिथी आहेत तसेच संक्रांती आणि सोमवार या दिवशी चुकूनही आपण बेलपत्र तोडू नयेत.
या दिवसाच्या व्यतिरिक्त आपण बिल्वपत्र बेलाचे पान तोडू शकता.तुम्हाला माहितीये की बेलाची पान शंकरांना अतिशय प्रिय आहेत मात्र त्याच्या आदल्या दिवशी ती तोडली तर चालते . ही पाने कधीही शिळे होत नसतात ती आपण स्वच्छ धुऊन महादेवांना नक्की अर्पण करू शकतो. आपण कोणत्याही दिवशी तोडलेली पाने महादेवांना अर्पण केली तर चालते असे शास्त्रात सांगितले आहे की जर तुम्हाला नवीन बेल पत्र मिळाले नाही तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीने वाहिलेले बेलपत्र सुद्धा पाण्याने स्वच्छ धुऊन पुन्हा महादेवांना अर्पण करू शकता म्हणजे तुम्ही पुन्हा याचा वापर करू शकता.
असे स्कंद पुराणामध्ये सांगण्यात आलेले आहे. बेलपत्र तोडताना आपल्याला काही काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. काही जण बेलपत्र तोडताना फांदी तोडत असतात हे अत्यंत चुकीचं आहे म्हणूनच बेलपान तोडत असताना झाडाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची काळजी सुद्धा घेणे गरजेचे आहे कारण की जेव्हा आपण ही पाने तोडू तेव्हा निसर्गात संरक्षण सुद्धा व्हायला हवे याची कुठे ना कुठे काळजी सुद्धा आपल्याला घ्यायला हवी कारण की एक बेलाचे झाड वाढण्यासाठी अनेक वर्ष लागतात.
ही पाने तोडण्याआधी व तोडल्यानंतर बेलाच्या झाडाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि मनातल्या मनात संकल्प करून बेलाच्या झाडाची परवानगी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे कारण की जर कोणत्याही गोष्टीची आपण परवानगी घेतली नाही तर त्याचे आपल्याला शुभ पाय सुद्धा प्राप्त होत नाही म्हणून बेलाचे पान तोडण्यात पूर्वी आपण बेलाच्या झाडाची मनोभावे अर्चना करून परवानगी घ्यायचे आहे.
त्याचबरोबर आता आपणही पान तोडल्यानंतर शिवलिंगावर कशा पद्धतीने व्हायचे आहे याबद्दल माहिती जाणून घेऊया. महादेवांना बेलपत्र वाहताना नेहमी उलटे बेलपत्र वाहिले जाते. जो पालथा भाग असतो तो वर ठेवला जातो.तुम्हाला जर तीन पानांपेक्षा जास्त म्हणजे बिल्वपत्र हे तीन पानांपासून ते अकरा पानांपर्यंत आपल्याला मिळतात. हे पान शितल असतात. झाडाला जितकी जास्त असतील ते बिल्वपत्र जास्त उत्तम मानले जाते.
जर तुम्हाला बिल्लू पत्र उपलब्ध झाले नाही तर तुम्ही चांदीचे बिल्वपत्र सुद्धा तुम्ही वाहू शकता. बरेचसे प्रदेश असे आहेत की ज्या ठिकाणी बेल पान मिळणे मुश्कील असते तर त्या ठिकाणी आपण चांदीचे बिल्वपत्र सुद्धा अर्पण करू शकता आणि त्याचा तुम्ही पुन्हा पुन्हा वापर करू शकता. आजून एक गोष्ट पक्की शिवलिंगावर ती बिल्वपत्र अर्पण करताना दुसरे पत्र अर्पण केले आहे.ते बेलपत्र अर्पण केलेला आहे त्याची उपेक्षा करू नका. त्यांना बोल देऊ नका त्यामुळे शिवशंभो आपल्यावर प्रसन्न होऊ शकत नाही त्याच्या क्रोधाला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.