नरकात जायचे नसेल तर या लोकांचा चुकूनही अपमान करू नका; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

अध्यात्म

वाल्मिकी रामायणात अशा चार व्यक्तींबद्दल सांगण्यात आलेले आहे ,जर आपण यांचा अपमान केला तर आपण कितीही पूजा-अर्चना करत असलो तरी आपल्याला त्याचे फळ प्राप्त होत नाही त्याचबरोबर आपल्याला नरकात सुद्धा जावे लागते आणि त्याचे वाईट फळं आपल्याला भोगावी लागते. चला तर मग जाणून घेऊया असे ते नेमके कोणते फळ आहे जे आपल्याला भोगावे लागतात.

या व्यक्ती मधील पहिली व्यक्ती आहे आई.आईला देवीचा दर्जा दिला जातो. जगातील सर्व धर्मग्रंथांत आईवर लिखाण करण्यात आलेले आहे. आईचा कधीच अपमान करू नये. आईवर नेहमी प्रेम करायला हवे. आईची सेवा करणारा व्यक्ती जगामध्ये सगळीकडे आदर मिळवतो. सुख संपत्तीच्या जीवनामध्ये नांदू लागतो परंतु जो व्यक्ती आईचा अपमान करतो त्याचा जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी निर्माण होत असतात.

अशा व्यक्तीवर भगवंत सुद्धा नाराज होतो आणि म्हणूनच कोणतेही कार्य करत असेल तर त्या कार्याचे फळ भगवान त्याला प्रदान करत नाही म्हणून कोणत्याही कठीण परिस्थिती असो अशा वेळी आईचे अपमान कधीच करू नये त्यानंतर दुसरे व्यक्ती म्हणजे वडील. आई वडिलांमध्ये ब्रम्हांड लपलेले असते असे म्हणले जाते. या आई वडीलांच्या अथक मेहनत यामुळेच मुलांचे पालन संगोपन होत असते.

हे वाचा:   या गोष्टी आयुष्यात नेहमी गुप्त ठेवा; नाहीतर आयुष्यात सतत रडत बसावे लागेल.!

आई वडील जीवाचे रान करून आपल्या मुलांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करत असतात. जे व्यक्ती आपल्या वडिलांचे ऐकत नाही त्यांच्या आज्ञेचे पालन करत नाही अशा व्यक्तींना पशुतुल्य समजले जातात. अशा व्यक्तींनी जीवनामध्ये कितीही सुख संपत्ती मिळवली तरी त्या संपत्तीचा लाभ घेता येत नाही त्याचबरोबर समाजामध्ये अशा व्यक्तींना मानसन्मान सुद्धा मिळत नाही.

त्यानंतरचे महत्वाची व्यक्ती आहेत गुरु आणि शिक्षक. आपल्याला जीवनामध्ये पुढे नेण्यासाठी गुरु व शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपल्या जीवनातील अज्ञान दूर करुन ज्ञानाचा दिवा गुरु व शिक्षक आपल्या जीवनात प्रज्वलित करत असतात. जे विद्यार्थी आपले गुरू व शिक्षक यांचा नेहमी अपमान करतात व त्यांच्याद्वारे मिळालेल्या विद्या यांचा अपमान करतात अशी व्यक्ती जीवनामध्ये कधीच यशस्वी होत नाही. गुरूंचा अपमान करणाऱ्या व्यक्तींना भविष्यात कधीच मानसन्मान मिळत नाही.

ज्या व्यक्ती गुरूंचा मान सन्मान करू शकत नाही ती इतरांचा सुद्धा मानसन्मान करू शकत नाही.ही काळया दगडावरची रेष आहे म्हणून विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक व गुरु यांचा नेहमी मान सन्मान करायला हवा त्यांचा शुभाशीर्वाद मिळवून आपले जीवन सफल बनवायला हवे. जी व्यक्ती आपल्या गुरूंचा अपमान करते त्या व्यक्तीला मोठे पाप लागते आणि या पापाचे प्रायश्चित्त नसते. चौथी व्यक्ती आहेत ज्ञानी आणि व विद्वान व्यक्ती. ज्ञानी व्यक्तींना देवा स्वरूप मानले जाते.

हे वाचा:   दररोज अशी करा तुळशीची पूजा; माता तुळशी होईल प्रसन्न, ताबडतोब इच्छा होईल पूर्ण.!

ही व्यक्ती भगवंतासारखीच पूजनीय आहे. ज्ञान-विद्वान लोकांच्या संगती मध्ये राहिले तर आपली प्रगती होते. ज्ञानी व्यक्तीच्या सोबत राहिल्याने आपल्याला हुशारी व चातुर्य लाभत असते परंतु जर आपण अशा व्यक्तींचा अपमान व त्यांची खिल्ली उडवली तर त्यांच्या शापाने व त्यांच्या अपमानाने आपले खूपच मोठे नुकसान होते. अशा व्यक्तींचा अपमान करणे म्हणजे महापापासारखे आहे याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.