आपले शरीर तंदुरुस्त मजबूत ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ सेवन करत असतो. काजू, बदाम, पिस्ता हे सगळे पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराला पोषक तत्व प्राप्त होत असतात. या ड्रायफुटचा समावेश आपल्या आहारामध्ये नेहमी करायला हवा असे अनेक जण आपल्याला सल्ले देत असतात म्हणूनच या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक अश्या ड्रायफूट बद्दल सांगणार आहोत.
हे असे फळ आहे जे आपल्या आयुष्यातील असंख्य आजार दूर करते आणि त्याचबरोबर हे फळ दिसायला जरी लहान असले तरी या फळाच्या अंगी असे विशाल गुणधर्म आहेत. जे आपल्या शरीरातील असंख्य आजार मुळापासून नष्ट करत असतात आणि या फळाला पोषक तत्त्वांचा भांडार म्हणून सुद्धा ओळखले जाते, चला तर मग जाणून घेऊया या फळाबद्दल..
या फळाचे नाव आहे अंजीर. अंजीर हे फळ आपल्याला हंगामानुसार खायला मिळत असते. परंतु हे फळ सहसा उपलब्ध होत असली तरी आपण अनेकदा या फळाकडे दुर्लक्ष करत असतो. हे असे फळ आहे जे एक फळ म्हणून सुद्धा खाल्ले जाते व एक ड्रायफूट सुकामेवा म्हणून सुद्धा खाल्ले जाते. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अंजीर या फळाला खूपच जुने फळ मानले गेलेले आहे त्याचबरोबर अंजीर मध्ये असे औषधी गुणधर्म आहेत जे मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्व पूर्ण मानले जातात.
अनेकदा आपण आपल्या वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो परंतु काही अंजिर खाल्ले तरी तुमचे वजन कमी होऊ शकते. जर तुमच्या शरीरामध्ये र”क्ता”चे प्रमाण कमी असेल आणि ऍ”नि”मि”या झाला असेल तर अशा वेळीसुद्धा अंजीर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. अंजीर फळे दिसायला जरी लहान असली तरी त्याचा उपयोग आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात होत असतो.
हे फळ दिसायला लालसर रंगाचे असते आणि आतून खूप सारे बी आपल्याला पाहायला मिळते. हे फळ चवीला तुरट गोड असते या फळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पोषक तत्व उपलब्ध असतात. अंजीर मध्ये पोटॅशियम, कॅल्शियम ,मॅग्नेशियम ,लोह भरपूर प्रमाणात उपलब्ध असते आणि त्याच बरोबर विटामीन सी,विटामीन ए सुद्धा उपलब्ध असते.
पुरुषांमध्ये जर कोणतीही शारीरिक दुर्बलता असेल तर अशा वेळी आपण रात्री झोपताना दोन अंजिर पाण्यामध्ये भिजवून सकाळी उपाशीपोटी खाल्ले तर पुरुषांच्या सर्व समस्या पूर्णपणे दूर होऊन जातात आणि पुरुषांच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ताकद निर्माण होते आणि त्याच बरोबर अंजीर फळे उर्जेचा स्त्रोत म्हणून पाहिले जाते यामध्ये भरपूर प्रमाणात लोह व हिमोग्लोबिन उपलब्ध असते आणि यामुळे आपले र”क्त सुद्धा शुद्ध होण्यास मदत होते.
आपल्यापैकी अनेक जण चेहरा टवटवीत बनवण्यासाठी वेगळे उत्पादनांचा वापर करत असतात त्याचबरोबर चेहऱ्यावर का”ळे डाग सुरकुत्या निर्माण होतात. जर तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा सुरकुत्या निर्माण झाल्या असेल तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये अंजीर चा समावेश करणे गरजेचे आहे कारण की अंजीर मध्ये पोषक घटक भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात आणि त्यामुळे तुमची त्वचा नेहमी तजेलदार व टवटवीत दिसते.
त्याचबरोबर तुम्ही आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या व काळे डाग दूर करण्यासाठी अंजीर ची पेस्ट बनवून बदामाच्या तेल मध्ये ही पेस्ट टाकून त्याने आपल्या चेहऱ्याला हलका मसाज केला व स्क्रबिंग तयार केले त्यामुळे सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग सुरकुत्या दूर होऊ शकते. जर तुमचे शरीरामध्ये र”क्ता”ची कमतरता असेल त्यामुळे वारंवार अशक्तपणा येत असेल तर अशा वेळी दिवसभरातून दोन वेळा अंजीर खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते कारण की अंजीर मध्ये भरपूर प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन ,लोह ,झिंक उपलब्ध असते.
ज्याप्रमाणे अंजीर खाण्याचे आपल्या शरीराला फायदे आहेत त्याचप्रमाणे अति प्रमाणामध्ये अंजीर खाल्ल्याने आपल्या शरीराला घातक सुद्धा ठरू शकते कारण की अंजीर हे उष्णता प्रदान करणारे फळ आहे आणि या फळांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते म्हणूनच हे फळ अनेकदा रात्री भिजवून सकाळी उपाशीपोटी खाण्याचे सल्ला दिला जातो.जर आपण असेच अंजीर फळ खाल्ले तर यामुळे तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला अनेक आजार सुद्धा होऊ शकतात म्हणून अंजीर खाताना आपल्याला विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.