आनंदाच्या भरात बापाने सगळी संपत्ती मुलाच्या नावे केली; पण पुढे जे मुलाने केले ते खूपच भयानक होते….

ट्रेंडिंग

माणूस आयुष्यात छोट्या-मोठ्या अनेक चूका करतो.माणूस म्हटलं तर चुका ह्या होणारच पण काही चुका अश्या असतात ज्यांचा पश्चात्ताप त्याला आयुष्यभर करावा लागतो. अशीच चूक एका वडिलांकडून झाली व त्यांच्यावर तथा त्यांच्या पत्नीवर उपासमरीची वेळ आली. वडिलांच्या हातून नक्की कोणती चूक झाली? आणि काय आहे नक्की हे प्रकरण? चला याबाबत थोडीशी माहिती जाणून घेऊया.

मालतीबाई आणि गोपालराव हे दाम्पत्य चार दिवस लेकीकडे राहून घरी निघाले. वाटेत येताना त्यांनी दोन नाती व एक नातू यांसाठी खावू घेतला आणि चारच्या सुमारास ते घरी पोहचले. घरी पोहचल्यावर हात-पाय धुवून ते विश्रांती घेऊ लागले त्यांना घरात साम-सुम जाणवली घरात मोठी नात आणि सून शोभा होती लहान नातवंड घरात नव्हती.

मोठ्या नातने दोघांना चहा दिला. चहा पिताना त्यांच लक्ष बांधून ठेवलेल्या सामनावर गेले त्यांनी सुनेला सामना बाबत विचारलं तिने उद्धटपणे उत्तर दिले ‘तुम्ही तुमची राहायची सोय आत्ता दुसरीकडे करा आम्ही तुम्हाला कंटाळलो आहोत’.हे ऐकून दोघांच्या ही पायाखालची जमीन सरकली त्यांना हे कळून चुकले की सून एकटी एवढ सगळ बोलणार नाही आपला मुलगा सुद्धा या मध्ये सामिल आहे. गोपालराव न्हावी काम करत असत. स्व:कष्टाने त्यांनी हे घर बांधले.

हे वाचा:   वेळ कितीही वाईट असो आयुष्यात नेहमी या गोष्टी लक्षात ठेवा.!

स्व:ताचा सलून सुरु करुन त्यांनी मेहनतीने पैसे, मालमत्ता तथा दागिणे बनविले. मुलगा मोठा झाला तो ही गोपलरावांना कामात मदत करु लागला. त्यांनी आधी धाकट्या मुलीचे त्यानंतर मुलाचे मोठ्या थाटा-माटात लग्न लावून दिले. सून शोभा घरात आली मुलाला दोन मुली झाल्या आणि त्यानंतर मुलगा झाला घरात आनंद पसरला. आनंदाच्या भरात गोपालराव यांनी आपले सलून आणि घर तथा सगळे दाग-दागिणे आपल्या मुलाच्या व सुनेच्या नावावर केले आणि या चुकीमुळेच त्यांना भर म्हातारपणात असे हलाखिचे दिवस पहावे लागत आहेत.

गोपालराव आणि मालतीबाई आता गावाबाहेर मालतीबाईंच्या मामेबहिणी सोबत एका झोपडीत राहतात. वयाच्या 65 व्या वर्षात मालतीबाई उदरनिर्वाहासाठी घरकाम करतात तसेच गोपालराव हे दम्याच्या आजाराने ग्रस्त असतात आणि त्यांची प्रकृती ठिक नसल्याने ते हळूहळू घरची कामे करतात. तरी ही गावात भजन,उत्सव असला तर गोपालराव पेटीवर साथ देत असत त्यांची चांगल्या लोकांत उठ-बस होती.

हे वाचा:   महाभारतात सांगितलेल्या या 5 गोष्टी आजच्या कली युगात खऱ्या ठरत आहेत...बघा श्री कृष्णाने आधीच हे सांगितले होते जसे..

मागच्या वर्षी को’रो’ना आला मुलाचे सलून बंद पडले आणि खाण्या पिण्याचे वांदे होवू लगले हे गोपालराव आणि मालतीबाई यांना कळल नातवांसाठी जीव तुटू लागला म्हणून त्यांनी श्रवणबाळ आणि निराधार योजनेचे पैसे मुलाला देवू केले आणि मुलाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होवू लागला. अशाच काही मोठ्या चुका आपल्या आयुष्यात अनेक संकटे घेवून येऊ शकतात म्हणूनच मित्रांनो आनंदाच्याभरात कोणत ही निर्णय घेवू नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.