झोपेत असताना का आपल्याला झटके येत असतात.? हे आहे यामागील महत्वाचे कारण.!

आरोग्य

अनेकदा आपण झोपलेले असतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे झटके आपल्याला जाणवत असतात अशा वेळी आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की हे झटके का येतात? यामागचे नेमके कारण काय आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये सांगणार आहोत. आपल्यापैकी अनेक जणांना गाढ झोपेमध्ये किंवा साखर झोपे मध्ये वेगवेगळे झटके बसतात. अनेकदा झोपे मध्ये आपण पडणार आहोत असा भास सुद्धा होत असतो आणि अशावेळी आपण स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो. असे तुमच्या सोबत सुद्धा अनेकदा झाले असेल चला तर मग जाणून घेऊया याबद्दल..

बहुतेक वेळा झोपे मध्ये आपल्याला झटके जाणवत असतात. अनेकांना असे वाटते की आपल्याला कोणता तरी आजार आहे परंतु आम्ही आपणास सांगू इच्छितो की झोपेमध्ये अशा प्रकारचे झटके लागण्याला हायपर निक जरक असे म्हणतात. असेच तेव्हा घडते जेव्हा आपण झोपलेला असतो ना पूर्णपणे जागे असतो म्हणजेच जी मधली वेळ असते अशा वेळी आपल्याला हे झटके बसत असतात किंवा अनेकदा असे झटके आपल्या झोपण्याच्या पहिल्या लेवलवर होत असतात म्हणजे की जेव्हा आपण झोपायला जात असतो अशा वेळी अशा प्रकारची झटके किंवा आपल्याला भास होत असतात.

हे वाचा:   भाकरी करताना त्यात 1 चमचा मिक्स करा हा पदार्थ; पोटातील घाण चुटकीत येईल बाहेर.!

अशा परिस्थिती मध्ये आपल्या हृदयाचे ठोके कमी जास्त प्रमाणात होत असतात आणि एका संशोधनानुसार अशाप्रकारे झोपेमध्ये झटके बसणे हे एक सामान्य आहे. अनेकांना असे वाटते की हे त्यांच्या सोबत घडते म्हणजे कोणतातरी आजार आहे परंतु आम्ही आपणास सांगू इच्छितो की हि परिस्थिती अत्यंत साधारण आहे. हा कोणत्या प्रकारचा आजार तसेच नर्वस सिस्टम मध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही.

या परिस्थितीवर वैज्ञानिकांचे म्हणणे असे आहे की ही स्थिती अनेकदा अशा वेळी निर्माण होते जेव्हा व्यक्ती अतिशय ताण तणाव मध्ये असतो किंवा त्याला कोणत्याही प्रकारचे टेन्शन आलेले असते किंवा त्याची झोप पूर्ण झाली नसते किंवा तो कोणत्याही अमली पदार्थाचे सेवन करत असेल त्यांनी सेवन केली असेल अशावेळी ही परिस्थिती उद्भवते किंवा संध्याकाळी जास्त प्रमाणामध्ये व्यायाम केल्यामुळे सुद्धा ही स्थिती निर्माण होऊ शकते.

हे वाचा:   फक्त हि एकच वनस्पती आणि नागीण, नागवेढा होईल पूर्णपणे गायब; १००% प्रभावी.!

अनेकदा ही स्थिती औषधांचे अतिप्रमाणात मध्ये सेवन केल्यामुळे सुद्धा होऊ शकते तसेच बहुतेक वेळा आपला मेंदू अर्ध झोपे मध्ये असल्यामुळे तो अर्धा सक्रिय असतो आणि अशा वेळीसुद्धा अशा प्रकारचे झटके शरीरामध्ये उद्भवत असतात. जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बैचेनी जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.