पूजा करतांना दिवा फडफडणे ,फुल पडणे ,डोळ्यात पाणी येणे ,आळस येणे याचा काय आहे अर्थ.?

अध्यात्म

देवपूजा करताना तुमचे डोळ्यात सुद्धा अश्रू येतात का? जर असे सुद्धा तुमच्यासोबत घडत असेल तर आजच लेख तुमच्यासाठीच आहे. आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. असे अनेक रहस्य आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळी माहिती सुद्धा प्राप्त होणार आहे. असे म्हणतात की या विश्वाची निर्मिती होण्याआधी ब्रह्मांडाची निर्मिती होण्याआधी हे विश्व पूर्णपणे रिकामे होते.

अशा वेळी सगळीकडे काळोख अंधार होता आणि याच वेळी एक प्रचंड शक्ती निर्माण झाली आणि एक शिवलिंग सुद्धा अस्तित्वात आले. हा दिव्य प्रकाश संपूर्ण सृष्टी मध्ये पसरला आणि संपूर्ण ब्रम्हांड तेजमय झाले. त्यानंतर या ब्रह्मांडामध्ये काही पदार्थांची निर्मिती झाली त्यात जल,वायू,अग्नी अशा अनेक पदार्थांची निर्मिती झाली आणि या सर्व गोष्टींचा संबंध श्री महादेव यांच्याशी येत असतो. महादेव हे निर्मिती आहे तर महादेवच शेवट आहेत. या सर्व गोष्टींचा महादेवाची खूप जवळीक संबंध येत असतो जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा आपली सर्व ध्यान एकाग्र करत असतो आणि अशावेळी आपले संपूर्ण संबंध महादेवाची जोडले गेलेले असतात.

जेव्हा कधी आपण देवपूजा करत असतो तेव्हा काही घटना आपल्या सोबत घडत असतात, काही संकेत आपल्याला प्राप्त होत असतात परंतु या संकेतांकडे आपण दुर्लक्ष करत असतो. जेव्हा आपण परमेश्वराची पूजा अर्चना करत असतो तेव्हा आपल्या आजूबाजूला सुद्धा एक सकारात्मक वातावरण तयार होत असल्याने या सकारात्मक वातावरणामुळे सुद्धा आपल्याला प्रसन्न वाटू लागते. अनेकदा आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे दुःख , ताण तणाव निर्माण झालेले असतात परंतु अशावेळी जेव्हा आपण ध्यानधारणा करत असतो तेव्हा त्या आधारे झालेल्या किंवा परमेश्वर पूजेच्या सकारात्मक शक्तीमुळे आपल्या जीवनामध्ये संपूर्ण ताण तणाव निघून जातो.

हे वाचा:   रात्री झोपण्यापूर्वी 4 सेकंदाचा हा मंत्र बोला; सकाळी चमत्कार पाहून दंग व्हाल.!

आपल्याला बरे वाटू लागते.आपल्यापैकी अनेक जण अभ्यास करत असताना माता सरस्वतीची पूजा अर्चना आराधना करत असतात आणि ही आराधना करत असताना जर मुलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येत असतील , त्याला अभ्यास करताना झोप लागत असेल तर अशा वेळी समजा की माता सरस्वती त्याच्यावर प्रसन्न होत आहे त्याचबरोबर अनेकदा आपण एखादी भगवंताची कथा ऐकत असताना अचानक आपल्या अंगावर काटा येतो आणि आपल्या डोळ्यातून पाणी वाहू लागते. जर असे सुद्धा तुमच्या बाबतीत होत असेल तर तुम्हाला भगवंताची कृपा आशीर्वाद भगवंताची शक्ती तुमच्या शरीरामध्ये निवास करत आहे किंवा तुम्हाला काहीतरी चांगल्या घटनेची शक्ती व संकेत प्राप्त होणार आहे त्याचा अर्थ होत असतो.

असे काही वेगळे संकेत आहे जे आपल्याला पूजा-अर्चा करताना कळत असतात परंतु आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो म्हणून आपणास काही अशी काही लक्षणे जाणून घेणार आहोत, त्या लक्षणाच्या माध्यमातून संकेताच्या माध्यमातून आपल्याला भगवंताचा कृपाशिर्वाद प्राप्त होत असतो.जर आपण देवपूजा करत असताना आपल्या डोळ्यातून अश्रु वाहत असतील तर अशा वेळी तुमचा आत्मा आणि परमेश्वराचा आत्मा हा पूजा करताना एकत्रित होत आहे आणि त्याचे तुम्हाला चांगले फळेसुद्धा प्राप्त होणार आहे असा एक संकेत असतो., अशावेळी तुमची जी काही इच्छा असेल ती भगवंताकडे व्यक्त करायला हवी आणि या वेळेस आपण काही मागताच भगवान आपले म्हणणे नक्की पूर्ण करत असतात.

बहुतेक दा देवपूजा करत असताना दिवा वाढतो म्हणजे त्याची वात कधीकधी विझून जात असते अशा वेळीसुद्धा त्याचा संकेत चांगला प्राप्त होत असतो.अग्नी म्हणजे शिव आहे. अग्नीमध्ये शिवाची तेज असते आणि जर तुमच्या बाबतीत सुद्धा असे होत असेल तर त्याचा अर्थ असा की ती पूजा तुमच्या देवापर्यंत आवश्यक पोहोचत आहे. जर आपण अगरबत्ती लावताना किवा झोप येत असताना त्या अगरबत्ती चा धूर, धूप दाखवताना त्याचा रोख देवांकडे वळला तर याचा अर्थ असा की तुमची देवपूजा परमेश्वराने स्वीकार केली आहे.

हे वाचा:   घराच्या या कोपऱ्यात ठेवा नारळ; मोठ्यात मोठी समस्या होईल दूर, पैसाच पैसा येईल.!

देवपूजा करत असताना बहुतेक वेळा फूल खाली पडत असते असे सुद्धा तुमच्या बाबतीत घडत असेल तर त्याचा अर्थ असा की तुमची देवपूजा देवाने स्वीकार केलेला आहे. तुम्ही केलेल्या पूजा-अर्चना देवाने कृपाशीर्वाद दिलेला आहे .पूजा करत असतांना अचानक तुमच्या घरासमोर गाय आणली तर हा अतिशय शुभ संकेत मानला जातो अशा वेळी गाईची पूजा अर्चना व तिला काहीतरी खास पदार्थ खायला अवश्य द्यावे असे केल्याने तुम्हाला गो मातेचे आशीर्वाद तर लागणारच आहे पण त्याचबरोबर गोमातेची सेवा केल्याचे पुण्य सुद्धा लागणार आहेत तर हे होते काही अशी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला देवपूजा करताना लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याचे जे काही छोटे संकेत आपल्याला प्राप्त होत असते संकेत ओळखायला पाहिजे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.